Self Respect Tips In Marathi | आत्मविश्वास वाढण्यासाठी 6 खास टिप्स

Self Respect Tips In Marathi |

आत्मविश्वास हा आपल्या व्यक्तिमत्व विकासाचा महत्वाचा भाग आहे. त्यामुळे आपल्याला स्वतःवर आत्मविश्वास असणे खूप गरजेचे असते. व्यक्तिमत्व हे आपल्याला गर्दीमध्ये सुद्धा वेगळे असल्याचा आनंद देते. आपण गर्दीचा हिस्सा नसून त्यातून एक वेगळे व्यक्तिमत्व आहोत हि भावना खूप महत्वाची असते. या ब्लॉग Self Respect Tips In Marathi मध्ये आपण आपला आत्मविश्वास वाढण्यासाठी काय करावे याबद्दल काही टिप्स पाहणार आहोत.

  • फक्त बोलू नका, कृती करा..
  • दुसऱ्यांसमोर आपण वेगळे आहोत असे दाखवू नका..
  • आपले secrets कुणाशीही share करू नका..
  • कुणावरही अवलंबून राहू नका.
  • वेळेला महत्व द्या…
  • कुणावरही लगेच विश्वास ठेवू नका..
  • सकाळी लवकर उठून व्यायाम करा..

आणखी वाचा : आयुष्यात व्यक्तिमत्व चांगले बनवायचे असेल तर या 6 गोष्टींवर नियंत्रण ठेवा

आणखी वाचा : आपला खरा मित्र कोण ? कसे ओळखाल ? 10 qualities..

Self Respect Tips In Marathi |

गरजेल तो पडेल काय आणि बोलेल तो करेल काय

  • काही लोकांना खूप सवय जाते फक्त बडबड करायची. अशी लोकं फक्त बोलतात करत काहीच नाही. अश्या लोकांमध्ये फक्त बोलण्यातच विश्वास असतो पण प्रत्यक्ष कृती ते करू शकत नाही कारण त्यांच्यात तेवढा आत्मविश्वास नसतो. अश्या लोकांना हि म्हण अगदी योग्य ठरते ” गरजेला तो पडेल काय आणि बोलेल तो करेल काय” ..
  • आपल्या बाबतीत असे होऊ नये याची काळजी आपण घ्यायला हवी. आपण जे करू शकतो तेवढेच माणसाने बोलावे किंवा बोलण्या पेक्षा प्रत्यक्ष कृती करून दाखवावी.
  • त्यामुळे इतरांच्या नजरेत आपली एक image निर्माण होते आणि आपल्याला हि आत्मविश्वास येतो.

आपल्याला सर्व काही माहित आहे असे इतरांना दाखवू नये.

  • इतरांना कमीपणा दाखवून आपण खूप स्मार्ट आहोत असे कधीही दाखवू नये त्यामुळे इतर लोक आपल्या मागे आपल्या बद्दल वाईट बोलायला सुरवात करतात.
  • ग्रुप मध्ये असताना काही लोकांना सवय असते कि फक्त मी जे सांगतोय तेच खर आहे आणि इतरांना कमीपणा दाखवतात. खरं तर त्याच व्यक्तीला त्या विषयाबद्दल अर्धवट माहिती असते. त्यामुळे तो व्यक्ती सर्वांच्या विनोदाचा भाग बनतो.
  • आपल्या बाबतीत तसे होऊ नये याबद्दल आपण काळजी घ्यायला हवी. आपल्याला पूर्म माहिती असल्याशिवाय कुठल्याही विषयाबद्दल आपले मत मांडू नये.
  • आपल्याला स्वतःला इतरांपेक्षा वेगळे दाखवण्याची गरज नसते. आपले व्यक्तिमत्व सुधारण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वाची छटा सर्वांवर पडते आणि इतरांपेक्षा आपण वेगळे आहोत हे आपोआपच घडून येते.
  • व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी आपल्या शरीरावर अधिक काम करायला हवे.

आपली गुपिते कुणाशीही share करू नका.

  • आपल्या खाजगी गोष्टी कुणालाही सांगू नका अगदी आपल्या मित्रालाही सांगू नका.
  • आपल्या खाजगी गोष्टी जेव्हा आपण इतर कुणाशी share करतो तेव्हा ते त्याचा गैरवापरही करू शकतात आणि आपल्याला demotivate करण्याचा प्रयत्न करू शकतात त्यामुळे आपले weak points किंवा काही खाजगी गोष्टी या कुणालाही सांगू नये.
  • आपण इतर लोकांना नेमकं काय सांगतोय यावर आपले सतत लक्ष असायला हवे नाहीतर ओघात येऊन आपण आपल्याबद्दल च्या सर्व महत्वाच्या गोष्टी इतरांना सांगून बसतो आणि त्यामुळे आपण नंतर अडचणीत येऊ शकतो.
  • आपले मत मांडताना आपण आपल्या खाजगी गोष्टींचे उदाहरण नाही द्यायला पाहिजे त्यामुळे लोक आपल्याला judge करायला सुरुवात करतात.

कुठल्याही गोष्टीसाठी सामोरच्या वर अवलंबून राहू नये.

  • नेहमी आपल्या गोष्टी आपणच पूर्ण कराव्यात त्या साठी कोणी येऊन आपल्याला मदत करेल किंवा तो ती गोष्ट पूर्ण करेल यावर या अवलंबून राहू नये.
  • असे केल्याने आपण आळशी होतो आणि समोरचा ते काम करेलच याची शाश्वती नसते त्यामुळे ते काम अपूर्ण राहू शकते.
  • आपण स्वतः एवढे काबील बणा कि इतरांची आपल्याला गरज पडणार नाही, त्यासाठी खूप मेहनत करावी लागते आणि ती करायलाच हवी तर आपण इतरांसमोर एक उदाहरण बनून उभा राहू शकतो.
  • इतरांवर अवलंबून राहिलो तर ते काम वेळेत पूर्ण होणार नाही आणि आपणही त्या कामासाठी अडकून राहतो, त्यामुळे इतर महत्वाच्या गोष्टीही कडून राहतात त्यामुळे स्वतः कामे करा कोणीतरी येऊन आपल्याला मदत कारेन या आशेवर राहू नका. प्रत्येकाला आपापली महत्वाची कामे असतात आणि कोणी आपल्यासाठी काहीही करायला तयार नसतो.

Self Respect Tips In Marathi |

नेहमी वेळेला प्राधान्य द्या.

  • कुठलीही गोष्ट हि त्या ठरलेल्या वेळेत च पूर्ण होईल याकडे लक्ष देत जा. प्रत्येक गोष्ट जर ठरलेल्या वेळेत पूर्ण होत गेली तर मोठं मोठे कामही आपल्याकडून पूर्ण होते.
  • त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो आणि आणखी जोमाने वेगवेगळी कामे करायला आपल्याला हुरूप येतो. त्यातूनच आपली प्रगती होत असते.
  • वेळ खूप महत्वाची आहे आणि एकदा वेळी गेली तर पुन्हा ती येणार नाही हे सर्वानाच माहित असले तरी आपण आळशीपणा करून ते काम नंतर करू असे म्हणतो पण तसे केल्याने आपले काम कधीच पूर्ण होऊ शकत नाही आणि आपण कधीही प्रगती करू शकणार नाही त्यामुळे आपला आत्मविश्वासही वाढणार नाही.
  • आपली कामे किंवा आपल्या जवळच्या लोकांनी सांगितलेली कामे हि त्या ठराविक वेळेत च पूर्ण होतील याकडे लक्ष असू द्या त्यामुळे वेळी वाया जात नाही आणि आपले कामही व्यवस्थित पूर्ण होते त्याचबरोबर त्या समोरच्या व्यक्तींचाही आपल्यावर विश्वास निर्माण होतो. त्यामुळे सगळ्यांमध्ये आपली respect वाढण्यास सुरुवात होते आणि लोक आपल्याला अधिक मन द्यायला लागतात, महत्वाच्या कामांमध्ये आपल्याविषयी निदान चर्चा तरी व्हायला लागते.

अगदी आपल्या मित्रावरही लगेच विश्वास ठेवू नये.

  • आपण ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवत आहे तो त्या पात्र आहे कि नाही याची खात्री नेहमी करत जा. कारण आपण खूप विश्वासाने महत्वाच्या गोष्टी जर एखाद्या व्यक्तीशी share केला आणि त्याने आपला घात केला तर आपण पुन्हा कुणावरही विश्वास ठेवू शकत नाही.
  • त्यामुळे लगेच कुठल्याही व्यक्तीवर विश्वास ठेवू नये. आधी त्या व्यक्तीबद्दल जाणून घेत जा. तो खरंच त्या लायकीचा आहे कि नाही याच खात्री करूनच त्याच्याशी काही गोष्टी share करत जा.
  • मित्र कितीही जवळचा असू द्या पण वेळेनुसार प्रत्येकाची priority बदलत जाते त्यामुळे आपला आजचा खास मित्र काही ठराविक दिवसांनंतरही आपल्यासाठी खासच राहील याची शाश्वती कधीच नसते त्यामुळे आज आपण आपल्या बद्दल त्या मित्राला सांगितले तर उद्या तो त्याचा फायदा घेणार नाही याची खात्री नसते.
Self Respect Tips In Marathi |

दररोज व्यायाम करा.

  • रोज सकाळी लवकर उठण्याचे अनेक फायदे आहेत, हे फायदे कुठेही तुम्हाला मिळतील, त्यातील एक फायदा असा आहे कि सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात केली तर आपल्या महत्वाच्या कामासाठी अधिक वेळ मिळतो त्यामुळे आपल्याला आत्मविश्वास वाढल्यासारखे जाणवते कि आपले काम आपण स्वतः पूर्ण करण्यास सक्षम आहोत आणि इतरांची मदत घेण्याची आपल्याला काही गरज नाही.
  • त्याचबरोबर लवकर उठल्यानंतर meditation , योगा केल्याने आपण अधिक आनंदी राहू शकतो. मेडिटेशन केल्यामुळे आपल्याला आपल्या रोजच्या अतिरिक्त कामाचा जो stress आलेला असतो तो कमी करायला मदत होते आणि योगामुळे मन प्रसन्न आणि आनंदी राहण्यास मदत होते असा overall आपल्या सगळ्या शारीरिक आणि मानसिक बदलांसाठी एक सवय नक्की बदला ती म्हणजे सकाळी उठण्याची. लवकर उठा आणि व्यायाम करा त्यामुळे जवळजवळ तुमचे निम्म्याहून अधिक कामे किंवा stress कमी झाल्याचे तुम्हाला जाणवेल.

अशाप्रकारे स्वतःमध्ये बदल घडवून आणायचे असेल तर हे बदल नक्कीच करून पहा. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि नवीन गोष्टी करायला तुम्हाला आनंद मिळेल.