Personality Development In Marathi | स्वतःमध्ये बदल कसा घडवाल ? Powerful 7 Tips

Personality Development In Marathi |

प्रत्येक व्यक्तीच्या वृत्तीचे वेगवेगळे पैलू असतात. प्रत्येकाच्या स्वभावाचे वेगवेगळे प्रकार त्यांचे विचार हे प्रत्येक व्यक्तीत वेगळे पाहायला मिळतात. प्रत्येक व्यक्तिमहत्वाचे विचार, भावना आणि वर्तन हे त्या व्यक्तीला इतरांपेक्षा वेगळं करते. आपण बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीच्या वैशिष्टयांचे वर्णन करत असतो कि तो असा, आहे तसा आहे, वगैरे वगैरे. म्हणजेच आपण त्याचा व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलत असतो.

बऱ्याच वेळा professional ठिकाणी काम करायचे असल्यास आपल्याला आपल्या personality मध्ये काही आवश्यक बदल घडवून आणावे लागतात. तस पाहायचं झाल्यास प्रत्येक ठिकाणीच आपला प्रभाव लोकांसमोर मांडण्यासाठी आपल्याकडे आपले व्यक्तिमत्व चांगले असण्याच गरज आहे. असा हा आपला व्यक्तिमत्व विकास कसा करावा हे आपण या ब्लॉग Personality Development In Marathi मध्ये पाहणार आहोत.

Personality Development In Marathi |

  • व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय ?
  • बोलण्यातील confidence
  • सकारणात्मक दृष्टिकोन
  • व्यक्तिमत्वाची शक्ती
  • व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये
  • मी असा का आहे ??
  • असे खुलवा आपले व्यक्तिमत्व काही Tips

व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय ?

  • व्यक्तिमत्व हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. अनुवंशिकतेपासून ते आपल्या सभोवतालची परिस्थिती, आपले अनुभव या सर्वांच्या मिलाफातून आपले व्यक्तिमत्व घडते.
  • व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत.सामाजिक, भावनिक, बौद्धिक,आत्मिक , सांस्कृतिक, शैक्षणिक, कौटुंबिक, भौगोलिक, मानसिक आणि शारीरिक. एकंदरीत त्या व्यक्तीचा संपूर्ण स्वभाव.
  • ती व्यक्ती नेमकं कसे वागते, तिच्या भावना व विचार कसे आहेत, किंवा एखाद्या प्रसंगामध्ये ती व्यक्ती कसे वागते किंवा ती परिस्थिती कसे सांभाळते त्यावरून त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व समजते.
  • व्यक्तिमत्व विकास हे व्यक्तीच्या आंतरिक आणि बाहेरील सद्गुणांचा मिश्रण आहे.आपण अनेक गोष्टी मनात करायचं योजतो, चांगल्या सवयी लावण्याचा दृढ निश्चय करतो आणि वाईट सवयींना झटकून टाकण्याचा प्रयत्न करतो.पण अनेकदा आपले मन आपला दृढ निश्चय अमलात आणण्याच्या विरुद्ध बंडाळी करते.

आणखी वाचा : आपल्या वेळेचे नियोजन कसे कराल ? Powerful 10 tips

आणखी वाचा : यशस्वी लोकांच्या 12 चांगल्या सवयी

Personality Development In Marathi ।

बोलण्यातील confidence

  • आपल्या आयुष्यात आपण रोज कुणा न कुणावर तरी प्रभावित होत असतो, त्यांचा बोलणं , चालणं , वागणं आपल्याला प्रभावित करत असतं. त्यांच्या सारखं होण्यासाठी काय करावं हेच आपल्याला कळत नसतं.
  • संवाद साधने , ऐकून घेते आणि आपले विचार योग्य पद्धतीने मांडणे हे आपल्या personality चांगली भर घालत असतात.
  • आपल्या बोलण्यात confidence असायला हवा. आपल्याला आपले म्हणणे योग्य पद्धतीने समोरच्या व्यक्तीसमोर मांडायला हवे. त्यासाठी आपल्याला त्या विषयाबद्दल सखोल ज्ञान असणे गरजेचे आहे. आणि त्या विषयाबद्दल जास्त काही माहिती नसेल तर समोरच्या व्यक्तीकडून ते समजावून घेण्याची क्षमता आपल्यात असायला हवी.
  • जीवनात कुठलीही गोष्ट आत्मसात करायची असेल तर त्याबद्दल ची संपूर्ण माहिती असण अत्यंत महत्वाचं आहे.व्यक्तिमत्व विकास म्हणजे फक्त शारीरिक आणि मानसिक गुणधर्म नसून त्या गुणधर्मांचे योग्य प्रकारे एकत्रिककरण होऊन जो प्रभाव पडतो ते खरे व्यक्तिमत्व होय.
  • व्यक्तिमत्वाचे पुढील ४ पैलू आहेत. १) तुम्ही कसे दिसता ?? २) तुम्ही काय व कसे अनुभवता ?? ३)तुम्ही काय बोलता ?? ४)तुम्ही कोणत्या कृती करता ?
Personality Development In Marathi ।

सकारणात्मक दृष्टिकोन

  • आपल्या समोर असणाऱ्या परिस्थितीला आपण कसे हाताळतो हे आपल्यात असणाऱ्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. आयुष्यात कुठलीही गोष्ट हि सकारात्मक विचार करूनच हाताळायला हवी.
  • सकारात्मक दृष्टिकोन आसनाला व्यक्ती आपल्या समोर असणाऱ्या अडथळ्यांना कश्या पद्धतीने समोर जातो हे आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असत.
  • सकारात्मक विचार करणाऱ्याला अपयश म्हणजे यशाकडे नेणारी एक पायरी आहे असं वाटतं,तर नकारात्मक विचार करणाऱ्याला हेच अपयश मार्गातील अडथळा वाटते.
  • सकारात्मक व्यक्ती हे काही ठळक गोष्टींमुळे उठून दिसतात, त्यांच्यात आस्था ,चिकाटी,नम्रता यांसारखे गुण असतात. यांच्याकडे खूप जास्त आशावाद असतो, निरंतर उत्साह ओसंडून वाहत असतो. आपल्या आसपासच्या लोकांकडेही ते खूप आशावादी दृष्टिकोनातून पाहत असतात.

व्यक्तिमत्वाची शक्ती

  • विचार करण्याची शक्ती हि माणसाला लाभलेली निसर्गदत्त देणगी आहे. माणसाचे विचार हे नेहमी त्याला बालपणापासून मिळालेल्या संस्कारातून, संगोपनातून , शिक्षणातून आणि त्याच्या अवतीभवती घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीतून त्याला मिळालेल्या शिकवणुकीतुन येत असतात.
  • माणसाचे विचारच त्याला एखादी कृती करण्यास प्रवृत्त करत असतात आणि जर का ते विचार सकारात्मक असतील तर त्याने केलेली कृतीही सकारात्मकच असणार.
  • अत्यंत उत्कृष्ट आणि कार्यक्षम काम म्हणजे आपण जे काही काम करत आहे ते मन लावून आणि त्यात सतत चांगले बदल करत पूर्ण करणे. हीच व्यक्तिमत्वाची शक्ती आहे.
  • प्रत्येक कृतीत परिपूर्ण होण्याची इच्छा. आपले उद्दिष्ट साध्य होईपर्यंत प्रयत्नात सातत्य असायला हवं. आपल्या आयुष्यात आपल्याला प्रगती करायची असेल आणि ते उत्कृष्ठ बनवायचं असेल तर आपला जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपली वृत्ती हि सकारात्मक हवी.
  • सकारात्मक दृष्टिकोन हा अत्यंत अर्थपूर्ण शब्द आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मग वैयक्तिक असो किंवा व्यावसायिक आयुष्य यासाठी सकारात्मक दृष्टिकोनाचा महत्व अनन्य साधारण आहे.

व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये

  • प्रत्येकाला स्वतःच असं एक व्यक्तिमत्व असत जे तुम्हाला तुमच्या यशाची, तुमच्या जीवनाची परिकृती करण्यात मदत करत असतं. तुमचे व्यक्तिमत्व हे तुमची सर्वात महत्वाची संपत्ती आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.
  • जो तुमच्या अनुभवांना आकार देण्यास मदत करतो. तुम्ही आजपर्यंत जे काही सध्या केलय तुमच्या भविष्यातील सर्व काही अपेक्षा, तुम्ही एक चांगला पती, चांगली पत्नी किंवा चांगले पालक बनंण हे सगळं तुमच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून असत.
  • तुमच्या आरोग्यावरही तुमच्या व्यक्तिमत्वचा आणि तुमच्या सभोवतालच्या लोंकाच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडतो. तुमचे व्यक्तिमत्व तुमच्या जीवनातील पर्याय आणि निवडी मर्यादित किंवा विस्तृत करू शकते.
  • आपण कितीतरी वेळा म्हणतो कि एखाद्याच व्यक्तिमत्व खूप छान आहे. याचा सामान्यतः असा अर्थ होतो कि ती व्यक्ती मिलनसार,आनंदी, आपल्या सोबत राहण्याजोगी, छान, सहज सोपी आहे. अश्या प्रकारची व्यक्ती आपण मित्र, roommate किंवा कामावर सहकारी म्हणून निवडतो आणि तुम्ही व्यवस्थापक असल्यास तुम्ही अश्या व्यक्तीला नियुक्त करता.
  • जेव्हा आपण सामाजिक परिस्थितीत असतो तेव्हा आपल्याला नवीन लोकांशी संवाद साधण्याची आवश्यकता असते. अर्थात तुम्ही ज्या सामाजिक परिस्थितींमध्ये आहेत त्यांची संख्या आणि विविधता तुमच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून असते कारण प्रत्यक्षात व्यक्ती भिन्न परिस्थितींमध्ये आणि भिन्न लोकांमध्ये खूप वेगवेगळी वागतात.

मी असा का आहे ??

  • आपल्याला बऱ्याच वेळा हा प्रश्न पडतो कि माझं व्यक्तिमत्व नेमकं कस आहे ? तर याच उत्तर cambridge international dictionary of english मध्ये सापडतं. त्यानुसार तुम्ही ज्या प्रकारच्या व्यक्ती आहेत, तुमचे आचरण, संवेदनशीलता आणि विचारांमधून ते व्यक्त होत.
  • व्यक्तीचा संपूर्ण स्वभाव आणि चारित्र्य याला व्यक्तिमत्व म्हणतात. म्हणजे एखादी व्यक्ती कशी वागते,कशी विचार करते,एखाद्या विशिष्ट परिस्थितीत ती कशी वागते, हे त्याच्या मानसिक रचनेवर काही प्रमाणात अवलंबून असते.
  • एखाद्या व्यक्तीच हे केवळ बाह्य स्वरूप किंवा त्याचे शब्द किंवा हालचाली हि त्याच्या व्यक्तिमत्वाची केवळ टोके असतात त्यातून त्याच खर व्यक्तिमत्व प्रकट होत नाही. म्हणूनच व्यक्तिमत्व प्रत्यक्षात व्यक्तीच्या सखोल पातळीशी संबंधित आहे.
Personality Development In Marathi ।

असे खुलवा आपले व्यक्तिमत्व

  • आपल्या जीवनात अनेक व्यक्ती येत असतात आपल्याला कधी कुणाचा चेहरा आठवणीत राहतो तर कधी कुणाचं बोलणं मग ते बोलणं मधाळ असो किंवा स्पष्ट व्यक्त असो तो आपल्याला आवडतो., तर कधी आपल्याला काहींचा स्वभाव, काहींचा स्नेह, आपुलकी मोडून टाकते.
  • काहींच्या व्यक्तिमत्वच आपल्याला चैतन्याचा झरा असल्यासारखा वाटतो. काही लोक क्षणात आपल्या आकर्षक आणि मोहक तर कधी धीरगंभीर बोलण्यानं , तर कधी त्यांच्या आकर्षक पेहराव्यामुळे समोरच्याच मन जिंकून घेतात. अर्थात लोकांचं मन जिंकणं हि कला जरी असली तरी यामागे एक शाश्र हि आहे.
  • रुबाबदारपणा किंवा आकर्षक दिसणं हा व्यक्तीमत्वाचा केवळ एक भाग आहे आणि तो हि बाह्यभाग आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये कोणते गुण आहेत, त्याच वागणं ,बोलणं आणि विचार कसे आहेत या सगळ्याचा त्यात समावेश होतो.
  • आजच्या स्पर्धेच्या युगात व्यक्तिमत्व विकासाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालाय. शिवाय दैनंदिन व्यवहारामध्ये स्वतःला इतरांच्या तुलनेत सरस ठेवण्यासाठी व्यक्तिमत्त्व विकासाची आणि त्याच्या नियमांची निकड जाणवू लागली आहे.
  • जे डोळ्यांना प्रत्यक्षपणे जाणवत दिसतात आणि जे प्रत्यक्षपणे आपल्या डोळ्यांना दिसत नाही अश्या अनेक घटकांचा समावेश व्यक्तिमत्व विकासामध्ये होत असतो.

सकारात्मकतेचा Tips

  • व्यक्तिमत्व विकासाची पहिली पायरी म्हणजे स्वतःचा आत्मविश्वास आणि व्यावहारिक ज्ञान वाढवणे.
  • चांगली पुस्तकं हि वाचल्याने व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत होते.
  • चांगली पुस्तक हि चांगले मित्र असतात त्यामुळं तुमच्या चारित्र्य घडत आणि मानसिक विकास होतो.
  • मानवी स्वभावाचा एक स्वाभाविक सद्गुण आहे आणि तो म्हणजे माणसं आयुष्यात संयम राखायला आणि शांत राहायला शिकले पाहिजे.
  • तुम्ही जर का शांत आणि संयमी असाल तर मनाला समतोल ढळू न देता तुम्ही योग्य विचार करू शकता. त्यामुळं career मध्ये उच्च ध्येय गाठण्यासाठी तुमच्या शांत स्वभावाचा उपयोग होतो.
  • नेहमी सकारात्मक विचार करा. नेहमी सत्य बोला. खोटे बोलणारे लोक कोणालाच आवडत नाहीत. म्हणूनच व्यक्तिमत्व विकासासाठी खरे बोलणे फार महत्वाचे आहे कारण खरे बोलणाऱ्यांची सर्वांकडूनच प्रशंसा होत असते.