Real Fact of Life In Marathi | जीवनातील 10 वास्तव गोष्टी

Real Fact of Life In Marathi |

आपल्या आयुष्याबद्दल असे काही सत्य आहेत जे आपल्याला माहित तर असतात पण ते आपण खरे आहेत हे मान्य करायला तयार नसतो. असे खूप काही चेहरे असतात लोकांचे ज्यापासून आपण वंचित आहोत आज या ब्लॉग Real Fact of Life In Marathi मध्ये आपण त्या बद्दलच माहिती मिळणार आहोत..

  • “या जगात कोणीही खरे नसते; प्रत्येकाचे दोन चेहरे असतात.”
  • “बहुतांश लोक व्यक्तीला नाही, पैशाचा आदर देतात.”
  • “ज्याच्यावर तुम्ही सर्वात जास्त प्रेम करता, तोच तुम्हाला सर्वात जास्त दुखावतो.”
  • “जेव्हा तुम्ही आनंदी असता, तेव्हा तुम्ही संगीताचा आनंद घेता, पण जेव्हा तुम्ही दुःखी असता, तेव्हा गाण्याचे शब्द समजून घेण्याचा प्रयत्न करत असता..”
  • “जीवनात दोन गोष्टी तुम्हाला तुमच्याबद्दल सांगतात, जेव्हा तुमच्याकडे काहीही नसते तेव्हा तुमचे संयम आणि जेव्हा तुमच्याकडे सर्वकाही असते तेव्हा तुमचा दृष्टिकोन.”
  • “तुलना करून आपण आपला आनंद गमावतो, तुमच्या स्वतःच्या प्रवासावर आणि कर्तृत्वावर लक्ष केंद्रित करा.”
  • “अपयश तुम्हाला सगळ्यांसमोर अपमानित करते, यश तुम्हाला अंतर मनातून आनंद देते.”
  • “वेळ सर्व काही गोष्टी ठीक करत नाहीत, तर वेळ हि तुम्हाला त्या दुःखाबरोबर जगायला शिकवते.”
  • “विश्वास सर्व काही असतो, पण तो एकदमच टूटल्यावर, तुमच्या sorry शब्दालाही किंमत नसते.”

आणखी वाचा : आपला खरा मित्र कोण ? कसे ओळखाल ? 10 qualities..

Real Fact of Life In Marathi |

“या जगात कोणीतीही व्यक्ती खरी नसते, प्रत्येक व्यक्तीचे दोन चेहरे असतात.”

  • कुठलीही व्यक्ती हि इतरांसमोर एक असते आणि स्वतःत असते तेव्हा ती वेगळा विचार करणारी असते.
  • व्यक्ती आपल्याला काय वाटते हे कधीच कोणाशी लवकर बोल्ट नाही खूप काही गोष्टी असतात तो आपल्या मनात फक्त स्वतःशीच share करणं त्याला आवडत असत.
  • कुणीतरी म्हटलंय कि माणूस हा साखर किंवा मीठ नाही कि जो कायम एकसारखाच वागेल, वेगवेगळ्या परिस्थितीत तो वेगवेगळेच वागणार आहे, हा मानवी स्वभाव आहे आणि यात काहीच चूक नाही.
  • वयानुसार माणसाच्या priority बदलतात आणि त्यानुसार मानुस हि बदलत जातो हा दोष त्याचा नाही त्याच्या परिस्थितीचा असतो.

” आजकाल लोक आपल्या जवळच्या व्यक्तीला नाही तर पैशाला जास्त महत्व देतात.”

  • जगात खूप लोक तुम्हाला असे भेटतील कि त्यांना पैसा जास्त महत्वाचा वाटतो.
  • आपल्या जवळच्या लोकांपेक्षा असे लोक पैशाला जास्त महत्व देतात.
  • आजकाल पैशाशिवाय काही होत नाही हेही खरे आहे पण माणसाच्या भावना हि तेवढ्याच महत्वाच्या असतात.
  • आपल्या जवळच्या व्यक्तींना आपण वेळ आणि सन्मान आपण द्यायलाच हवा. आपल्या जवळच्या माणसांमधील प्रेम हे कुठल्याही तराजू मध्ये मोजता जरी येत नसेल तरी त्याची किंमत पैशापेक्षा नक्कीच जास्त आहे.

“तुम्ही ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करता तीच व्यक्ती तुमच्या दुःखाचे कारण असते.”

  • आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करतो ती व्यक्ती कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपल्या दुःखाचे कारण बनते.
  • आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करत असतो तिच्या बद्दल आपण खूप जास्त संवेदनशील असतो, ती व्यक्ती कधीही आपल्यापासून दूर जाऊ नये असे आपल्याला वाटत असते. त्या व्यक्तीला काहीही इजा झाली तर त्याचा त्रास आपल्यालाही होतो.
  • आपले कुटुंब आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीशी आपले नाते हे असेच असते, कुटुंबासाठी व्यक्ती काहीही करायला किंवा कुठल्याही संकटाशी सामना करायला नेहमीच तयार असतो. कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीला काही त्रास असेल तर त्याचे दुःख आपल्यालाही होत असते. आपल्या कुटुंबासाठी व्यक्ती खूप जास्त संवेदनशील असतो.

Real Fact of Life In Marathi |

” जेव्हा तुम्ही दुःखी असता तेव्हा तुम्ही गाण्यातील शब्दांचा जास्त विचार करता.”

  • प्रत्येक व्यक्तीला संगीत तर आवडतच असते. संगीत ऐकत असताना आपला मूड जसा असेल त्या प्रकारचे संगीत ऐकायला प्रत्येक व्यक्तीला आवडते.
  • जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा आपण आनंदात संगीत ऐकतो तेव्हा आपण खूप जास्त भावनिक होऊन संगीत ऐकत नाही, परंतु जेव्हा आपण दुःखी असतो आणि दुःखी संगीत ऐकतो तेव्हा त्या गाण्यातील प्रत्येक शब्दाला आपण मनापासून अनुभवत असतो. त्या गाण्यातला त्या संगीतातला प्रत्येक शब्द आपल्या काळजात खोलवर घुसतोय याची जाणीव आपल्याला होते.
  • दुःखी असताना आपण जे संगीत ऐकतो त्या संगीतातील त्या गाण्यातील प्रत्येक शब्दाला आपण आपल्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतो किंवा आपल्या दुःखाची त्या गाण्यातील प्रत्येक शब्दाशी आपण तुलना करत असतो. दुःखी असतानाच खरं तर आपण ते संगीत मनापासून आणि त्याचा संबंध स्वतःच्या दुःखाशी जुळवून ते ऐकत असतो. तेव्हा आपल्याला ते संगीत खूप आवडत.
  • सांगण्याचा उद्देश एवढाच कि आपले मन हे त्या परिस्थितीशी अनुकूल अश्याच गोष्टीत जास्त रमते, जर आपण आनंदी असू तर खूप खोलवर विचार करत नाही आणि आहे त्या गोष्टीत रमते आणि याउलट जेव्हा आपण दुःखी असतो तेव्हा एखादी छोट्यात छोटी गोष्टही आपल्या मनाला लागून जाते आणि त्यात आपण खूप जास्त विचार करत बसतो.

“जीवनात दोन गोष्टी तुम्हाला तुमच्याबद्दल चे सत्य सांगत असतात, जेव्हा तुमच्याकडे काहीही नसते तेव्हा तुमचे संयम आणि जेव्हा तुमच्याकडे सर्वकाही येते तेव्हा तुमच्या मध्ये असणारा दृष्टिकोन.”

  • आयुष्यात संयम खूप महत्वाचा असतो. संयम आणि सातत्य या आपल्या आयुष्यातील अविभाज्य गोष्टी आहेत. जेव्हा आपल्याकडे काहीही नसते आणि हलाखीच्या परिस्थितीत आपण राहत असेल तर संयम आणि सातत्य या गोष्टी खूप महत्वाच्या असतात, एक दिवस हे दिवस बदलून चांगले दिवस येतील या गोष्टीचा विश्वास माणसाला संयम ठेवायला मदत करतो.
  • जेव्हा आपल्याकडे सर्व काही आहे तेव्हा आपला बाकी सर्वांकडे किंवा आपल्या वर्तमान आणि भविष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप महत्वाचा असतो. हा दृष्टिकोन आपल्याला राजा हि बनवू शकतो आणि रंक हि बनवू शकतो.
  • या दोन गोष्टी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात खूप जास्त महत्वाच्या असतात. या वरूनच ठरते कि तुम्ही व्यक्ती म्हणून कसे आहात.

” कुणाशीही स्वतःची तुलना करू नये त्यातून आपल्याला फक्त दुःखच वाट्याला येत.”

  • तुलना करणे हि माणसाची सर्वात वाईट सवय आहे. माणसाने कधीही कुठल्याच इतर व्यक्तीशी आपली तुलना करू नये.
  • आपल्याकडे जे आहे त्यानं माणसाने खुश राहायला हवे, जे नाही त्या गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न जरूर करावे पण त्या गोष्टीसाठी तिष्ठत बसू नये, त्या साठी प्रामाणिक प्रयत्न करून संयम आणि सातत्य ठेवावे.
  • तुलना करून मनुष्य आणखी दुःखी होत जातो आणि खचतो. त्या पेक्षा आपल्या चांगल्या भविष्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे केव्हाही चांगलेच.
Real Fact of Life In Marathi |

“अपयशाळामुळे आपल्याला सर्वांसमोर अपमानित व्हावं लागत आणि जेव्हा यश मिळते तेव्हा आपले मन सुखावते.”

  • अपयश हि यशाची पहिली पायरी असली तरी अपयश व्यक्तीला सगळ्या समोर अपमानित करत असते किंवा तशी भावना आपल्या मध्ये निर्माण होते. परंतु त्या कडे लक्ष न देता आपण आपण यशस्वी कसे होणार यावर आपले लक्ष केंद्रित करायला हवे.
  • यश मिळाले कि आपण त्यामागे केलेले प्रयत्न आणि अथक परिश्रम आपल्याला मनातून सुखावते. या यशासाठी केलेले काम आणि त्यासाठी कितीवेळ पचवलेले अपयश सर्व काही आठवून आपल्या मनाला आनंद देत असते.

“वेळ आपल्याला सतत कुठल्याही परिस्थितीत कसे आनंदी राहायचे हे शिकवत असते.”

  • वेळेनुसार आपण दुःख विसरतो असे नसते तर वेळ आपल्याला अश्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिकवत असते.
  • एखाद्या घटनेने जर आपण दुःखी झालेले असू तर वेळ नुसार आपण ते दुःख बाजूला सारून नव्याने जगायला सुरुवात करतो असे करताना आपण ते दुःख काय होत ते विसरत नसतो तर ते दुःख असतानाही जगायचे कसे हे वेळेनुसार आपण शिकत जातो.

” विश्वासघात होण्याची भावना अत्यंत दुःखदायक असते.”

  • जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर खूप जास्त विश्वास ठेवतो आणि तो व्यक्ती आपला विश्वास घात करतो तेव्हा त्या व्यक्तीने नंतर कितीही मन मिळवणी करण्याचा प्रयत्न केला तरीही पुन्हा तसा विश्वास त्या व्यक्तीवर ठेवणे खूप कठीण होते.
  • पहिल्यासारखा विश्वास आपण त्या व्यक्तीवर कधीच ठेवू शकत नाही. त्यामुळे विश्वास ठेवणे आपण विश्वास राखणे खूप महत्वाचे आहे.