10 Best Places Near Nashik In Marathi | नाशिक जवळील १० निसर्गरम्य स्थळे

10 Best Places Near Nashik In Marathi |

आपण या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत नाशिक मधील निसर्गरम्य आणि पावसाळाच नाहीतर इतर कुठल्याही ऋतू मध्ये फिरायला जात येईल अशी सुंदर ठिकाणे. नाशिक मधील अतिशय सुंदर ठिकाणे जिथे तुम्हाला मंदिरे, घाट आणि धबधबे पाहायला मिळतील. चला तर मग 10 Best Places Near Nashik In Marathi या ब्लॉग मध्ये पाहुयात नाशिकची सुंदर ठिकाणे…

  • इगतपुरी (Igatpuri)
  • सुला विनयार्ड (Sula Wine Yard)
  • त्रैम्बकेश्वर मंदिर (Trimbakeshwar Temple)
  • सप्तशृंगी मंदिर (Saptshrungi Temple)
  • ट्रिंगळवाडी तलाव (Tringalwadi Lake)
  • साई बाबा मंदिर ( Sai Baba Temple)
  • अंजनेरी (Anjneri)
  • विहिगाव धबधबा ( Vihigav Waterfall)
  • दुर्गावाडी धबधबा (Durgawadi Dhabdhaba)
  • अम्ब्रेला फॉल्स भंडारदरा (Ambrella Falls Bhandardara)

आणखी वाचा : पावसाळ्यातील पुण्यातील 10 unique निसर्गरम्य स्थळे

10 Best Places Near Nashik In Marathi |

इगतपुरी

  • नाशिकपासून फक्त ४५ किलोमीटर असणार हे सुंदर ठिकाण म्हणजे इगतपुरी.
  • अतिशय सुंदर आणि थंडीच्या दिवसांमध्ये आल्हाददायक असं हे ठिकाण आहे. इथे भेट देण्यासाठी डिसेम्बर ते फेब्रुवारी या महिन्यांदरम्यान चे वातावरण अतिशय सुंदर आहे तेव्हा येथिक तापमान १९ – २९ अंश सेलसिअस दरम्यान असते.
  • इगतपुरीतील काही पर्यटन क्षेत्रे –
    • कळसुबाई शिखर – इगतपुरी शहरापासून १९ किलोमीटर अंतरावर हे सह्याद्री पर्वत रांगेत असणारं सर्वात उंच शिखर आहे. हे शिखर चढण्यासाठी ४ ते ५ तासांचा कालावधी लागतो.
    • घाटनदेवी मंदिर – इगतपुरी शहरापासून ८ किलोमीटरवर हे मंदिर आहे. या मंदिराला त्या घाटाचे संरक्षण करणारी देवता असे संबोधले जाते.
    • विपस्सना सेन्टर – इगतपुरी शहरापासून फक्त १ किलोमीटर अंतरावर हे सेन्टर आहे. हे जगातील सर्वात मोठे धम्म गिरी मेडिटेशन सेन्टर म्हणून ओळखले जाते आणि याचे संस्थापक S. N. गोयंका हे आहेत.
    • भावली डॅम – शहरापासून ८ किलोमीटर अंतरावर आहे. भावली गावातील भाम या नदीवर बांधलेले हे धारण आहे.
    • भातसा रिव्हर व्हॅली – शहरापासून ४३ किलोमीटर अंतरावर आहे. खूप सुंदर असं हे थिकं मुंबई रोडवर आहे.
    • कसारा घाट – नाशिक ते मुंबई रोडवर असणारा हा कसारा घाट अतिशय सुंदर आहे आणि हा घाट इगतपुरी शहरापासून ९ किलोमीटर अंतरावर आहे.
    • म्यानमार गेट – हे गते धम्म गिरी मेडिटेशन सेन्टर च गेट आहे. अतिशय सुंदर पद्धतीने बनवलेलं आहे.
    • केमल व्हॅली – इगतपुरी पासून फक्त ३ किलोमीटर अंतरावर आहे. इथे पावसाळ्यातील वातावरण अतिशय सुंदर असते.
    • कुलंगत ट्रेक – महाराष्ट्रातील सर्वात उंच टेकडी म्हणून हि प्रसिद्ध आहे आणि इगतपुरी शहरापासून १४ किलोमीटर अंतरावर आहे.
    • अमृतेश्वर मंदिर – शहरापासून २६ किलोमीटर अंतरावर असणारं हे महादेवाचे मंदिर संपूर्ण दगडात बनवलेले आहे.
    • बितनगड ट्रेक – शहरापासून २४ किलोमीटर अंतरावर असणारं ठिकाण ३५०० फिट उंच आहे आणि ट्रेक साठी खूप छान आहे.

सुला वाईन यार्ड (Sula Vine yards )

  • नाशिकपासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर असणार सुला वाईन यार्ड हे ठिकाण.
  • सुला हा भारतातील सर्वात मोठा वाईन ब्रँड बनलेला आहे. याला खूप सारे पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. हि जागा २० एकर्स आहे अतिशय सुंदर असं त्या जागा त्यांनी बनवलेली आहे.
  • वेगवेगळ्या टेस्ट ची वाईन तुम्हाला इथे मिळेल.

त्रैम्बकेश्वर मंदिर (Trimbkeshwar Temple )

  • नाशिक पासून २८ किलोमीटर अंतरावर असणारं हे मंदिर १२ ज्योतिर्लिंगापैकी एक आहे .
  • ह्या ज्योतिर्लिंगाचे खासियत हि आहे कि ह्या शिवलिंगामध्ये त्रिदेव विराजित आहेत. ब्रह्म, बिष्णु आणि महेश यांची प्रतिमा यात रेखाटलेली आहे.
  • ह्या ज्योतिर्लिंगाची स्थापना सुमारे १००० वर्षांपूर्वीची आहे.
  • नाशिकहून त्रिम्बकेश्वर ला जायचं असेल तर त्यासाठी बस ची व्यवस्था आहे आणि त्यासाठी २ तासांचा वेळ लागतो .
  • ब्रह्मगिरी टेकडीच्या पायथ्याशी त्र्यंबकेश्वर हे शहर आहे . त्यामुळे हे शहर समुद्रसपाटीपासून जवळ जवळ ३००० फूट उंचीवर आहे .

आणखी वाचा : महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे

10 Best Places Near Nashik In Marathi |

सप्तशृंगी मंदिर (Saptshrungi Temple)

  • नाशिकपासून ६० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सप्तशृंगी देवीचे मंदिर वणी या ठिकाणी आहे . या मंदिराकडे जाणाऱ्या सुमारे ४७२ पायऱ्या आहेत.
  • त्याच बरोबर आता इथे जाण्यासाठी रोपवे चाही वापर करता येतो. प्रौढांना ९० रुपये आणि लहान मुलांना ४५ रुपयांमध्ये रोपवे चा वापर करून दर्शनासाठी जात येते.
  • सकाळी ६ ते संध्याकाळी ९ वाजेपर्यंत आपण सप्तशृंगी देवीचे दर्शन घेऊ शकता . ३ .५ शक्तिपीठांपैकी सप्तशृंगी हे अर्ध शक्तीपीठ आहे.
  • या ठिकाणी राहण्यासाठी धर्मशाळेची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि हि धर्मशाळा भाविकांसाठी २ ४ तास उघडी असते . त्याचबरोबर या ठिकाणी पोटभर भोजनाची हि व्यवस्था करण्यात आलेली आहे इथे असणाऱ्या प्रसादालयात फक्त २ ० रुपयांमध्ये पोटभर जेवणही तुंहाला मिळेल. काही ठराविक दिवसांमध्ये इथे प्रसादालयात फ्री मध्ये जेवण मिळते जसे कि पौर्णिमा , नवरात्र . .
  • या गडावर गेल्यानंतर सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी अजूनही काही स्थळे आहेत ज्याला तुम्ही भेट देऊ शकता जसे कि कालीकुंड , सूर्यकुंड , जलगुंफा , शिवतीर्थ , शीत तडा ,गुरुदेव आश्रम , गणपती मंदिर . ..

ट्रिंगळवाडी किल्ला (Tringalwadi Fort )

  • नाशिकपासून ५० किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे येथे थळ घाटातून जाणाऱ्या मार्गावर हा ट्रिंगळवाडी गावाजवळ हा किल्ला आहे आणि येथेच ट्रिंगळवाडी धारण सुद्धा आहे त्यामुळे येथे खूप मोठा तलाव पाहायला मिळतो.
  • हा किल्ला एक गिरिदुर्ग आहे.या किल्ल्याच्या पायथ्याशी पांडवलेणी गुहा आहे. त्याच बरोबर येथे एकूण ८ गुहा आहेत त्यातील ६ गुहा पायथ्याशी आहेत आणि २ गुहा डोंगरावर आहेत.
  • या किल्ल्याची उंची ३ २ ३ ८ फूट आहे आणि हा एक डोंगरी किल्ला आहे . हा किल्ला आणि इथे असणाऱ्या लेण्या १ ० व्या शतकात बनवलेल्या असाव्या असे सांगितले जाते .

साईबाबा मंदिर (Sai Baba Temple )

  • नाशिक पासून 4 किलोमीटर अंतरावर आहे.
  • शिर्डी मधील साईबाबांची जसे मंदिर आहे तसेच नाशिकमध्येही तसेच मंदिर बनवण्यात आले आहे.

आणखी वाचा : महाबळेश्वर मधील 10 सुंदर पर्यटन स्थळे

10 Best Places Near Nashik In Marathi |

अंजनेरी (Anjneri)

  • नाशिक पासून ३० किलोमीटर अंतरावर असणारा हा एक गिरिदुर्ग आहे याची उंची सुमारे ४२०० फूट आहे.
  • हा एक अतिशय अवघड ट्रेक आहे. जवळजवळ चार तासांचा वेळ या ट्रेक साठी लागतो. त्यामुळे ज्यांना ट्रेकिंगची सवय आहे अशाच लोकांनी या गडावर ट्रेक करावा असे सगितले जाते. नवशिक्यांसाठी हा ट्रेक अतिशय अवघड आहे.
  • त्रिम्बकेश्वर डोंगररांगेत हा कळस आहे.

विहिगाव धबधबा (Vihigaon Waterfall)

  • नाशिकपासून ५८ किलोमीटर अंतरावर आहे.
  • विहिगाव धबधबा यालाच अशोका धबधबा असेही म्हणतात. इगतपुरी शहरापासून साडेतेरा किलोमीटर आणि नाशिक पासून 59 किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे हा धबधबा ठाणे जिल्ह्यातील विशेष गाव या ठिकाणी आहे.
  • कसारा घाटात हा धबधबा पर्यटकांची खास पसंती आहे या धबधब्या शेजारी निसर्गरम्य वातावरण आणि इतिहास नारे आणि डोंगर रांगा पदार्थ यांचा आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी नेहमीच येण्यास आतुर असतात.

आणखी वाचा : दिल्ली मधील 15 पर्यटन स्थळे

10 Best Places Near Nashik In Marathi |

दुर्गवाडी धबधबा (Durgawadi Waterfall )

  • नाशिकपासून ३६.८ किलोमीटर अंतरावर आहे.
  • दुर्गवाडी धबधबा त्रंबकेश्वर या ठिकाणाहून चार किलोमीटर अंतरावर आहे त्र्यंबकेश्वर ला भेट देणारा प्रत्येक पर्यटक या धबधब्याला आवर्जून भेट देतो.
  • दुर्गा वाडी हा धबधबा अहिल्या नदीवर आहे.
  • दुर्गावाडी धबधब्यापर्त जाण्यासाठी कच्च्या रस्त्यावरून दोन किलोमीटर अंतर खाली जाऊन दाट झाडे मधून डोंगरातून जावे लागते.

अम्ब्रेला फॉल्स भंडारदरा (Umbrella Falls Bhandardra )

  • नाशिकपासून ९ किलोमीटर अंतरावर आहे.
  • हा धबधबा छत्रीच्या आकाराचा असल्याकारणाने याला अम्ब्रेला फॉल्स असे म्हणतात.
  • भंडारदरात धरणातून पाणी सोडले असता खडकावरून हे पाणी खोल दरी मध्ये पडते आणि त्याचा आकार छत्रीसारखा दिसतो. नयनरम्य असेच हे दृश्य पर्यटकांची पसंती आहे.

आणखी वाचा : महाबळेश्वर मधील 10 सुंदर पर्यटन स्थळे