Qualities of True Friends In Marathi |
अगदी शाळेत गेल्यापासून ते वृद्ध होईपर्यंत अनेक लोकांच्या सहवासात आपण येत असतो. प्रत्येकजण आपला खरा मित्र असतोच असे नाही. खूप लोक आपल्या आयुष्यात येतात आणि जातातही. मग अश्यावेळेस असा तो व्यक्ती कोण आहे जो आपला खरा मित्र असेल. तो कसा ओळखायचा ? आपल्याला ज्या व्यक्तीशी बोलणं छान वाटत तो आपला खरा मित्र असतो का कि आणखी काही अश्या गोष्टी आहेत कि ज्या आपण समजून घ्यायला हव्यात.चला तर मग आज आपण या ब्लॉग Qualities of True Friends In Marathi मध्ये पाहुयात कि आपण आपला खरा मित्र कसा ओळखायचा आणि आपले आयुष्य आणखी चांगले कसे बनवायचे..
- “मित्र गमावण्याची चिंता करू नका कारण खरा मित्र कधीच हरवणार नाही.”
- “जर मैत्री ७ वर्षांपेक्षा जास्त टिकली, तर मानसशास्त्रज्ञ म्हणतात की ती आयुष्यभर टिकेल.”
- “मित्र कोण असतो ज्यांच्यासोबत तुम्ही सर्वाधिक वेळ घालवता तो नाही , तर ज्यांच्यासोबत तुम्हाला सर्वात चांगला वेळ घालवता येतो ते असतात.”
- “कधी कधी तुमच्या सर्वोत्तम मित्रासोबत असणे हिच तुमच्यासाठी मानसिक शांती असते.”
- “फक्त खरा मित्रच तुम्हाला तोंडावर सांगेल की इतर लोक तुमच्या मागे काय बोलत होते.”
- “खरा मित्र म्हणजे तो जो तुमच्या डोळ्यांमधील वेदना पाहतो, जेव्हा इतर सर्वजण फक्त तुमच्या चेहऱ्यावरच हसू पाहत असतात.”
- “सर्वोत्तम मित्र म्हणजे असे लोक जे तुमच्या समस्या त्यांच्या समस्या मानून त्या सोडवण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून तुम्हाला त्या एकट्याने पार कराव्या लागू नयेत.”
- “मजबूत मैत्रीला दररोजच्या संभाषणाची गरज नसते, एकत्र असण्याचीही गरज नसते.”
आणखी वाचा : आपल्या या 7 वाईट सवयीमुळे येते अपयश
Qualities of True Friends In Marathi |
तुमचा करा मित्र तुमच्यापासून कधीही दूर जाणार नाही.
- जो तुमचा खरा मित्र असेल तो कधीही तुम्हाला सोडून जाणार नाही तो सतत तुमच्या जवळपास राहील किंवा तुमच्याशी त्याचा contact होत राहील.
- असा मित्र ज्याला आपल्या व्यतिरिक्त अनेक मित्र भेटले तरीही तो आपल्याला कधीही विसरत नाही.
- इतर लोकांशी जरी तो वेळ घालवत असला तरी जेव्हा कधी तुम्हाला त्याची गरज असेल तेव्हा तो इतरांना सोडून तुमच्याकडेच येईल.
- इतर मित्रांशी बोलताना तुमचा खरा मित्र तुमच्या विषयी कधीही वाईट बोलणार नाही किंवा तुम्हाला दुखावेल असेही वागणार नाही.
मानसशात्रज्ञांच्या म्हणण्यानुसार जी मैत्री कमीत कमी ७ वर्षे टिकेल ती आयुष्यभर टिकते.
- आपण शाळेत असताना आपल्याला काही मित्र बनतात. त्यातील काही मित्र आपलं संपूर्ण शिक्षण होईपर्यंत आपल्याबरोबर असतात. अशा मित्रांना आपल्या बद्दल सर्व काही माहित असते कारण तेवढा वेळ आपण एकमेकांबरोबर घालवलेला असतो.
- ज्या मित्रांना आपल्या सर्व गोष्टी माहित असतात किंवा ज्या मित्रांशी आपण आपले सर्व काही share करत असतो तो आपला खरा मित्र समजावा.
- अशी मैत्री आयुष्यभर टिकते, असे मानसशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
एकमेकांबरोबर घालवलेला वेळ अमूल्य वाटतो.
- आयुष्यात आपल्याला अशा व्यक्ती खूप कमी भेटतात ज्यांच्याशी बोलून आपल्याला मन हलकं झाल्यासारखं वाटत.
- अशा व्यक्तीबरोबर जास्त बोलणं जरी झालं नाही तरी जेवढा वेळ घालवू तो खूप चांगला वाटतो.
- मनस्थिती कशीही असली तरी ज्या व्यक्तीबरोबर वेळ घालवल्यावर आपल्याला बरे वाटू लागते तोच खरा मित्र.
- ज्या गोष्टी आपण आपल्या घरच्यांशी share करू शकत नाहीत त्या गोष्टी आपण फक्त आपल्या खऱ्या मित्रालाच सांगू शकतो.
- घरातील वाद किंवा त्या वादांबद्दलचे घ्यायचे निर्णय हे आपल्या मित्राशी बोलून आपण सोडवू शकतो आणि आपल्यावरचा आलेला ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो.
आणखी वाचा : आपल्या वेळेचे नियोजन कसे कराल ? Powerful 10 tips
आणखी वाचा : यशस्वी लोकांच्या 12 चांगल्या सवयी
Qualities of True Friends In Marathi |
ज्या व्यक्तीचा सहवास आपल्या मनात शांत ठेवतो तो मित्र.
- काही व्यक्ती असे असतात ज्यांच्याबरोबर आपण वेळ घालवला कि काहीवेळानंतर आपली चिडचिड व्हायला सुरुवात होते कारण त्याच्याशी एकतर आपले विचार जुळत नाही आणि त्या व्यक्तीने आपल्या विरुद्ध बोलले कि ते आपल्याला सहन होत नाही.
- आपला जो मित्र असतो तो नेहमी आपल्याला कुठलीही गोष्ट दुखावणार नाही याची काळजी घेतो पण जर आपण चुकीचे असू तर तो आपल्याला त्या गोष्टी व्यवस्थित समजावून देखील सांगतो.
आपल्या मागे आपल्या बद्दल काय बोलला जाते या बद्दल फक्त आपला मित्रच आपल्याला सांगू शकतो.
- आपल्या एखाद्या गोष्टीबद्दल लोक काय विचार करत आहेत हे स्पष्ट शब्दात फक्त आपला मित्रच आपल्याला सांगत असतो. बाकी कुणाला काहीच घेणंदेणं नसत कि तुमची image चांगली आहे कि वाईट. कारण ते लोक तुमच्या मागे तुमच्याबद्दल वाईटच सांगत असतात इतर लोकांजवळ.
- पण तुमचा खरा मित्र तुम्हाला त्या गोष्टीची जंव करून देईल आणि त्या चुका सुधारण्याबद्दल तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन देखील करेल.
- आणि तुम्ही जर चुकीचे नसाल आणि तरीही लोक तुमच्याबद्दल वाईट बोलत असतील तर तुमचा मित्र त्या लोकांनाही उत्तर देईल आणि तुम्हालाही आधार देईल.
दुःख पोटात ठेवून तुम्ही इतरांसमोर हसत असाल तर ते फक्त तुमचा खरा मित्रच ओळखू शकतो.
- इतर लोकांसमोर तुम्ही तुमचे दुःख लपवून त्यांच्या साठी खुश आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत असाल तर ते तुमच्या मित्रांशिवाय कुणाच्याही लक्षात येणार नाही.
- तुम्ही तुमचे दुःख कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी तो तुमच्या मित्राला कळणार नाही असे होणार नाही तो एका नजरेत तुम्हाला ओळखेल.
- तुमच्या दुःखाचे निवारण करायला तो कायम तुमच्या सोबत असेल.
- आपल्या हसण्यामागचं दुःख ज्याला न सांगता ओळखता येत आणि मी आहे सर्व काही ठीक होईल असे म्हणत आपल्याला धीर देतो तोच आपला खरा मित्र असतो.
- आपल्या कुटुंबात काही वाद झाले असेल म्हणून त्या बद्दल आपल्याला दुःख झाले असेल तर ते आपल्या मित्राला लगेच समजते आणि आपल्याला आधार देऊन त्याबद्दलचे solution मिळवायला हि तो आपल्याला मदत करतो
तुमच्या समस्या या त्याच्या समस्या आहेत असे ते मानतात.
- तुमचे खरे मित्र तुमच्या प्रत्येक समस्येत तुमच्या सोबत असतात. तुम्हाला जास्त त्रास होणार नाही याची काळजी तुमचा मित्र घेत असतो.
- त्या समस्येचा सगळा भार तुमच्यावर येणार याची याची काळजी तुमचा मित्र घेत असतो. जेणे करून त्या समस्या सोडवताना तुम्हाला काही त्रास होणार नाही.
- हे सगळं करताना त्या मित्राची काही विशेष अपेक्षाही नसते कि तुम्हीही त्याच्यासाठी काही केलंच पाहिजे.
- निस्वार्थ पणे जी व्यक्ती आपल्या प्रत्येक समस्येत आपल्या बरोबर खंबीरपणे उभी असते तोच आपला खरा मित्र.
- खरा मित्र तोच जो आपल्या सुखाच्या काळात भलेही आपल्या सोबत नसेल पण तो आपल्या वर ओढावलेल्या संकटाच्या, दुःखांचा भागीदार असतो. सुखात आपल्या सोबत आणि दुःखात आपल्या पुढे जो उभा राहतो तोच खरा मित्र.
Qualities of True Friends In Marathi |
आपला खरा मित्र दररोज आपल्या सोबतच असतो असे नाही.
- खरा मित्र दररोज आपल्या बरोबरच असणे गरजेचे नाही, आजकालच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण हा कुटुंब, काम या गोष्टींमध्ये व्यस्त असतो.
- प्रत्येकवेळी आपल्या मित्रांशी आपली भेट होईलच असे नाही, प्रत्येकजण आपल्या वैयक्तिक जीवनात गुरफटलेला असतो.
- परंतु त्यामुळे मैत्रीचं असलेलं आपलं नातं फार काळ न भेटल्यामुळे ही त्यातील आपुलकी, माया कमी होत नाही.
अशा प्रकारे आपण आपला खरा मित्र ओळखू शकतो आणि त्याच बरोबर आपण आपले स्वतःचेही आत्म परीक्षण करायला हवे कि आपणही त्या व्यक्तीचे खरे मित्र आहोत कि नाही. मैत्रीत फक्त घ्यायचं नसत तर द्यायचं हि असत, तरच ती मैत्री टिकते.
प्रयत्न किंवा आपुलकी किंवा देण्याची वृत्ती जर दोन्ही बाजूने असेल तरच ते नातं टिकत नाहीतर ते नातं तुटायला वेळ लागत नाही. त्यामुळे जर तुम्हाला असा आपला खरा मित्र जर भेटला असेल तर ती मैत्री टिकवण्याचा प्रयत्न हा आपल्याकडूनही व्हायला हवा. मित्रांना जपा आणि आयुष्य अधिक चांगले होईल याची प्रचिती तुम्हाला मिळेल.