Why Maximum People Are Not Rich In Marathi | जगातील फक्त 25% लोकंच का श्रीमंत आहेत ??

Why Maximum People Are Not Rich In Marathi |

जगातील बहुतांश लोक हे आपले जीवन गरिबीतच जगात असतात. जागतिक लोकसंख्येपैकी फक्त २५% लोकं हे श्रीमंत वर्गात मोडतात आणि ७५% लोक गरीब वर्गात मोडतात. हि एवढी मोठी तफावत नेमकं का बर होत असेल ? प्रत्येक मनुष्यास दिवसभरात २४ तासांचा सारखाच वेळ भेटतो, तरीदेखील गरीब लोक गरीबच राहतात आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होत जातात. गरीब म्हणून जन्माला येणं हि चूक नाही परंतु जर तुम्ही गरीबच म्हणून मरणार असणार तर हि नक्कीच तुमची चूक आहे.

गरिबीतून बाहेर यावं असं वाटत असेल तर त्यासाठी तुम्हाला स्वतः कष्ट करावे लागणार आणि या ब्लॉग Why Maximum People Are Not Rich In Marathi मध्ये आपण पाहणार आहोत अश्या काही गोष्टी ज्या तुम्हाला गरिबीतून बाहेरच येऊ देत नाहीत.

  • असे लोक पैसे गुंतवत नाहीत.
  • त्यांना वाटते कि त्यांना सर्व काही माहित आहे.
  • वाईट सवयीनवर पैसे खर्च करतात.
  • नोकरी करून आपण श्रीमंत होऊ याच विचारात ते असतात.
  • सर्व कामे स्वतः करण्याचा प्रयत्न करतात.
  • उत्पन्नाचा दुसरा मार्ग शोधत नाहीत.
  • दिखावूपणावर पैसे खर्च करतात.
  • दूरदृष्टीचा अभाव त्यामुळे मोठा विचार करू शकत नाही.
  • निष्क्रिय उत्पनाचा पर्याय शोधात नाहीत.

Why Maximum People Are Not Rich In Marathi |

असे लोक पैसे गुंतवत नाहीत.

  • असा एक अनुभव आहे कि सहसा लोकं अगोदर खर्च करतात आणि मग उरलेल्या रक्कमे ची गुंतवणूक करतात, पण तसे न करता आधी ठराविक रकमेची गुंतवणूक करावी आणि उरलेल्या रकमेतून खर्च करावा. त्यामुळे गुंतवणुकीस अधिक वाव मिळेल आणि खर्चाचा अंदाज करणे अधिक सोपे होईल.
  • त्यासाठो २०-३०-५० हा सूत्र आपण वापरू शकतो.पगाराच्या ५०% रक्कम हि आपल्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरावी जसे कि घरभाडे, वेगवेगळे बिल, किराणा इत्यादी.
  • पगाराच्या ३०% रक्कम हि आपण गुंतवणुकीसाठी वापरली पाहिजे. जेणे करून आपण भविष्यच त्याचा उपयोग करून भविष्यातील खर्च भागवू शकतो.
  • पगाराच्या २०% रक्कम हि ऐच्छिक गरज पूर्ण करण्यासाठी आपण वापरू शकतो. जर आपण आपल्या पगाराचे अश्याप्रकारे नियोजन केले तरच आपण पैशाच्या बाबतीत भविष्यात स्वयंपूर्ण होऊ शकतो.
  • अश्याप्रकारे जी लोक आपल्या पगाराचे योग्य नियोजन न करता फक्त खर्च करतात, जी लोक गुंतवणूकच करत नाहीत अशो लोक कायमच तारंबळीत असतात.

त्यांना वाटते कि त्यांना सर्व काही माहित आहे.

  • अश्या लोकांची वृत्ती अहं ब्रम्हास्मि असते. आपल्या सर्व गोष्टींमधला सर्व काही समजत अशी या लोकांची भावना असते, त्यामुळे ते कुणाचाही सल्ला घेत नाही.
  • अशी लोक स्वतःच्याच गर्वात असतात त्यांना कुणाचेही सांगणे पटत नाहीत. त्यांना सतत आपणच बरोबर आहे असे वाटत असते.
  • दैनंदिन जीवनात असे लोक व्यर्थ खर्च करत असतात आणि त्यांना खर्चाबद्दल कोणी काही सल्ला दिलेला आवडत नाही.

आणखी वाचा : आपल्या या 7 वाईट सवयीमुळे येते अपयश

Why Maximum People Are Not Rich In Marathi |

वाईट सवयीनवर पैसे खर्च करतात.

  • खर्चाचे नियोजन न करता व्यर्थ खर्च असे लोक करत असतात.
  • अनावश्यक खरेदी, कपडे, सतत mobile बदलणे, नवनवीन गोष्टींचे आकर्षण वाटणे अश्या एक ना अनेक गोष्टींवर अनावश्यक खर्च असे लोक करतात.
  • त्याचबरोबर credit card अतिवापर करून अनावश्यक party करणे , बाहेर फिरायला जाणे याही गोष्टींचा त्यात समावेश होतो.
  • आणि सर्वात महत्वाचे म्हणजे काही लोकांना व्यसनाची सवय असते. दारू, सिगारेट, तंबाखू, पान, बिडी, गुटखा यांसारख्या वाईट व्यसनांवर हि लोक रोज छोटी छोटी रक्कम खर्च करत असतात.

नोकरी करून आपण श्रीमंत होऊ याच विचारात ते असतात.

  • फक्त नोकरी करून कोणीही श्रीमंत होऊ शकत नाही हे सर्वात आधी समजून घ्यायला हवे. नोकरीच्या जोडीला इतर काही मार्ग शोधायला हवे ज्यातून आपले income वाढेल.
  • नोकरी करून फक्त आवश्यक गरज पूर्ण होऊ शकतात परंतु त्यातून कोणीही श्रीमंत होऊ शकत नाही.
  • नोकरीबरोबर एखादा छोटासा व्यवसाय किंवा दुसरा पर्याय आपण शोधला पाहजे ज्यातून आपण गुंतवणूक करू शकतो.

सर्व कामे स्वतः करण्याचा प्रयत्न करतात.

  • “एकीचे बळ” हि संकल्पना तुम्ही ऐकलीच असेल. एखादे काम जर आपण काही लोकांनी मिळून केले तर ते अगदी कमी वेळात आणि कमी श्रमामध्ये पूर्ण होते.
  • एकाच वेळी एकच काम केल्याने त्या कामावर आपले पूर्ण लक्ष राहते आणि ते काम वेळेत आणि चांगल्या प्रकारे पूर्ण होते.
  • जिथे गरज असेल फक्त तिथेच आपण आपला वेळ दिला पाहिजे आणि उरलेली कामे हि इतरांकडून करून घेतली पाहिजे त्यामुळे तुम्हाला तुमचा वेळ आणखी दुसऱ्या महत्वाच्या कामासाठी देता येईल.
  • इतर लोकांवर विश्वास ठेवायला शिका आणि जेणे करून ते तुमच्यासाठी प्रामाणिकपणे काम करतील.
  • जर आपल्याला माहित आहे कि एखादे काम आपण चांगल्या प्रकारे करू शकतो तर ते काम इतर आपल्या सहकाऱ्यांनाही शिकवा आणि ते काम त्यांच्याकडून योग्य पद्धतीने करवून घ्या. यामुळे असा फायदा होईल कि कमी वेळेत आपले खूप मोठे काम पूर्ण होईल आणि त्याचा मोबदलाही चांगला मिळेल.
  • एकट्याने काम करण्यापेक्षा आपल्या सहकाऱ्यांबरोबर एकत्रित काम केल्याने फायदा हा होतोच.
Why Maximum People Are Not Rich In Marathi |

उत्पन्नाचा दुसरा मार्ग शोधत नाहीत.

  • फक्त नोकरीवर अवलंबून न राहता उत्पन्नाचा आणखी दुसरा मार्ग शोधायला हवा. त्यामुळे income मध्ये वाढ होऊन त्याचा योग्य पद्धतीने वापर करता येतो.
  • नोकरीबरोबरच काही छोट्या मोठ्या व्यवसायात गुंतवणूक करून तो व्यवसाय केला तर नक्कीच त्याचा फायदा भविष्यात होतो.
  • एका उत्पन्नावर आपण कधीच श्रीमंत होणार नाही हे मात्र खरे. त्यामुळे नवनवीन उत्पन्नाचे मार्ग माणसाने सतत शोधात राहायला हवे, यातील प्रेत्येक मार्गातून तुम्हाला पैसे येईलच असे नाही परंतु जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करायला हरकत नाही.

दिखावूपणावर पैसे खर्च करतात.

  • दिखावूपणावर खर्च करत बसू नका. त्यामुळे विनाकारण पैसे खर्च होतात आणि त्याचा हिशोब लागत नाही.
  • हा खर्च निरर्थकच असतो. काही लोकांना सवय असते विनाकारण कपडे खरेदी करणे, नको असलेल्या वस्तू विकत घेणे, काही गोष्टींचा भविष्यात काहीच उपयोग नसला तरीही त्या गोष्टी विकत घेणे यामुळे अनावश्यक खर्च होतो.
  • दिखावूपणावर खर्च कारण्यापेक्षा गरजेच्या वस्तू विकत घ्या आणि उरलेल्या पैशांची योग्य पद्धतीने गुंतवणूक करा.
  • अनावश्यक खर्च होणार पैसे आपल्या व्यवसायात लावला तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.

दूरदृष्टीचा अभाव त्यामुळे मोठा विचार करू शकत नाही.

  • नोकरी व्यतिरिक्त आपण आणखी काय व्यवसाय करू शकतो किंवा इतर काही उत्पन्नाचे साधन निर्माण करू शकतो असा विचार लोक करतच नाही.
  • नोकरीतून मिळणाऱ्या income मध्ये आपण भविष्यातही निभाव लावू शकतो कि नाही हा देखील विचार लोक करत नाही यालाच दूरदृष्टीचा अभाव म्हणतात.
  • पुढे जाऊन आपल्याला जर श्रीमंत व्हायचं जर असेल तर आपल्याला आजच त्यासाठी प्रयत्न सुरु करायला हवे.
  • आज आपण जे काम करणार आहोत त्यावर आपले भविष्य अवलंबून असते, त्यामुळे आपल्या चांगल्या भविष्यासाठी आपल्याला आजपासूनच प्रयत्न करायला हवे.
Why Maximum People Are Not Rich In Marathi |

निष्क्रिय उत्पनाचा पर्याय शोधत नाहीत.

  • आता निष्क्रिय उत्पन्न म्हणजे काय ? तर आपल्या भविष्यात किंवा आपल्या आजच्या व्यवसायात जरी आपण काही वेळ काम केलं नाही काही कष्ट घेतले नाही तरीही या आधी आपण जे काम केले आहे त्यावरच आपलं daily income चालूच राहणार, त्यासाठी आपल्याला सध्या काम नाही केले तरी चालणार आहे.
  • असा उत्पन्नाचा मार्ग शोध कि ज्यात तुम्हाला काहीवेळा नंतर काम नाही केले तरी तुमचे उत्पन्न हे चालूच राहील.

या अश्या काही सवयी आहेत ज्यामुळे लोक श्रीमंत होऊ शकत नाही. परंतु या वाईट सवयीनवर जर योग्य पद्धतीने काम केले तर तुम्हाला नक्कीच यश मिळू शकते आणि श्रीमंतीकडे जाणारी तुमची वाटचाल सुरु होईल.

आपल्याला काही मिळवायचे असेल तर त्यासाठी आपल्यालाच काम करावे लागणार आहे, कोणीही आयते आणून देणार नाही. त्यासाठी कष्ट करण्याची तुमची तयारी असणे तेवढेच आवश्यक असते.

आणखी वाचा : आपल्या वेळेचे नियोजन कसे कराल ? Powerful 10 tips

आणखी वाचा : यशस्वी लोकांच्या 12 चांगल्या सवयी