Meditation Benefits In Marathi |
अनेक महापुरुषांना तुम्ही ध्यानस्थ अवस्थेत बसलेले पहिले असेल. भगवान गौतम बुद्ध , स्वामी विवेकानंद , वर्धमान महावीर यांचे बहुतांश फोटो तसेच मूर्ती या ध्यानस्थ अवस्थेतीलच दिसतात. त्याचप्रमाणे सध्याच्या काळात पण अनेक गुरु हे meditation किंवा ध्यान करताना आपल्याला दिसतात. श्री श्री रविशंकर, गौर गोपाळ दास, सद्गुरू, आदी लोक ध्यानाबद्दल किंवा त्याचे महत्व सांगताना दिसतात.
महापुरुष सतत meditation करताना दिसतात त्यामुळे ध्यानामध्ये किती अपार शक्ती असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. स्वामी विवेकानंद यांनी meditation चे महत्व सांगताना असे म्हटले आहे Meditation can turn fools in to sages but unfortunately fools never meditate. ध्यान मूर्खानाही संत बनवू शकतो परंतु मूर्ख कधीच ध्यान करत नाहीत. ध्यानाचे अनेक चमत्कारिक फायदे आहेत. ज्यामुळे तुमच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळू शकते. जगाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलू शकतो, मानसिक ताणतणाव दूर करण्यापासून ते कुंडलिनी शक्ती सप्तचक्र जागृत करून एक प्रभावी मनुष्य म्हणून आपलं जीवन जगू शकता.
ध्यानाचे खूप फायदे आहेत, अभ्यास करण्यासाठी एकाग्रता वाढवण्यात ध्यानाचा फायदा होतो. ध्यानामुळे मानसिक तणाव कमी होतो. सकारात्मकता वाढवते, मन शांत ठेवते असे अद्भुत फायदे ध्यानामुळे होतात. आजच्या लेखातMeditation Benefits In Marathi आपण ध्यानाचे फायदे आणि ध्यान नेमके कसे करावे हे सविस्तर पाहणार आहोत.
Meditation Benefits In Marathi |
ध्यान करण्याचे फायदे ??
- जीवनात सकारात्मकता येते.
ध्यान आपल्याला आपले जीवन सकारात्मक करायला आणि तसेच ताणतणाव कमी करायला , भावनांवर नियंत्रण ठेवायला, अपयश पचवायला मदत करते. ध्यानाच्या मदतीने आपण आपले इच्छित उद्दिष्ट गाठू शकतो. आणि यशस्वी बनू शकतो असे ध्यानाचे अनेक फायदे आहेत. आधुनिक जगात corona सारख्या महामारीच्या काळात स्वतःला शांत स्थिर आणि मनाला एकाग्र ठेवणे हे ध्यानाच्या साहाय्याने सहज शक्य आहे. अश्या कठीण काळात सुद्धा तुमच्या मनाची एकाग्रता स्थिर राहील.
- नैराश्य कमी होते.
ध्यान केल्यामुळे नैराश्य, चिंता, अशांती या नकारात्मक भावनांवर आपण सहज विजय मिळवू शकतो.
Meditation Benefits In Marathi |
- एकाग्रता वाढते.
ध्यान केल्यामुळे एकाग्रता अनेक पटीने वाढते. आपण एकाच कामावर लक्ष केंद्रित करून ते काम काळजीपूर्वक करू शकतो. ध्यानामुळे आपले मन भरकटत नाही. आपली विचार करण्याची क्षमता, कल्पकता आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता अनेक पटीने वाढते.
- स्मरणशक्ती वाढते.
ध्यानामुळे आपली स्मरणशक्ती अधिकपटीने वाढते त्यामुळे ध्यानाचा फायदा विध्यार्थ्यांना अनेक पटीने होतो. ध्यान केल्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते.
- रागावर नियंत्रण येते.
ध्यान केल्यामुळे राग, इर्षा, लोभ, शंका, मोह, भीती, आत्मविश्वासाचा अभाव या अश्या मानवी भावनांवर आपण सहज नियंत्रण मिळवू शकतो. ध्यानामुळे तुमचे मन तुमचे विचार तुमच्या नियंत्रणात येते.
- नवीन गोष्टी आत्मसात करण्यात मदत होते.
ध्यानामुळे नवीन गोष्टी आत्मसात करण्याची क्षमता वाढते. नवीन गोष्टी शिकण्यास आपणास मदत होते. आपली आकलन शक्ती प्रभावी होऊन समजण्याची क्षमता वाढते. आपण नवीन गोष्टी लवकर आणि जलद गतीने शिकू शकतो. गोष्टीचा सर्व बाजूने विचार करू शकतो.
- सकारात्मक भावना वाढतात.
ध्यान केल्याने मनात सकारात्मक भावना प्रेम, दया, सहानुभूती, आत्मविश्वास, करुणा, विश्वास, शांती इत्यादी भावना तयार होतात त्यामुळे इतरांबरोबर आपले संबंध सुधारण्यास मदत होते.
- आरोग्य सुधारते.
याबरोबरच ध्यानाचे आरोग्यासाठीही भरपूर फायदे आहेत. ध्यानाने हृदयरोगाचा धोका कमी होतो. आपण श्वासावर नियंत्रण मिळवू शकतो त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ध्यानामुळे उच्च रक्तदाब कमी होतो. असे एक ना अनेक फायदे ध्यानामुळे होतात.
- मन आणि विचारांवर नियंत्रण येते.
ध्यानामुळे आपले मन आणि विचार आपण नियंत्रित करू शकतो. आणि जो मनुष्य आपले मन आणि विचार नियंत्रित करू शकतो तो जग जिंकू शकतो.
Meditation Benefits In Marathi |
ध्यान कसे करावे ??
- ध्यान कोठे करावे ??
ध्यान नेमकं कोठे करावे ?? हा सर्वाना मोठा प्रश्न आहे. ध्यान करण्यासाठी योग्य जागा कोणती ?? तर याचे सोपे उत्तर असे आहे कि तुम्ही कोठेही ध्यान करू शकता. ध्यान करण्यासाठी हिमालयात जाण्याची गरज नाही. तुम्ही असाल तिथे खुडचीवर बसून किंवा जमिनीवर बसून किंवा एखाद्या बेंचवर बसून वाटेल तेथे ध्यान करू शकता. यामध्ये तुम्हाला विशेष काही करण्याची गरज नाही.
ध्यानामध्ये तुम्हाला शांत आणि शरीराची कुठलीही हालचाल न करता बसायचे आहे. काहीही न करता शांत बसने हा ध्यानाचा सोपा अर्थ आहे. त्यामुळे तुम्ही कोठेही ध्यान करू शकता.
ध्यानामध्ये बसताना तुमच्या पाठीच्या कणा हा ताठ असावा हि अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही एखाद्या आराम खुर्चीवर किंवा बेडवर ध्यान कराल तर तुम्हाला झोप येऊ शकते, त्यामुळे meditation ची सर्वात सोपी प[पद्धत आहे कि तुम्ही जमिनीवर बसून पाठीचा कणा ताठ ठेवून कोणत्याही एका आसनामध्ये ध्यान करावे.
तुम्ही जमीनीवर मांडी घालून बसू शकता किंवा पद्मासन मध्ये बसून ध्यान करू शकता. आसनामध्ये बसने यासाठी महत्वाचे आहे कि जेव्हा तुम्ही एखाद्या सणामध्ये बसता उदाहरणार्थ पद्मासन त्यामध्ये तुमच्या पाठीचा कणा ताठ असतो त्यामुळे तुम्ही अधिक सावध आणि जागरूक राहाल आणि तुम्हाला झोप येणार नाही.
याचे आणखी एक कारण आहे कि ध्यान अवस्थेत बसल्यानंतर काही वेळाने तुमचे शरीर अधिक भारी किंवा हलके झाल्याचा तुम्हाला अनुभव येईल. त्यामुळे तुमचं शरीर स्थिर असं आवश्यक आहे त्यामुळे पद्मासनात बसल्याचा फायदा होतो.
- आजूबाजूचा आवाज येऊ नये म्हणून earplugs चा वापर
तुम्ही ज्या जागेवर ध्यान कराल तेथे जास्त गोंधळ , आवाज किंवा मानविचलित करणारी परिस्थिती नसावी. ध्यानाची जागा शांत असावी नाहीतर तुम्हाला ध्यान लावताना तुमचे लक्ष बाहेरील आवाजावर जाईल, त्यामुळे ध्यान शांत जागेवर आणि गोंधळ नसणाऱ्या ठिकाणी करावे. बाहेरील आवाज कमी करण्यासाठी तुम्ही earplug चा वापर करावा. earplugs गोंधळ कमी करण्याचे काम करते त्यामुळे तुम्हाला बाहेरील आवाज येणार नाही आणि तुम्ही चांगल्याप्रकारे ध्यान करू शकता.
- मन शांत करावे
शांत जागेवर पद्मासनात बसल्यानंतर शांतपणे डोळे बंद करून मन पूर्णपणे relax करा मोकळे व्हा. आता शरीराची हालचाल बंद असावी. तुम्हाला शरीराची हालचाल करायची नाही आणि शरीर शांत करून मन स्थिर करायचे आहे. आता तुम्हाला सर्व हालचाली आणि डोक्यात येणारे विचार पूर्णपणे बंद करायच्या आहेत.
मन शांत करणे हि जगातील सर्वात अवघड गोष्ट आहे. तुम्ही विचार न करण्याचा प्रयत्न कराल आणि तुमच्या मनात आणखी जास्त विचार येत राहतील. तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवणं अवघड आहे पण अशक्य नाही. विचारांना बंद करणे शारीरिक किंवा मानसिक क्रिया न करणे याचाच अर्थ ध्यान करणे हा आहे. हीच स्थिती आणि हीच अवस्था प्राप्त करणे हा आपला हेतू असतो.
- श्वासावर लक्ष केंद्रित करावे.
विचारांना नियंत्रित करण्यासाठी आपल्याला आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचे असते. आपला श्वास हा आपल्या आत्म्याशी जोडलेला असतो. श्वास आपल्या भावना नियंत्रित करते. तुम्ही हे नक्कीच notice केलं असेल कि जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा आपला श्वास मोठा होतो आणि आपण जेव्हा शांत जागेवर शांत बसलेलो असतो तेव्हा आपला श्वास संथ चालू असतो. त्यामुळे आपला श्वास खूप महत्वाची भूमिका पार पडतो. आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवा श्वास कधी घ्यायचा आणि कधी सोडायचा यावर लक्ष केंद्रित करा.
- स्वतःला relax करा.
असे करताना तुमच्या मनात अनेक विचार येतील तुमच्या ध्यान भटकेल परंतु पुन्हा तुम्हाला आपल्या श्वासावर नियंत्रण आणून ध्यान करायचे आहे. विचार येतीलच ध्यान भटकेल पण हळू हळू तुमचे लक्ष केंद्रित होऊन तुमचा श्वास मंद होत जाईल.तुमचे संपूर्ण शरीर relax होईल तुमच्या श्वासाची गती कमीकमी होत जाईल. जर तुम्ही १० ते १५ मिनिट लागतदार श्वासावर लक्ष दिले तर अशी अवस्था येईल कि तुमचा श्वास खूप छोटा होईल, मन स्थिर होईल तेव्हा तुम्ही समाधी अवस्थेत जाल तेव्हा तुमच्या मनात कोणताही विचार नसेल.
- focus आणि concentration power चा अनुभव येईल.
तेव्हा तुम्ही पूर्णपणे present मध्ये असाल. हा अनुभव खूप चांगला असतो. या अवस्थेत तुम्ही पूर्णपणे शांत अनुभव घ्याल. श्वासावर नियंत्रण करण्याची ध्यानाची हि पद्धत खूप सोपी आहे. सरावाने तुम्ही हि अवस्था प्राप्त करू शकता. सुरुवातीला तुमच्या मनात अनेक विचार येत राहतील ध्यान लागणार नाही परंतु सततच्या सरावाने हे शक्य आहे.
आपण अधिक वेळसाठी आपले ध्यान एकाच गोष्टीवर केंद्रित करत असतो त्यामुळे ध्यान करताना आपला फोकस खूप वाढतो. concentration power अनेक पटीने वाढते त्यामुळे आपण आपल्या जीवनात अनेक गोष्टींवर आपले लक्ष केंद्रित करू शकतो. focus करून आपण आपले काम व्यवस्थित पूर्ण करू शकतो.
Meditation Benefits In Marathi |
Meditation करण्याच्या अनेक पद्धती आहेत.
- Spiritual Meditation
- Mantra Meditation
- Transcendental Meditation
- Visualization Meditation
- Mindfulness Meditation
Meditation किती वेळ करावे ??
- तुम्ही जितक्या अधिक वेळ meditation करणार तेवढा जास्त फायदा तुम्हाला होईल परंतु सुरुवातीला तुम्ही २ ते ५ मिनिटे ध्यान करू शकता त्यानंतर हळूहळू हा वेळ वाढवण्याचा प्रयत्न करा.
- सरावाने आणि हळूहळू आपला ध्यानाचा वेळ वाढवत न्या. तुम्ही generally रोज १० ते १५ मिनिटे ध्यान करायला हवे.
- तुमचे ध्यान लागत असेल तर तुम्ही ३० मिनिटेही मेडिटेशन करू शकता परंतु स्वतःला force करून बसवू नका.
- एक महिना रोज ध्यान केल्याने तुम्हाला तुमच्यात बदल झालेले लक्षात येईल.
आणखी वाचा : आयुष्यात व्यक्तिमत्व चांगले बनवायचे असेल तर या 6 गोष्टींवर नियंत्रण ठेवा
आणखी वाचा : आपला खरा मित्र कोण ? कसे ओळखाल ? 10 qualities..