Top 10 Tourist Places In Pune In Marathi |
पुण्यात नवीनच आलाय आणि इथले काही स्पॉट visit करायची आहेत कि जी एका दिवसात पाहता येतील आणि खूप जास्त त्रास होणार नाही अशे काही खास ठिकाण आज आपण या ब्लॉग Top 10 Tourist Places In Pune In Marathi मध्ये पाहणार आहोत. पुणे तिथे काय उणे हे तर तुम्ही नक्कीच ऐकलं असणार आणि हे तेवढाच खर सुद्धा आहे कारण या ठिकाणी तुम्हाला समुद्र सोडला तर सर्व काही मिळेल. मनोरंजनाच्या गोष्टी तसेच सर्व प्रकारच्या खरेदीसाठीच्या वस्तू , कपडे सर्व सर्व काही या ठिकाणी तुम्हाला मिळेल .
सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणच वातावरण.. इथले वातावरण हे प्रदूषण विरहित आहे त्यामुळे इतर मेट्रो सिटी पेक्षा पुणे हि सिटी पर्यटनासाठी तर चांगली आहेच त्याच बरोबर तुम्ही जर कामानिमित्त येत असाल तरी सुद्धा पुणे कायमच चांगले ठरणार . पुण्यात आणखीही काही ठिकाणी आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला माहित असेल आणि तिथे जाण्याची इच्छा असेल तर हा ब्लॉग नक वाचा. जिथे जाऊन तुम्हाला पर्यटनाचा खास आस्वाद घेता येईल आणि हे सगळे स्पॉट तुम्ही two wheeler वर सुद्धा फिरू शकता. चला तर मग पाहुयात
- वाघेश्वर मंदिर (Wagheshwar Temple)
- जुन्नर (Junnar)
- पार्वती हिल (Parvati Hill)
- सिंहगड किल्ला (Sinhgad Fort)
- लोणावळा (Lonavala)
- मुळशी (Mulashi)
- रामदरा (Ramdara)
- भुलेश्वर मंदिर (Bhuleshwar Temple)
- सोमेश्वर वाडी (Someshwar Wadi)
- रांझन खळगे (Ranjhan KHalage)
आणखी वाचा : डेहराडून मधील 35+ पर्यटन स्थळे
आणखी वाचा : माथेरान येथील 20+पर्यटन स्थळे
Top 10 Tourist Places In Pune In Marathi |
वाघेश्वर मंदिर
- चवदार तळ्यातील हे एक मंदिर आहे आणि या ठिकाणी जर तुम्हाला जायचं असेल तर मे , जून आणि जुलै अश्या २ ते ३ महिन्यातच हे मंदिर पाहायला मिळत इतर वेळेस हे मंदिर संपूर्ण पाण्याखाली जाते.
- इथला परिसर हा तळ्यातील असल्याकारणाने इथला वातावरण अतिशय सुंदर आहे. हे मंदिर पाहिल्यावर असं वाटत कि एकावर एक दगड ठेवून बनवलेलं आहे कि काय. अतिशय जून हे मंदिर आहे.
- आसपास बरीच मोकळी जागा असल्यामुळे बऱ्याच camp इथे होत असतात.
जुन्नर
- इथे भारतातल्या सगळ्यात जास्त लांब लेण्या आणि गुहा आहेत. इथे २०० पेक्षा जास्त लेण्या तुम्हाला पाहायला मिळतील. यातील काही लेण्या बौद्ध कालीन आहेत. त्याच बरोबर बर्याचश्या लेण्या या डोंगर चढून जावं लागत त्यामुळे ट्रेक साठीही हि जागा खूप मस्त आहे.
- पावसाळ्यातील इथला निसर्ग अतिशय सुंदर असतो.
- अष्टविनायकापैकी एक गणपती तो म्हणजे लेण्याद्री हा इथेच आहे.
- या ठिकाणी पर्यटक पर्यटनासाठी येत असतात त्यातील काही स्थळे जसे की लेण्याद्री लेण्या, शिवनेरी किल्ला, अष्टविनायकापैकी एक गणपती श्री गिरीजात्मक मंदिर आणि दर्या घाट तसेच निमगिरी किल्ला असे काही पर्यटन स्थळे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील.
पार्वती हिल
- या ठिकाणाहून तुम्हाला पुण्याचा छान view पाहायला मिळतो. अगदी पुणे शहरापासून जवळच हे ठिकाण आहे.
- पार्वती हिल च उंची जवळजवळ 2100 फूट आहे. जवळ जवळ 100 पायऱ्या चढून या ठिकाणी जावे लागते असल्यामुळे ही चढाई चढताना फारसा त्रास होत नाही जर तुम्हाला ट्रेकिंग करायची असेल तर दुसऱ्या इतर ठिकाणाहून ही तुम्ही यावर चढू शकता.
- पार्वती हेलवर एकूण पाच मंदिर आहेत जसे की देव देवेश्वर मंदिर जिथे शिवानी पार्वतीचे मंदिर आहे. दुसरे कार्तिकेय मंदिर, तिसरे विष्णू मंदिर, चौथे विठ्ठल मंदिर आणि पाचवे राम मंदिर. अतिशय सुंदर ही मंदिरे तुम्हाला सुखद आनंद देतील.
आणखी वाचा : महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे
Top 10 Tourist Places In Pune In Marathi |
सिंहगड
- पुणे शहरापासून 49 किलोमीटर सिंहगड हा किल्ला आहे. पावसाळ्यात हे ठिकाण ट्रेक साठी बेस्ट आहे.
- या किल्ल्याची उंची 2100 फूट आहे आणि याचा ट्रॅक हा सोपा ते मध्यम दर्जाचा आहे. नवशिक्यांसाठी हा ट्रेक चांगला आहे.
- दरवर्षी हजारो पर्यटक या ठिकाणी ट्रेक करण्यासाठी येतात. पावसाळ्यात या ठिकाणी अतिशय सुंदर वातावरण निर्माण होते या वेळेत या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते.
- हा किल्ला जवळ जवळ दोन हजार वर्षांपूर्वी बांधलेला असावा असे म्हटले जाते.
- पुणे शहरापासून जवळ असल्यामुळे पुण्यातील अनेक पर्यटक या ठिकाणी येतात आणि पर्यटनाचा आनंद घेतात.
लोणावळा
- भुशी डॅम , राजमाची पॉईंट, पावन धारण, लायन्स पॉईंट, लोहगड किल्ला, लोणावळा लेक
- हे ठिकाण पुण्यापासून ६४ किलोमीटर अंतरावर आहे.
- पावसाळा आणि हिवाळा या दिवसांमध्ये या ठिकाणी पर्यटक नेहमीच भेट देत असतात.
- मुंबई आणि पुणे या शहरांपासून जवळ हे ठिकाण असल्याकारणाने या ठिकाणी पर्यटक या वातावरणाचा आनंद घ्यायला येत असतात. नवविवाहित जोडी सुद्धा या ठिकाणी येण्यास प्राधान्य देतात.
मुळशी
- मुळशी या ठिकाणी अतिशय सुदर असं धारण आहे त्यामुळे येथील परिसर अतिशय निसर्गरम्य आहे.
- या धरणातील पाण्याचा वापर हा जलसिंचनासाठी निर्मितीसाठी केला जातो या तलावामुळे या ठिकाणचा परिसर हिरवाईने भरलेला आहे त्याचबरोबर या चहुबाजूने डोंगर पसरलेला असला कारणाने घाटातून प्रवास होतो.
- या ठिकाणी असणारा इंडिपेंडेंस पॉइंट हा लोकप्रिय आहे.
- या ठिकाणी सुंदर असे रिसॉर्ट, रेस्टॉरंट, कॅफे बनवण्यात आलेले आहेत ज्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता.
आणखी वाचा : महाबळेश्वर मधील 10 सुंदर पर्यटन स्थळे
Top 10 Tourist Places In Pune In Marathi |
रामदरा
- पुण्यापासून अगदी ३० किलोमीटर अंतरावर असणार हे एक निसर्गरम्य स्थळ आहे. हे मंदिर एका तलावात आहे.
- अतिशय सुंदर आणि प्रसन्न वातावरण इथे अनुभवास येते.
- हे मंदिर रामाचा आणि शंकराचं आहे. त्याच बरोबर इथे खूप साऱ्या देवतांच्या आणि संतांच्या मुर्त्या आहेत.
- विष्णूचे १० अवतार इथे रेखाटलेले तुम्हाला पाहायला मिळतील. हे मंदिर बघण्यात तुमचे १ ते २ तास कसे जातील ते तुम्हाला कळणार हि नाही आणि त्याचबरोबर इथला जवळपास चा परिसरही अतिशय सुंदर आहे.
- इथे तुम्ही वनभोजन हि करू शकता. परंतु इथे आपल्याकडून काही कचरा होणार नाही याची काळजी अवश्य घ्या.
- सकाळी जर लवकर गेलात तर खूप वेगवेगळ्त्या प्रकारची पक्षी सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर वनविभागाने इथे छान seat arrangement सुद्धा आहे.
- इथे जायचे ठरलेच तर शक्यतो सकाळच्या किंवा अगदी संध्याकाळच्या वेळेला जा आणि इथे तुम्ही sunset हि enjoy करू शकता. अतिशय सुंदर असा sunset view तुम्हाला मिळेल.
भुलेश्वर
- पुण्यापासून ४५ किलोमीटर च्या अंतरावर पुणे – सोलापूर रोडवर असणार भुलेश्वर अतिशय सुंदर ठिकाण आहे.
- हे मंदिर १२ व्या किंवा १३ व्या शतकात बांधलेलं अतिशय प्राचीन असं हे मंदिर आहे. अगदी डोंगराच्या पठारावर हे मंदिर आहे त्यामुळे पावसाळ्यात इथला view अतिशय सुंदर असतो कारण इथे जाणारा रस्ता हा संपूर्ण घाटातला असणार आहे.
- मंदिराच्या आतल्या बाजूस सुंदर असं शिल्पकाम पाहायला मिळतं. पावसाळ्यात तर हे मंदिर छान वाटतच पण इतर ऋतू मध्येही हे मंदिर पाहायला अतिशय सुंदर आहे.
सोमेश्वर वाडी
- हे मंदिर पाषाण येथे आहे आणि मंदिर सुद्धा खूप प्राचीन आहे.
- या मंदिराची खास गोष्ट म्हणजे या मंदिराच्या बाजूला छान असं ग्रामसंस्कृती सारखा देखावा असलेला बाग बनवलेला आहे.
- जुन्या गावात गेल्यानंतर तिथला देखावा कसा असणार याच अप्रतिम देखावा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याच बरोबर १२ ज्योतिर्लिंगांची प्रतिकृती सुद्धा या ठिकाणी बनवलेली आहे.
- छन अशी संध्याकाळ घालवण्यासाठी हे ठिकाण best आहे.
रांझन खळगे
- पुणे – नगर रोड वर निघोज हे एक गाव आहे. या गावातून कुकडी नदी वाहते आणि या नदीपात्रात खडकांमध्ये रांझान खळगे तयार झालेले आहेत.
- आशियातील सर्वात मोठ्या आकाराचे रांझान खळगे या ठिकाणी पाहायला मिळतात. खूप मोठ्या प्रमाणात खळगे येथे निर्माण झालेले आहेत आणि त्यांचा आकारही मोठा आहे.
- इतर ऋतूतही या ठिकाणी खूप छान वातावरण असते.
आणखी वाचा : कोकणात फिरायला जायचंय ? मग या 15 Beaches ला नक्की भेट द्या..
आणखी वाचा : मुन्नार मधील 25+ पर्यटन स्थळे