Kerala Beaches In Marathi | केरळ मधील 25 बीच… नक्की भेट द्या ..

Kerala Beaches In Marathi |

केरळला फिरायला निघालात तर हा ब्लॉग नक्की वाचा. यात तुम्हाला केरळच्या सर्व बीच बद्दल माहिती मिळेल. ५५० किलोमीटरचा समुद्रकिनारा केरळ लाभला आहे. अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य असा केरळ सर्वानीच निदान चित्रपटात किंवा चित्रात तर नक्कीच पाहिलेला असणार. केरळ मधील वातावरण हे समुद्रकिनारा असल्या कारणाने थोडे दमट च असते परंतु येथील पर्यटनाची सुंदरता तुम्हाला नक्कीच प्रभावित करणारी ठरते .

इथे राहणाऱ्या लोकांचा पेहराव आणि इथली संस्कृती हे सर्वच पर्यटकांना आकर्षित करता असतात . बरेच पर्यटक या ठिकाणचे पोशाख खरेदी करतात . मग आता तिथे फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर हा ब्लॉग Kerala Beaches In Marathi नक्की वाचा …

कन्नूर मधील बीच :

  • Payyambalam Beach
    • कन्नूर शहरापासून ३ किलोमीटरच्या अंतरावर हे बीच आहे. अवघ्या १० मिनिटाच्या अंतरावर असणार हे अतिशय सुंदर बीच आहे.
    • अतिशय शांत असा हा समुद्रकिनारा आहे आणि पर्यटकांना येथील वाळूमध्ये किल्ले किंवा चित्र काढायला आवडते.
    • sunset पाहण्यासाठी हा समुद्रकिनारा लोकप्रिय आहे आणि त्यासाठी या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होते.
  • Meenkunnu Beach
    • ओझीकोडे पासून जवळच असणारा हा समुद्रकिनारा तेथील सोनेरी वाळूसाठी खूप जास्त लोकप्रिय आहे.
    • कन्नूर शहरापासून हा समुद्रकिनारा ९.५ किलोमीटर अंतरावर आहे. इथे पोहचण्यासाठी साधारण २० ते २२ मिनिटांचा वेळ लागतो.
  • Muzhappilangad Beach
    • कन्नुरपासून जवळ जवळ १५ किलोमीटरच्या अंतरावर हा समुद्रकिनारा आहे इथे पोहचण्यासाठो ३५ मिनिटांचा वेलागतो.
    • हा संद्रकिनार अतिशय व्यवस्थित आणि स्वच्छ असल्या कारणाने हा किनारा आरामासाठी खूप लोकप्रिय आहे आणि त्याच बरोबर जलतरंगपटूनसाठी ” नंदनवन ” म्हणूनही किनारा ओळखला जातो.
  • Kizhunna Beach
    • कन्नुरपासून ११ किलोमीटरच्या अंतरावर हा समुद्रकिनारा आहे आणि येथे पोहचण्यासाठी २५ मिनिटांचा वेळ लागतो.

आणखी वाचा : गोव्यातील 45 बीच बद्दल माहिती

Kerala Beaches In Marathi |

Thiruvananthapuram मधील बीच :

  • Kovalam Beach
    • त्रिवेंद्रम शहरापासून हा समुद्रकिनारा १५ किलोमीटर अंतरावर आहे.
    • हा समुद्रकिनारा फक्त भारतातच नाही जगभरात प्रसिद्ध आहे इथे असणाऱ्या स्वच्छता आणि नारळाची झाडे यांसाठी आणि इथे असणाऱ्या कॅफे जी अतिशय सुंदर बनवली आहेत. या समुद्रकिनाऱ्याला #blueflagcertification मिळालेले आहे.
    • या बीच वर फक्त सरकारी दुकानांमध्येच बिअर वाईन आणि हार्ड लिकर विकण्याची परवानगी आहे.
    • या बीच वरील वाळू हि सोनेरी नसून हलक्या काळ्या रंगाची पाहायला मिळते.
  • Shankumugham Beach
    • त्रिवेंद्रम या शहरापासून ८ किलोमीटर अंतरावर हे बीच आहे.
    • येथील sunset अतिशय सुंदर आहे या ठिकाणचे वातावरण हे अतिशय शांत असल्याकारणाने येथील पर्यटकांना शहरातील गर्दीपासून दूर या ठिकाणी सुंदर अशी संध्याकाळचा वेळ घालवायला आवडतो.
  • Vizhinjam Beach
    • कोवलम बीच पासून फक्त ४ किलोमीटरच्या अंतरावर हे बीच आहे.
    • हे बीच Maritime साठी प्रसिद्ध आहे.

Malappuram मधील बीच :

  • Padinjarekkara Beach
    • मलप्पुरम शहरात असणाऱ्या तिरुर या ठिकाणापासून १७ किलोमीटर अंतरावर हे बीच आहे.
    • या समुद्रकिनाऱ्यावरून sunset खूप छान दिसतो.

आणखी वाचा : कोकणात फिरायला जायचंय ? मग या 15 Beaches ला नक्की भेट द्या..

Kerala Beaches In Marathi |

Varkala मधील बीच :

  • Varkala Beach
    • हे बीच ” मिनी गोवा ” म्हणून ओळखला जातो. येथील समुद्रकिनारा हा इतर सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे.
    • ” द ग्रेट एझारा बीच ” म्हणून हे बीच ओळखले जाते. तसेच या समुद्रकिनाऱ्याला ” पापनाशम ” बीच म्हणूनही ओळखले जाते.
    • येथील वातावरण हे उष्ण आणि दमट आहे. तसेच पावसाळ्यात येथे मुसळधार पाऊस होतो.
    • या ठिकाणाला स्वामी जनार्दन मंदिरासाठीही ओळखले जाते. जे एक भारतातील एक महत्वाचे आणि सुंदर पुरातन वैष्णव मंदिर आहे आणि याला दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते. येथे आयुर्वेदिक औषोपचार हि केले जातात.
    • या ठिकाणाला भेट देण्याची योग्य वेळ हि ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा सर्वोत्तम काळ आहे.
    • या ठिकाणी श्री नारायण गुरूंची समाधी देखील; आहे त्यामुळे हे एक तीर्थक्षेत्र म्हणूनही ओळ्खले जाते.
  • Kappil Beach
    • जर तुम्ही वर्कला बीच ला भेट दिली असेल तर तिथून थोड्याच अंतरावर कपिल हे बीच आहे ऑटोरिक्षा ने तुम्ही या बीच ला भेट देऊ शकता अवघ्या काही मिनिटातच तुम्ही ऑटो रिक्षा ने वर्कला बीच वरून येथे येऊ शकता.
    • हे बीच सुद्धा अतिशय सुंदर आहे

Alappuzha मधील बीच :

  • Andhakaranazhi Beach
    • हे बीच केरळ मधील कोची म्हणजेच कोचीन या शहरापासून ३० किलोमीटरच्या अंतरावर असून या ठिकाणी जाण्यास जवळजवळ १ तसंच वेळ लागतो.
    • हे बीओच अतिशय शांत आणि शहरापासून दूर असल्या कारणाने हवेत शांतपणा जाणवतो.
  • Alappuzha Beach
    • प्राचीन घाट आणि दिपगृहाच्या सौंदर्याने नटलेले हे बीच अलप्पुझा या शहरात आहे. इथे असणारा हा घाट जवळपास १४० वर्षे जुना असावा असा अंदाज आहे.
    • १५ किलोमीटर लांबीचा हा समुद्र किनारा सोनेरी वाळूने अतिशय सुंदर दिसतो.
  • Marari Beach
    • अलप्पुझा या शहरापासून ११ किलोमीटरच्या अंतरावर हे बीच आहे. या बीच पाणी हे अतिशय स्वच्छ आणि नितळ आहे आणि इथे पोहणे सुद्धा सुरक्षित आहे.
    • या बीच वरील सूर्योदय आणि सूर्यास्त अतिशय सुंदर आहे.
Kerala Beaches In Marathi |

Kasaragod मधील बीच :

  • Bekal Beach
    • पांढरी वाळू असणार हे बीच अतिशय सुंदर आहे आणि या समुद्रकिनाऱ्या वरून बेकल हा किल्ला खूप सुंदर दिसतो.
    • या बीच ला भेट देण्यासाठी नोव्हेम्बर ते फेब्रुवारी हा काळ योग्य आहे कारण या थंडीच्या दिवसात इथले वातावरण चांगले असते.
  • Kanwatheertha Beach
    • मंजेश्वर येथील कानवतीर्थ हे बीच एका तलावासारखे दिसणारे बीच आहे.

Kochi मधील बीच :

  • Kuzhupilly Beach
    • जलतरंग पटूनसाठी आवडते बीच म्हणजे कुझुपिली. पांढरी वाळू आणि जलतरंगासाठी हे बीच अतिशय लोकप्रिय आहे.
  • Cherai Beach
    • चराई हे बीच कोची या शहरापासून २५ किलोमीटर अंतरावर आहे.
    • दिवसभर किंवा रात्री कधीही तुम्ही या बीच वर जाऊ शकता. दोन्हीही वेळेस या बीच च्या सुंदरतेचा वाढच होत असते.

आणखी वाचा : महाबळेश्वर मधील 10 सुंदर पर्यटन स्थळे

Kerala Beaches In Marathi |

Thrissur

  • Chavakkad Beach
    • त्रिशूर जिल्ह्यातील हा समुद्रकिनारा गुरुवायूर मंदिर जे श्रीकृष्णाचे मंदिर म्हणून लोकप्रिय आहे त्यापासून ५ किलोमीटर अंतरावर आहे.
    • या ठिकाणी नदी आणि समुद्राचा संगम होतो त्यामुळे हे बीच अतिशय सुंदर दिसते.
  • Nattika Beach
    • या बीच वर तुम्हाला country boats , elephants rides , beach – games , deep – sea fishing मनसोक्त आनंद घेता येईल.

Calicut मधील बीच :

  • Kolavipalam Beach
    • ४ किलोमीटर वर पसरलेला हा समुद्रकिनारा अतिशय सुंदर आहे. या बीच च्या जवळपास वाडकारा आणि पाययोली हे बीच सुद्धा आहेत.

Kadavu मधील बीच :

  • Beypore Beach
    • हा समुद्रकिनारा जहाजबांधणीसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जहाज बांधणीचे काम चालू असते.
    • हे शहर लहान जरी असले तरी या वैशिष्ट्य पूर्ण शहराला एक प्राचीन इतिहास आहे.

Kovalam मधील बीच :

  • Chowara Beach
    • तिरुअनंतपुरम या शहराला पासून २५ किलोमीटरच्या अंतरावर हे बीच आहे. या बीच वरील सोनेरी वाळू आणि इथे असणारे नारळाची झाडे या ठिकाणचे वैशिष्टय आहे.
    • या समुद्र किनाऱ्याचे पाणी अतिशय स्वच्च आहे.

Kozhikode मधील बीच :

  • Kozhikode Beach
    • sea food आवडणाऱ्या पर्यटकांसाठी हे बीच आकर्षण पॉईंट आहे कारण या ठिकाणी उत्तम प्रकारचे जेवण तुम्हाला मिळेल.
    • पूर्वीच्या काळी येथे कापूस विक्रीचे केंद्र होते त्यामुळे या ठिकाणचे नाव कॅलिकोचे असे होते. या समुद्रकिनाऱ्यावर एक दीपगृह सुद्धा आहे जे १०० वर्षांहून अधिक जुने असेल असे म्हटले जाते.
  • Kappad Beach
    • २७ मे १४९८ रोजी वास्को द गामा या खलाशाने याच बीच वर प्रथम पाऊल ठेवले असल्या कारणाने या बीच ला एक ऐतिहासिक महत्व देण्यात आले आहे.
    • या बीच ला पूर्वी मसाल्याचा मार्ग म्हणून ओळखले जात असे. कारण दळण वळणासाठी ह्या बीच चे अधिक महत्व आहे.
    • त्याचबरोबर या बीच वर boat rides , beach games आणि back water मध्ये खेळण्यासाठी पर्यटक या ठिकाणी येत असतात.

Kollam मधील बीच :

  • Neendakara Beach
    • कोल्लम या ठिकाणापासून ८ किलोमीटरच्या अंतरावर हे बीच आहे. अष्टमुडी झील आणि समुद्र यांचा अनोखा संगम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे इथला परिसर अतिशय सुंदर आहे.

आणखी वाचा : नाशिक जवळील १० निसर्गरम्य स्थळे