Improve Your Personality In Marathi |
व्यक्तिमत्व विकास हा आयुष्याचा एक अविभाज्य भाग झालेला आहे. त्यामुळे आपले व्यक्तिमत्व सतत चांगले राहावे यासाठी आपल्याला काही प्रयत्न करावे लागतात. आपल्या काहीगोष्टींवर नियंत्रण ठेवावे लागते ते नेमकं कस आणि कोणत्या गोष्टींवर नियंत्रण ठेवायचं हे आपण आज या ब्लॉग Improve Your Personality In Marathi मध्ये पाहणार आहोत.
- जेव्हा तुम्ही एकटे असाल तेव्हा स्वतःच्या विचारांवर आपला ताबा असणे गरजेचे आहे.
- जेव्हा आपण आपल्या मित्रांबरोबर असू तेव्हा आपले आपल्या बोलण्यावर नियंत्रण असायला हवे.
- जेव्हा आपण खूप रागात असू तेव्हा आपले आपल्या निर्णयांवर नियंत्रण असायला हवे.
- जेव्हा आपण ग्रुप मध्ये बसलेले असू तेव्हा आपल्या वागण्यावर आपले लक्ष्य असायला हवे.
- जेव्हा तुम्ही एखाद्याची स्तुती करता तेव्हा आपल्या गर्वावर आपले नियंत्रण असायला हवे.
- जेव्हा कोणी आपल्याबद्दल वाईट बोलतं असतो तेव्हा आपले आपल्या भावनेवर नियंत्रण असायला हवे.
आणखी वाचा : जीवनातील 10 वास्तव गोष्टी
आणखी वाचा : आपला खरा मित्र कोण ? कसे ओळखाल ? 10 qualities..
Improve Your Personality In Marathi |
एकटे असताना आपण आपल्या विचारांवर ताबा कसा आणि का ठेवावा ??
- जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आपण खूप साऱ्या गोष्टींचा विचार करत असतो. आपल्या डोक्यामध्ये बऱ्याच गोष्टींचे जाळे निर्माण होत असते.
- जेव्हा आपण विचार करत असतो तेव्हा नेहमी आपण वाईट गोष्टींचाच जास्त विचार करतो, एकटे असताना आपण कधीही चांगला विचार करत नाही. त्यामुळे आपली नकारात्मकता वाढत जाते आणि हेच सर्वात महत्वाचं कारण असत आपले व्यक्तिमत्व खराब होण्यामागे.
- त्यामुळे जेव्हा पण आपण एकटे असू तेव्हा एकतर काहीतरी संगीत ऐका किंवा काहीतरी movies पहा नाहीतर स्वतःला कुठल्याही कामात व्यस्त ठेवा.
- एकटे राहणे हि काही वेळेस खूप महत्वाचे असते. अशावेळेस आपण स्वतःला वेळ देतो आणि स्वतःसाठी करायची जी कामे आपण मागे राहून देतो ती करण्याला वेळ मिळतो.
- एकटे असल्यावर meditation केल्यानेही तुम्हाला खूप हलकं झाल्यासारखं वाटेल त्यामुळं meditation करणे हा हि एक पर्याय आहे नकारात्मक विचार दूर ठेवण्यासाठी.
मित्रांशी बोलताना नेहमी विचार करूनच बोलावे.
- आपण जेव्हा मित्रांसोबत बसलेलो असतो तेव्हा आपण अनेक विषयांवर चर्चा करत असतो. तेव्हा आपले मत मांडताना नेहमी त्याबद्दल विचार करूनच आपले विचार मांडावे. एकावेळी गप्प राहणे चांगले असते पण चुकीचे विचार मांडल्यामुळे आपले impression इतरांसमोर खराब होऊ शकते.
- आपल्याला ज्या विषयाचे ज्ञान असेल तेव्हाच त्याबद्दल आपले विचार मांडायला हवे नाहीतर गप्प राहून त्याबद्दल त्याबद्दल इतरांकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. हे एक चांगल्या व्यक्तिमत्वाचे उदाहरण आहे.
- प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान असणे कठीण आहे, त्यामुळे त्याबद्दल ज्या व्यक्तीकडे अधिक माहिती असेल त्या व्यक्तीकडून त्या विषयाबद्दल जाणून घ्या. आणि आपणही बोलताना नेहमी विचार करून नम्रतेने बोलायला हवे.
Improve Your Personality In Marathi |
रागात असताना कधीही निर्णय घेऊ नये.
- व्यक्ती जेव्हा हि रागात असतो तो योग्य निर्णय घेऊ शकत नाही त्यामुळे अशा वेळी महत्वाचे निर्णय घेणे टाळावे.
- रागात असताना आपण आपल्या बुद्धीचा वापर करत नाही आणि भावनेच्या भरात निर्णय घेतो त्यामुळे ते निर्णय नेहमी चुकीचेच असतात, त्या निर्णयांबद्दल योग्य तो विचार केलेला नसतो.
- राग हा माणसाचा शत्रू असतो, तो कधीही माणसाचे चांगले होऊ देत नाही, त्यामुळे शक्य होईल तेवढा राग कमी करावा.
- राग माणसाचे विचार control करण्याचा प्रयत्न करत असतो, राग आलेला असेल तर व्यक्ती कधीही चांगला विचार करू शकत नाही, त्याने नकारात्मकता वाढते.
- नकारात्मक भावनेने कुठलेही महत्वाचे निर्णय घेणे चुकीचे आहे. त्यामुळे माणसाचे आर्थिक नुकसान तर होतेच त्याबरोबर मानसिक नुकसानही होते, कारण आर्थिक नुकसानीमुळे माणसाला अधिक tension यायला लागते आणि आपल्याकडून एवढे मोठे नुकसान झाले या गोष्टीचा पश्चाताप हि होतो.
- आजपर्यंत रागात घेतलेल्या निर्णयामुळे कुणाचे भले झाले असे कोणतेही उदाहरण आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे कुठलेही महत्वाचे निर्णय घेताना आधी दहा वेळेस विचार करावा आणि त्याच बरोबर आपली मनःस्थिती चांगली असेल आणि आपण योग्य निर्णय घेण्यास पूर्णपणे तयार आहोत कि नाही याचा विचार करूनच निर्णय घ्या.
एकत्र ग्रुप मध्ये बसलेले असताना आपण काय वागतोय यावर लक्ष्य असायला हवे.
- इतरांसमोर आपण कस वागतोय किंवा आपले impression कसे पडत आहे याकडे आपण नेहमी लक्ष द्यायला हवे.
- जेव्हा आपण ग्रुप मध्ये बसलेले असू तेव्हा आपल्या पैकी कोणीतरी असं असत ज्याचं वागणं, बोलणं, बसणं आपल्याला प्रभावित करत असतं. ह्याच त्या बाबी असतात ज्या आपल्यानं इतरांपेक्षा वेगळे असण्याचा अनुभव देतात. हाच तर असतो व्यक्तिमत्त्व विकास जो आपल्याला इतरांपेक्षा वेगळा आहे असे दाखवतो आणि इतर लोकांवर आपले impression पाडतो.
- इतर लोकांसमोर आपण जर over confidence मध्ये जास्त काही बोललो आणि ते अतिशय चुकीचं असेल तर इतरांसमोर आपलं वाईट impression पडणार आणि तेच लोक आपल्याला इतर वेळेस टाळण्याचा प्रयत्न करणार हे नेहमी लक्षात ठेवा.
- आपण ग्रुप मध्ये असताना काय आणि किती बोलतोय याकडे आपलं नेहमी लक्ष असायला हवे त्यामुळे आपल्या बोलण्यावर इतर लोक विश्वास ठेवतात आणि आपल्याकडून काही महत्वाच्या गोष्टींमध्ये आपले मत काय आहे हे विचारतात.
कुणाचीही स्तुती करत असताना आपल्यात असणारा गर्विष्ठपणा दूर ठेवावा.
- काही व्यक्तींना सवय असते फक्त नावासाठी एखाद्याची स्तुती करायची मनातून त्याला तस काही वाटत नसत, यातून त्या व्यक्तीचा गर्विष्ठ पण दिसून येतो.
- गर्विष्ठ लोक सहसा कोणावर प्रभावित होत नाहीत, ते स्वतःलाच सर्वांपेक्षा जास्त हुशार समजत असतात, असे लोक नेहमी इतरांची तुलना करत असतात, प्रत्येक गोष्ट ते तुलना करूनच पाहतात.
- अश्याने त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होत नाही, इतर लोक त्यांना कधीही चांगले म्हणत नाही आणि नेहमी अश्या व्यक्तीपासून इतर लोक दूर राहण्याचा प्रयत्न करत असतात.
- जेव्हा लोक आपल्यापासून दूर जायला लागतात तेव्हा समजून जायचं कि आपलं कुठंतरी चुकतंय. त्यासाठी आपल्या काही सवयीनमध्ये बदल करायला हवे.
- इतरांची स्तुती करताना नेहमी हि गोष्ट लक्षात ठेवा कि ती स्तुती मनापासून आपल्याला जर वाटत असेल तर करा नाहीतर उगाच एखाद्याला दाखवण्यासाठी करू नका. हि गोष्टी सर्वांच्या लक्षात येते आणि आपलं impression खराब होते.
Improve Your Personality In Marathi |
आपल्याबद्दल जेव्हा कोणी काही वाईट बोलत असेल तर लगेच त्यांना प्रत्युत्तर देऊ नये, संयम पाळावा.
- जेव्हा कोणी आपल्याबद्दल बोलत असेल तर शांततेत ते ऐकून घ्यावे आणि नंतर त्या बद्दल विचार करावा कि ते जे बोलले तर खरंच बरोबर आहे का कि ते आपल्यावर जाळतात त्यामुळे असे काही बोलत असतील.
- आणि जर त्यांचं बोलणं खरंच बरोबर असेल तर आपण त्याबद्दल अधिक विचार करून त्यात बदल करायला हवे, त्याने आपले व्यक्तिमत्व सुधारायला आणखी मदत होईल.
चांगले व्यक्तिमत्व हि आजकाल सर्वात महत्वाची गोष्ट बनली आहे. प्रत्येक क्षेत्रात आपले व्यक्तिमत्व जर चांगले असेल तरच आपल्याला demand आहे. आपण कुठेही गेलो तरी आपले व्यक्तिमत्व हे सर्वांमध्ये उठून दिसते त्यामुळे आपल्या कडे पाहून इतर लोकांना आपल्याशी बोलण्याची किंवा आपल्याबरोबर वेळ घालवण्याची अधिक इच्छा निर्माण होते.
अशा प्रकारे आपण आपले व्यक्तिमत्व घडवण्यासाठी काही सवयी बदलू शकतो. व्यक्तिमत्व विकास करायचा असेल तर या website मध्ये आणखी काही असे आर्टिकल्स तुम्हाला पाहायला मिळतील जे तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्व घडवायला नक्कीच मदत करतील, त्याबद्दलची लिंक खाली दिली आहे नक्की वाचा.
आणखी वाचा : आपल्या वेळेचे नियोजन कसे कराल ? Powerful 10 tips
आणखी वाचा : यशस्वी लोकांच्या 12 चांगल्या सवयी