Habits Of Unsuccessful People In Marathi ।
कुठल्याही यशस्वी व्यक्तीकडे पाहिले कि आपल्याला हि त्यासारखे यश मिळावे असे प्रत्येकालाच वाटते आणि तसे वाटनेही स्वाभाविकच आहे. यशस्वी व्यक्तीकडे पाहुण असे वाटते कि याने असे काय प्रयत्न केले असतील कि त्याला असे यश मिळाले आणि आपण नेमकं काय चुका करतो कि दरवेळेस आपल्याला अपयश मिळत आहे. अश्या चुका आपल्याला सहज कोणी सांगत नाही आणि आपल्याला हि त्या लक्षात येऊपर्यंत आपण हार मानलेली असते.
त्यामुळे योग्य वेळी आपल्या चुका आपल्या लक्षात जर आल्या तर त्या सुधारून आपण नक्कीच यशाच्या मार्गावर जाऊ शकतो. आपल्या अश्या काही सवयी असतात ज्या आपल्याला छोट्या वाटतात पणत्यांचा परिणाम म्हणून आपल्याला सततचे अपयश मिळत असते. चला तर या ब्लॉग Habits Of Unsuccessful People In Marathi मध्ये आपण पाहणार आहोत अश्याच काही सवयी ज्या आपल्याला आपल्या यशापासून दूर नेतात.
- स्वतःवर विश्वास नसणे
- सतत कुठल्याही गोष्टीचा आळस करणे.
- अहंकार असणे.
- संवाद साधता न येणे किंवा संभाषण कौशल्य नसणे.
- दिलेला शब्द न पाळणे.
- निर्णय क्षमतेत असणारा अभाव.
- नकारात्मक विचारसरणी.
Habits Of Unsuccessful People In Marathi ।
स्वतःवर विश्वास नसणे
- कुठलीही गोष्ट करायची जेव्हा आपण ठरवतो तेव्हा आपल्यात ती गोष्ट पूर्ण करण्याचा आत्मविश्वास हा असायलाच हवा.
- हि गोष्ट आपण पूर्ण करू शकतो का ? किंवा माझ्याकडून हि गोष्ट पूर्ण होईल का ? असे एक ना हजार प्रश्न अश्या लोकांना पडत असतात ज्यांचा स्वतःवर अजिबात विश्वास नसतो.
- यापेक्षा असा विचार करायला हवा कि मी हि गोष्ट पूर्ण करणारच आणि ठरलेल्या वेळेतच हि गोष्ट पूर्ण व्हायला हवी असा आत्मविश्वास स्वतःमध्ये हवा.
- स्वतःला याची जाणीव करून द्या कि मी हि गोष्ट करू शकतो आणि माझ्यात तेवढी क्षमता आहे.
- आपण स्वतःच जर आपल्या क्षमतेवर शंका घेत असू तर लोकांना आपल्यावर विश्वास कसा बसेल आणि आत्मविश्वास नसलेल्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व इतर लोकांना तरी कसे आवडेल ? ते आपल्याकडे दुर्लक्षच करणार.
सतत कुठल्याही गोष्टीचा आळस करणे.
- अपयशी लोकांमध्ये हि गोष्ट प्रामुख्याने पाहायला मिळते कि त्यांना प्रत्येक गोष्टीचा आळस हा असतोच.
- एखादी गोष्ट करायला घेतली कि नंतर करू अजून खूप वेळ आहे आता थोडा आराम करू अशी भावना ज्या लोकांमध्ये असते ते लोक कधीच यशस्वी होऊ शकणार नाही.
- यशस्वी लोक कधीच कुठल्याच गोष्टीचा आळस करत नाहीत ते लोक वेळेच्या आधीच ते काम कस पूर्ण करता येईल यावर अधिक भर देतात.
- त्यामुळे यशस्वी जर व्हायचं असेल तर सर्वात पहिले आपल्यात असणारा आळस दूर करावा लागणार.
- कोणतेही कष्ट न करता सर्व आयते मिळावे अशी या लोकांची इच्छा असते. आळशीपणा हा गुण चांगल्या व्यक्तिमत्वाचा शत्रू आहे हे नेहमी लक्षात ठेवा.
अहंकार असणे.
- एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी कि अहंकारी व्यक्ती कुणालाही आवडत नाही.
- अहंकार असणाऱ्या व्यक्तीला आपण अहंकारी आहोत हेच कळत नाही. त्यांना लोकांचे सांगणे पटत नाहीत. आपणच बरोबर असण्याची भावना अश्या व्यक्तींमध्ये असते.
- जी व्यक्ती कुठल्याही गोष्टीचा अहंकार करत नाही ती व्यक्ती खूप लोकप्रिय असते. लोक अश्या व्यक्तीबरोबर काम करायला कायम तयार असतात.
- जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला काही लोकांना आपल्या बरोबर घेऊन त्यांच्या सोबत काम करावे लागणार आहे त्यामुळे आपल्यात अहंकार नसावा.
- अहंकार असणारी व्यक्ती नेहमी स्वतःचाच विचार करते आणि अहंकार नसणारी व्यक्ती नेहमी दुसर्यांचा विचार करते आणि सर्वाना बरोबर घेऊन काम करते.
- अहंकार नेहमी व्यक्तीला अपयशाला बळी पडत असतो हे नेहमी लक्षात ठेवा.
संवाद साधता न येणे किंवा संभाषण कौशल्य नसणे.
- आपल्याकडे कितीही ideas असतील पण जर त्या आपल्याला व्यवस्तीत सांगताच आल्या नसतील तर त्याचा काहीही उपयोग नाही.
- त्यामुळे संभाषण कौशल्य अतिशय महत्वाची बाब आहे.
- जर कोणीही काही प्रश्न विचारले आणि आपल्याला जर त्याचे उत्तर माहित असून देखील जर ते सांगताच येत नसेल तर आपल्याला ज्ञानाचा किंवा अभ्यासाचा काहीच उपयोग नाही.
- आपले विचार, आपले ज्ञान आणि नवनवीन ideas इतरांपर्यंत पोहचवण्यासाठी आपले संभाषण कौशल्य चांगले असणे अतिशय गरजेचे आहे.
- आपले विचार जर आपल्याला दुसऱ्यांपर्यंत व्यवस्थित पोहचवता आले नाही तर हे नेहमी तुमच्या यशात येणार मोठा अडथळा असणार आहे.
आणखी वाचा : आपल्या वेळेचे नियोजन कसे कराल ? Powerful 10 tips
आणखी वाचा : यशस्वी लोकांच्या 12 चांगल्या सवयी
Habits Of Unsuccessful People In Marathi ।
दिलेला शब्द न पाळणे.
- दिलेला शब्द पाळणाऱ्यांवरच लोक विश्वास ठेवतात, एकदा विश्वास ठेवून लोक काम देतीलही परंतु तुम्ही जर दिलेला शब्द पाळला नाही तर ते पुन्हा तुमच्याकडे कधीच येणार नाहीत.
- कोणतेही महत्वाची कामे अश्या व्यक्तीकडे कधीच दिली जात नाहीत आणि अश्या व्यक्तींना नेहमी टाळले जाते.
- अश्या व्यक्तींचा कोणी आदर किंवा विचार फारसा कोणी करत नाहीत. त्यामुळे अश्या व्यक्तींना जर यशस्वी व्हायचे असेल तर त्यांना आपले काम नेहमी वेळेत पूर्ण करायला हवे आणि इतर लोकांनी त्यांच्यावरविश्वास ठेवावा म्हणून योग्य पद्धतीने काम करायला हवे.
निर्णय क्षमतेत असणारा अभाव.
- योग्य वेळी योग्य निर्णय न घेणे हे अयशस्वी व्यक्तीचे लक्षण आहे.
- कुठल्याही परिस्थितीत आपल्याला निर्णय घेता यायला हवा. निर्णय न घेणे हे देखील वाईट व्यक्तिमत्वाचे लक्षन आहे.
- आपल्याला जर आपल्या आयुष्याचे हि निर्णय घेता येत नसतील तर आपले व्यक्तिमत्व कोणालाही प्रभावी वाटणार नाही.
- आपली परिस्थिती चांगली असो किंवा वाईट पण कुठल्याही परिस्थितीत आपल्याला निर्णय घेता आला पाहिजे.
- निर्णय घेता वेळी गोंधळून जाणे, निर्णयावर ठाम नसणे, इतरांवर निर्णय सोपवणे किंवा इतर लोकांचे सल्ले घेणे टाळायला हवे.
- स्वतःवर विश्वास ठेवून निर्णय घ्यायला हवा. इतर लोकांचे सल्ले घेतले तर आपण अधिकच गोंधळून जातो आणि योग्य निर्णय घेता येत नाही.
- स्वतःच्या निर्णयावर ठाम राहणेही तेवढेच महत्वाचे आहे.
- आपले निर्णय क्षमता जर चांगली असेल तर इतर लोक सुद्धा आपल्याकडे त्यांच्या इतर कामांसाठी सल्ले घेण्यासाठी आपल्याकडे येतील.
- निर्णय घेण्याची क्षमता ठेवा निर्णय घेणे टाळू नका.
Habits Of Unsuccessful People In Marathi ।
नकारात्मक विचारसरणी.
- नकारात्मकता हि आपल्या व्यक्तिमत्वाची अतिशय घातक असते.
- नकारात्मकता आपल्याला काहीतरी चांगलं करण्यापासून आणि प्रगती करण्यापासून दूर करते.
- प्रत्येक गोष्टींमध्ये नकारात्मकता शोधणे हि अनेकांची सवय असते. अश्या सतत नकारात्मक व्यक्तीबरोबर वेळ घालवणे, गप्पा मारनेही कुणालाही आवडत नाही. अशी लोक चांगले वातावरण हि खराव करतात. अश्या व्यक्तींना प्रत्येक गोष्टीत आधी नकारात्मक बाबी प्रथम दिसतात.
- अश्या नकारात्मक राहण्याच्या सवयी घालवणे अतिशय महत्वाचे आहे. त्यासाठी नेहमी सकारात्मक विचार ठेवणे गरजेचे आहे हे आपल्या व्यक्तिमत्वाची महत्वाचे आहे.
- नकारात्मक राहून आपले व्यक्तिमत्व खराब करू नका त्यामुळे आपल्याला कधीही यश मिळणार नाही.
अश्याप्रकारे आपल्यात असणाऱ्या या वाईट सवयी दूर केल्या तरच आपल्याला यश मिळणार आहे त्यामुळे सर्वात आधी या सवयी बदला. त्यानंतर तुम्हाला तुमच्या अपयशावर माँत करता येणार आहे. त्यासाठी आपल्या वाईट सवयी, आपल्या चुका , आपल्यात असणारे दुर्गुण वेळीच ओळखून दूर करणे गरजेचे आहे.
ज्या गोष्टी तुमच्या चांगल्या व्यक्तिमत्वाच्या आड येत आहेत त्या बदलायलाच हव्या. चांगले व्यक्तिमत्व आपल्याला यश मिळवून देते. चांगल्या व्यक्तिमत्वाला घटक ठरणाऱ्या या सवयी लवकरात लवकर बदलायला हव्या.
आणखी वाचा : स्वतःमध्ये बदल कसा घडवाल ? Powerful 7 Tips