Mahabaleshwar Tourist Places In Marathi |
महाराष्ट्रातील हिवाळ्यात फिरायला जात येईल असे ठिकाण कोणते ? असा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा सगळ्यात जास्त तोंडासमोर नाव येते ते महाबळेश्वरच.. आता महाबळेश्वर बद्दल कोणी ऐकलंच नाहीये असं कोणी संपूर्ण महाराष्ट्रात सापडणार नाही. चला तर मग आता या ब्लॉग Mahabaleshwar Tourist Places In Marathi मध्ये पाहुयात महाबळेश्वर मधील निसर्गरम्य स्थळे जिथे तुम्ही तुमचा वेळ आपल्या फॅमिली सोबत किंवा आपल्या मित्रांसोबत घालवू शकतो.
- महाबळेश्वर मंदिर
- विल्सन पॉईंट
- एलिफन्ट पॉईंट
- भिल्लर धबधबा
- मॅप्रो गार्डन
- प्रतापगड
- लिंगमळा धबधबा
- वेण्णा तलाव
- धोबी धबधबा
- पाचगणी
आणखी वाचा : पावसाळ्यातील पुण्यातील 10 unique निसर्गरम्य स्थळे
आणखी वाचा : नाशिक जवळील १० निसर्गरम्य स्थळे
Mahabaleshwar Tourist Places In Marathi |
महाबळेश्वर मंदिर
- हजारो वर्षांपूर्वीचे हे मंदिर ” स्वयंभू ” शिवलिंग ६ फुट असणारं जे महालिंगन म्हणून ओळखले जाते.
- अतिशय सुंदर असा परिसर या भोवती आहे आणि हे अतिशय पुरातन मंदिर आहे.
- या मंदिरात नंदी आणि कालभैरवाच्या असंख्य मुर्त्या पाहायला मिळतात.
- रुद्राक्षाच्या रूपात असणारे हे लिंग धार्मिक दृष्ट्या १२ ज्योतिर्लिंगापेक्षाही अधिक महत्व असणारे आहे.
विल्सन पॉईंट
- सुंदर असा sunset आणि sunrise पॉईंट म्हणून हा विल्सन पॉईंट महाबळेश्वर मध्ये ओळखला जातो.
- या ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही डायरेक्ट गाडी घेऊन जाऊ शकता किंवा जर तुम्हाला ट्रेकिंग ची आवड असेल तर जंगलातून तुम्ही ट्रेक सुद्धा करू शकता. महाबळेश्वर मधील सर्वात उंच ठिकाणांमध्ये हा एक पॉईंट आहे त्यामुळे येथून खूप छान view पाहायला मिळतो.
- या ठिकाणावर चार बुरुज बनवले गेले आहेत त्यातील एक बुरुज पावसामुळे ठसलेला आहे. या बुरुजांवर उभे राहून छान छान photos तुम्ही काढू शकता.
Mahabaleshwar Tourist Places In Marathi |
एलिफन्ट पॉईंट
- आर्थर सीट पासून अवघ्या ३ किलोमीटर वर असणार हे ठिकाण डॉ. मरे यांनी शोधून काढले आहे याच्या डावीकडे कोयना व्हॅली आणि हिरवागार परिसर आहे.
- डोंगराच्या एका बाजूला हत्तीच्या तोंडासारखा आकार बनलेला आहे त्यामुळे या पॉईंट ला एलिफन्ट पॉईंट असे नाव पडले.
भिल्लार धबधबा
- भिलार गावाजवळ असणारा हा भिलार धबधबा लांबूनच आपल्याला दिसतो. हे गाव महाराष्ट्रातील पुस्तकाचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे.
- हा धबधबा ४५०० मीटर उंचीचा हा धबधबा अतिशय सुंदर आहे.
मॅप्रो गार्डन
- हे ठिकाण महाबळेश्वर – पाचगणी रस्त्यावर आहे आणि इथे मॅप्रो चे आपल्या स्वतःच्या मालकीचे स्ट्रॉबेरी चे मळे आहेत.
- श्री. किशोर व्होरा यांनी १९५९ साली गुरेघर येथे मॅप्रो गार्डन ची स्थापना केली होती. या ठिकाणी यांचे स्वतःचे fruits products तुम्हाला मिळतील आणि येथील परिसर अतिशय सुंदर बनवण्यात आलेला आहे.
- तुम्ही जर इथे जाणार असाल तर येथील सॅलड, icecream आणि नाश्त्यासाठी खूप काही variety तुम्हाला मिळतील त्याच बरोबर स्ट्रॉबेरी शेक मिळेल.
प्रतापगड
- छत्रपति शिवाजी महाराजांनी १६५० साली या गडाचे बांधकाम सुरु केले होते. ६ वर्ष्यानी म्हणजेच १६५६ मध्ये या गडाचे बांधकाम पूर्ण झाले. सातारा अतिशय सुंदर आहे. या किल्ल्यामध्ये चार तलावही आहेत.
- हा किल्ला सपाटीपासून ३५०० फुटांवर बांधला गेलेला आहे. या किल्ल्याला शौर्य किल्ला असेही संबोधले जाते.
- या गडावर एक मंदिर बांधलेले आहे जे शेतकऱ्यांना समर्पित असून त्याला किसान देवता मंदिर आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांना देवता मानले जाते.
- प्रतापगड ला निश्चित भेट द्यायला हवी कारण या ठिकाणाला असलेले ऐतिहासिक महत्व तर आहेच त्याचबरोबर हे एक प्रकारचे हिल स्टेशन सुद्धा आहे.
- प्रतापगड हे माळवा पठार आणि अरवली टेकड्यांच्या मध्ये आहे त्यामुळे इथले वातावरण हे पावसाळ्याच्या आणि हिवाळ्याच्या ऋतूत अतिशय सुंदर असते.
- या गडाचा ट्रेक हा अतिशय सोपा आहे आणि इथे असणाऱ्या ४५० पायऱ्या चढून जाणे इतर किल्ल्यांपेक्षा सोपा आहे. नवशिक्या ट्रेकर्स साठी सुद्धा हा ट्रेक सोपा आहे.
Mahabaleshwar Tourist Places In Marathi |
लिंगमळा धबधबा
- दोन अतिशय सुंदर असे धबधाई या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल.
- महाबळेश्वर – पुणे रोडवर हे ठिकाण महाबळेश्वर पासून अवघ्या ६ किलोमीटर अंतरावर आहे.
- सुमारे ६०० फूट उंच असणारा हा धबधबा लिंगमळाच्या वन बंगल्याजवळ आहे.
- या ठिकणी पर्यटन ट्रेक करत दोन्ही धबधब्यांना पाहण्यासाठी जातात.
- या ठिकाणचे प्रवेशशुल्क २० रुपये प्रति व्यक्ती एवढे आहे. भरपूर हिरवळ आणि इथले पर्वत हे खडकाळ आहेत त्यामुळे हा ट्रेक अतिशय सुंदर होतो.
- छोट्या धबधब्यापासून जवळ जवळ ३० मिनिटांचा ट्रेक करत मोठ्या धबधब्याकडे जात येते.
- या ठिकाणाला भेट देण्यासाठी जुलै ते ऑक्टोबर हा कालावधी योग्य आहे. कारण याच दिवसांमध्ये पावसाच्या वेळी हे धबधबे अतिशय सुंदर आणि आसपासचे वातावरण हिरवळ होते.
वेण्णा तलाव
- महाबळेश्वर पासून अवघ्या २ किलोमीटर अंतरावर वेण्णा तलाव तुम्हाला पाहायला मिळेल. हे तलाव जवळ जवळ ७ ते ८ किलोमीटरच्या अंतरामध्ये पसरलेला आहे. पर्यटक आणि सर्व निसर्गप्रेमी यांमुळे या परिसराची सुंदरता अधिक वाढते.
- हा तलाव १८४२ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज श्री. आप्पासाहेब महाराज यांनी या शहराला नियमित पाणी पुरवठा व्हावा या कारणाने बांधला होता.
- आता इथे बोटींग ची व्यवस्था करण्यात अली आहे इथे तुम्ही बोटींग चा आनंद घेऊ शकता. आणि याच्या आजूबाजूच्या परिसरात घोडेस्वारीची हि व्यवस्था आहे.
- या तलावाच्या आजूबाजूला अनेक खाण्यापिण्याची ठिकाणे तुम्हाला मिळतील जिथे अतिशय स्वादिष्ठ असे पक्वान्न तुम्हाला मिळतील.
- त्याचबरोबर या ठिकाणी घोडेस्वारी हि करता येते. इथे अनेक घोडे आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांची स्वारी करायला मोठा मैदान सुद्धा या ठिकाणी आहे.
धोबी धबधबा
- जुना महाबळेश्वर रस्त्यालगत शहरापासून अवघ्या ३ किलोमीटर अंतरावर हा धबधबा तुम्हाला पाहायला मिळेल.
- असणारा हा धबधबा अतिशय सुंदर आहे आणि याच्या बाजूने हिरवळ आणि खडकांचा परिसर आहे.
- पावसाळ्याच्या दिवसात येथे धुके आणि इंद्रधनुष्य पाहायला मिळते इथपर्यंत तुम्ही चढून जाऊ शकता.
- त्याच बरोबर या ठिकाणी विद्युत निर्मितीचे केंद्र सुद्धा आहे आणि इथे मासेमारी सुद्धा होते. इथल्या धबधब्याचा उपयोग हा विद्युत निर्मितीसाठी केला जातो हि एक चांगली गोष्ट आहे.
- हा धबधबा एलिफंट पॉईंट च्या समोर आहे. त्यामुळे या पॉईंट वरून हा धबधबा एन्जॉय करू शकता. या ठिकाणी येणारे पर्यटक या ठिकाणच्या धबधब्याबद्दल आपले मत मांडताना अजिबात मागेपुढे पाहत नाही.
Mahabaleshwar Tourist Places In Marathi |
पाचगणी
- ” पाचगणी ” या नावावरूनच लक्षात येते कि हा परिसर पाच टेकड्यांचा मिळून बनलेला आहे.
- महाबळेश्वर पासून थोड्याच अंतरावर असणारे हे ठिकाण पर्यटकांसाठी आवडते ठिकाण आहे.
- हे एक निसर्गरम्य असे हिल स्टेशन आहे.याच्या एका बाजून खोल दारी आणि दुसऱ्या बाजूने किनार पट्टीचे सुंदर मैदान पाहायला मिळते.
- हे ठिकाण समुद्रसपाटी पासून १३३४ मीटर अंतरावर आहे आणि हे ठिकाण ” भारताचे स्ट्रॉबेरी गार्डन ” या नावाने अतिशय प्रसिद्ध आहे. या ठिकाणी तुम्हाला स्ट्रॉबेरी चा आस्वाद घ्यायला मिळेल.
- या ठिकाणी असणारी पर्यटन स्थळे : टेबल लँड , धोम डॅम , केट्स पॉईंट , सिडनी पॉईंट , पारसी पॉईंट , चीझ फॅक्टरी , हरीसन फॉली , बॉम्बे पॉईंट , शेर बाग , चिनामन धबधबा , मोर्नी किल्ला इ.
- या ठिकाणी अरुंद पायवाटा जरी असल्या तरी त्यांवरून चालत जाऊन इथले काही खास पॉईंट पाहायला इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांची खास पसंती असते.
- या ठिकणाला भेटी देण्यासाठी २ दिवस पुरेसे आहेत तरी जर या ठिकाणी राहण्याचे आणि इथले वातावरणाचा आनंद घ्यायला कुणाला आवडणार नाही.
- या ठिकाणाहून तुम्ही चामड्याच्या वस्तू, चपला तसेच इथल्या हस्तकलेच्या वस्तू , फळ आणि इतर उत्पादने आणि मिठाई हे सर्व काही खरेदी करू शकता.
आणखी वाचा : यशस्वी व्हायचंय ? तर या लोकांपासून दूर राहा.. 4 Tips
आणखी वाचा : आपल्या या 7 वाईट सवयीमुळे येते अपयश