Time Management Tips In Marathi | आपल्या वेळेचे नियोजन कसे कराल ? Powerful 10 tips

Time Management Tips In Marathi |

सर्वात अमूल्य गोष्ट कुठली आहे ?? तर ती आहे वेळ. कारण एकदा गेलेली वेळ परत कधीच येत नाही. जगात सर्व संपत्ती देऊनही आपण एकदा गेलेली वेळ परत आणूच शकत नाही. एकदा गेलेली वेळ परत येत नाही म्हणून आपल्याकडे असलेल्या वेळेचे आपण योग्य नियोजन केले पाहिजे. तर आपण वेळ आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी त्याचे योग्य व्यवस्थापन कसे करावे याबद्दल या ब्लॉग Time Management Tips In Marathi मध्ये जाणून घेणार आहोत.

हा लेख तुम्हाला आपल्या ध्येय प्राप्तीसाठी कसा वापरावा वेळेचे व्यवस्थापन करण्याचे १० पद्धती सांगणार आहोत. त्यामुळे तुमचा प्रत्येक मिनिट योग्य प्रकारे वापरण्यात तुम्हाला मदत होईल.

  • ध्येय ठरावा.
  • कामाचा क्रम ठरवा.
  • महत्वाची कामे आधी करा.
  • काम पूर्ण करण्याची वेळ ठरवून घ्या.
  • फक्त plans करू नका त्यावर work करणेही गरजेचे आहे.
  • आपला वेळ कुठे वाया तर जात नाहीये ना यावर लक्ष द्या.
  • जास्तीचा वेळ हवा असेल तर सकाळी लवकर उठा.
  • या वेळेत मी नेमकं काय करायला हवं ? हा प्रश्न नेहमी स्वतःला विचारत राहा.
  • गरजेचं नसेल तर नाही म्हणायला शिका.
  • वेळेची Importance लक्षात घ्या.

Time Management Tips In Marathi |

आपले ध्येय निश्चित करा.

  • आपलं ध्येय निश्चित नसणे हे वेळ वाया घालवण्याचे एक प्रमुख कारण आहे. जोपर्यंत तुम्ही तुम्हाला नेमकं काय करायचे आहे. याच्या संभ्रमात असाल तोपर्यंत तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत असता.
  • जोपर्यंत तुम्हाला माहितीच नाही कि तुम,हाल नक्की काय करायचंय तोपर्यंत तुमचा वेळ वाया जात राहणार त्यासाठी ध्येय निश्चित करा आणि त्या दृष्टीने तुमच्या वेळेचे योग्य नियोजन करा.
  • तुमचं ध्येय निश्चित असल्यास तुम्ही तुमचा वेळ तुमच्या ध्येय प्राप्तीसाठी द्याल.

कामाचा योग्य क्रम लावा.

  • आपण रोज रात्री झोपताना उद्या आपल्याला नेमकी कोणती कामे करायची आहे, याची एक शिस्तबद्ध योजना आखा.
  • आपल्याकडे आपल्या कामांचे योग्य नियोजन असेल तर कमीत कमी वेळेत आपण जास्तीत जास्त कामे करू शकतो.
  • सकाळी उठून कोणती कामे करायची आहे हे आपण रात्रीच ठरवलेले असल्यामुळे सकाळी उठून वेळ न घालवता लगेच पहिले काम करायला घ्यावे.
  • काम संपेपर्यंत थांबू नका, एक काम पूर्ण झालं कि मग दुसरं काम करायला सुरुवात करा.
  • ठरवलेल्या यादीनुसार काम करा म्हणजे कुठल्याही कामासाठी अतिरिक्त वेळ वाया जाणार नाही आणि सर्व कामे यादीनुसार पूर्ण होतील.
  • तुम्ही कुठलं काम केलं आहे, कुठलं बाकी आहे हे तुमच्या समोर असेल.

आणखी वाचा : यशस्वी लोकांच्या 12 चांगल्या सवयी

Time Management Tips In Marathi |

महत्वाची कामे आधी करा.

  • आपण जी कामाची यादी बनवतो त्यामध्ये महत्वाची कामना प्रथम प्राधान्य द्या आणि त्यानंतर दुय्यम कामांचा क्रम लावा.
  • असं केल्यामुळे महत्वाची कामे हि वेळेत किंवा वेळेच्या आधी पूर्ण होतील आणि कमी महत्वाच्या कामामुळे तुमचा वेळी वाया जाणार नाही
  • तुम्ही तुमच्या कामाची ४ प्रकारात वर्गवारी करू शकता.पहिल्या प्रकारात अति महत्वाची कामे, जी तुम्हाला प्राधान्याने करायची आहेत नाही केले तर तुमचे मोठे नुकसानं होऊ शकते. उदा. एखादा महत्वाचा project जो वेळेत पूर्ण नाही केला तर तुमचे नुकसान होऊ शकते.
  • दुसऱ्या प्रकारात अशी कामे येतात जी महत्वाची तर आहेतच पण पहिल्या प्रकारच्या कामांपेक्षा दुय्यम असतील. त्यामुळे जोपर्यंत पहिल्या प्रकारातली कामे पूर्ण होत नाही तोपर्यंत दुसऱ्या प्रकारातील कामांना हात घालू नका.
  • तिसऱ्या प्रकारात अशी कामे येतात कि जी कामे तुम्हाला करायला आवडतात पण तितकी ती महत्वाची नाहीत, त्या कामांचा उपयोग ध्येय प्राप्तीच्या दृष्टीने फारसा नाही. त्यामध्ये आपले छंद मोडतात, जस कि टी. व्ही. पाहणे, वर्तमानपत्र वाचणे,
  • चौथ्या प्रकारात अशी कामे येतात जी कामे तुम्ही स्वतः न करता इतरांकडून करून घेऊ शकता आणि स्वतःचा वेळ वाचवू शकता. जी कामे इतर कोणी करू शकत ती कामे इतरांवर सोपवा. असे केल्यामुळे तुम्हाला महत्वाची कामे पूर्ण करण्यासाठी वेळ मिळेल.

काम पूर्ण करण्याची वेळ ठरवून घ्या.

  • काम हे नक्की कोणत्या वेळेत पूर्ण करायचे आहे हे आधीच ठरवून घ्या. तसे केले नाही तर आपण ते काम करायला खूप वेळ वाया घालवतो आणि ते काम करताना आळस करतो.
  • समजा एखादा project साठी एक deadline ठरवून घ्या. त्या वेळेच्या आत तो project हा पूर्ण झालाच पाहिजे असे त्या project च्या कामाचे नियोजन करा.
  • काम पूर्ण करण्याची एक fix वेळ ठरवलेली नसेल तर ते काम करताना आपण टाळाटाळ करत असतो. त्यामुळे ते काम करण्यात आपण खूप वेळ वाया घालवतो.
  • जसे कि कुठलंही bill भरण्याची एक अंतिम तारिख असते, जर ते bill त्या तारखेच्या आधी भरले नाही तर तुम्हाला fine होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण त्याला टाळाटाळ न करता वेळेच्या आत बिल भरत असतो. आपल्या कामांचे पण तसेच असते.
  • हीच strategy तुम्हाला तुमच्या कामात वापरायची आहे. कामाची अंतिम तारीख आधीच ठरवून घ्या म्हणजे तुम्ही तुमचे काम वेळेत पूर्ण कराल.

Time Management Tips In Marathi |

फक्त plans करू नका त्यावर work करणेही गरजेचे आहे.

  • जर तुम्ही फक्त planning करून ठेवलं आणि त्यावर कामच करणार नाही याला काहीच अर्थ नाही. तुम्हाला जर तुमचे ध्येय गाठायचे आहे तर actual work फार महत्वाचे असते.
  • नाहीतर फक्त plans चा बनवत राहिले आणि त्याच plans मध्ये जगत राहिले तर त्याचा काही उपयोग होणार नाही, तुम्हाला त्यावर मेहनत हि घ्यावीच लागणार आहे.
  • planning शिवाय केलेले काम आणि कामाशिवाय केलेले planning हे तुम्हाला अपयशाकडेच घेऊ जात.
  • planning केल्यानंतर त्यावर लगेच काम करायला सुरुवात करा, एक झालं कि लगेच दुसरं काम करायला घ्या म्हणजे नियोजनानुसार तुमची सगळी कामे व्यवस्थित पूर्ण होतील.
  • शेवटी तुमच्या plans वर घेतलेली action च तुम्हाला success देणार आहे.

आपला वेळ कुठे वाया तर जात नाहीये ना यावर लक्ष द्या.

  • आपल्या आजूबाजूला सह्या अनेक गोष्टी असतात ज्यामुळे आपले लक्ष त्याकडे वेधले जाते आणि आपण त्यातच गुंतून राहतो आणि आपल्याला जे महत्वाचे काम करायचे होते ते तसेच राहते.
  • जस कि आपला mobile.. फोन अशी गोष्ट आहे कि ज्यात आपला खूप वेळ वाया जातो. त्यात असणारा social media आपल्याला त्यात गुंतवून ठेवतो.
  • जो व्यक्ती इंटरनेट चा वापर हा मनोरंजनासाठी नाही तर माहिती मिळवण्यासाठी करत असेल त्याला यशस्वी होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. इंटरनेट अशी गोष्ट आहे जी आपल्याला खूप ज्ञान देते पण त्या ज्ञानाचा आपण कसा उपयोग करतो यावर आपली प्रगती अवलंबून असते.
Time Management Tips In Marathi |

जास्तीचा वेळ हवा असेल तर सकाळी लवकर उठा.

  • एक छोटीशी गोष्ट फक्त सकाळी लवकर उठणे, हि तुम्हाला किती extra वेळ आपल्याला आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी देऊ शकते.
  • सकाळी एक तास जरी आपलं लवकर उठण्याची सवय लावली तर वर्षाचे ३६५ तास extra मिळतात आपल्याला आपली महत्वाची कामे करायला.
  • नेहमी सकाळी उठल्यानंतर आपण जेव्हा काम करायला सुरुवात करतो तेव्हा मी,अहत्वाची कामे आधी करायला हवी, कारण सकाळची वेळ हि अतिशय चांगली असते तेव्हा आपल्या brain ची काम करण्याची क्षमता हि सगळ्यात जास्त असते. त्यामुळे कामे लवकर आणि योग्य पद्धतीने पूर्ण होतात.

या वेळेत मी नेमकं काय करायला हवं ? हा प्रश्न नेहमी स्वतःला विचारत राहा.

  • समजा आपण काही timepass करत बसलो असेल तर हा प्रश्न स्वतःला नक्की विचार कि मी आत्ता या वेळेस काय काम करणं महत्वाचं आहे ?
  • उदा. जर तुम्ही social media वर काही पाहत असाल तर ते पाहणं तेव्हा गरजेचंच आहे कि यापेक्षा काही महत्वाची काम जी आपली अपूर्ण आहेत जी आपल्याला त्या वेळेत करायला हवी हे स्वतःला विचारणं खूप महत्वाचं आहे.
  • त्यामुळे तुमचा वेळ वाया जाणार नाही आणि महत्वाची कामे करायला वेळ मिळेल.
Time Management Tips In Marathi |

गरजेचं नसेल तर नाही म्हणायला शिका.

  • बऱ्याचदा असं होत कि कोणीतरी आपल्याला काही काम सांगितलं आणि आपल्याला आपलीही काही महत्वाची कामेही त्याच वेळेत पूर्ण करायची आहे पण समोरच्या व्यक्तीनेही काही काम सांगितल आहे तर त्या व्यक्तीला आपल्याला नाही म्हणता येत नाही.आणि आपलं त्या समोरच्या व्यक्तीच्या कामात अडकून राहतो आणि आपली कामे तशीच राहतात.
  • याने आपल्या वेळेचे व्यवस्थापन बिघडते आणि आपली कामे वेळेत पूर्ण होत नाही. आपला महत्वाचा वेळ आणि आपली मेहनत दुसऱ्यांच्या कामात खर्च होते.
  • त्यामुळे आधी तुमचे काम पूर्ण करा आणि मग शिल्लक असलेला वेळ इतरांची कामे पूर्ण करण्यात घाला.
  • जर तुमच्या महत्वाच्या कामात इतरांचे काम आले तर त्यांना नाही म्हणायला शिका कारण तुमचे कामही अतिशय महत्वाचे आहे हे आधी लक्षात घ्या.

वेळेची Importance लक्षात घ्या.

  • ज्या व्यक्तीला आपल्या वेळेचे महत्व समजले त्या व्यक्तीला त्याचे ध्येय गाठण्यापासून कोणीही अडवू शकत नाही.
  • त्यामुळे वेळीच आपल्या वेळेचे महत्व समजून घ्या आणि आपल्या यशाची वाटचाल सुरु करा. वेळ वाया घालवू नका, गेलेली वेळ कधीही परत येत नसते.

आणखी वाचा : ध्यान म्हणजे काय ? आणि ध्यानाचे फायदे..