Forts In Pune In Marathi | पुण्यातील 18 महत्वाची किल्ले

Forts In Pune In Marathi |

महाराष्ट्राची सुंदरता दाखवणारे किल्ले ट्रेक करणाऱ्या पर्यटकांची पहिली पसंती असते. पुण्यामध्ये अनेक किल्ले आहेत जी तुम्हाला मान्सून मध्ये ट्रेक करण्यासाठी खूप चांगली आहेत. पावसाळ्यात या किल्ल्याने नक्की भेट द्या अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य असे वातावरण या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. या ब्लॉग Forts In Pune In Marathi मध्ये आपण पुण्यातील या किल्ल्यांची माहिती पाहणार आहोत.

  • शिवनेरी ( Shivneri )
  • सिंहगड ( Sinhgad )
  • पुरंदर ( Purandar )
  • राजगड ( Rajgad )
  • लोहगड ( Lohgad )
  • विसापूर ( Visapur )
  • राजमाची ( Rajmachi )
  • विचित्रगड ( Vichitrgad )
  • मल्हारगड ( Malhargad )
  • प्रचंडगड ( Prachandgad )
  • हडसर ( Hadsar )
  • नारायणगड ( Narayangad )
  • तुंग ( Tung )
  • तिकोना ( Tikona )
  • जीवधन ( Jivdhan )
  • चावंड ( Chavand )
  • चाकण ( Chakan )
  • कुवारी ( Kuvari )

आणखी वाचा : कोकणात फिरायला जायचंय ? मग या 15 Beaches ला नक्की भेट द्या..

Forts In Pune In Marathi |

शिवनेरी ( Shivneri )

  • पुण्यापासून ९८ किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे आणि इथे जाण्यासाठी तुम्हाला जवळ जवळ अडीच तासांचा वेळ लागतो.
  • सुमारे ४०० ते ५०० पायऱ्या चढून आपण या किल्ल्यावर जाऊ शकतो आणि त्यासाठी साधारण ४५ मिनिटांचा वेळ लागतो.
  • छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या ठिकाणी झालेला असल्या कारणाने या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते.
  • हा किल्ला १६ व्या शतकात बांधलेला आहे आणि शिवाजी महाराजांचे बालपण या किल्ल्यामध्ये गेले आहे.
  • या किल्ल्याला भेट देण्याचा योग्य कालावधी हा ऑक्टोबर ते मार्च असा आहे कारण या दिवसांमध्ये इथले वातावरण अतिशय थंड आणि आल्हाददायक असते.

सिंहगड ( Sinhgad )

  • पुण्यापासून ३७ किलोमीटर अंतरावर हा किल्ला असून १ ते दीड तास लागतात.
  • या किल्ल्यावर जाणार असाल तर इथे तुम्ही ट्रेक करूनही जाऊ शकता किंवा डायरेक्ट किल्ल्याजवळ आपली स्वतःची वाहने सुद्धा घेऊन जाऊ शकता. अगदी किल्ल्यापर्यंत वाहने घेऊन जाण्याची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे.
  • जर तुम्ही ट्रेक करत गडावर जाणार असाल तर तुम्हाला ४० ते ४५ मिनिटांचा वेळ लागतो.
  • हा एक ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे आणि याचे नाव आधी ” कोंढाणा ” असे होते परंतु १६७० मध्ये शिवाजी महाराजांनी तान्हाजी मालुसरे यांच्या स्मरणार्थ या किल्ल्याचे नाव सिंहगड असे ठेवले.

पुरंदर ( Purandar )

  • पुण्यापासून ४० किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे आणि येथे जाण्यासाठी तुम्हाला साधारण १ ते दीड तासांचा वेळ लागतो.
  • हा किल्ला ट्रेकिंग साठी अवघड आहे आणि तुम्ही ट्रेकिंग करत जाणार असेल तर तुम्हाला जवळ जवळ २ ते अडीच तासांचा वेळ लागेल.
  • या किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला होता. म्हणून हा किल्ला शिवप्रेमींयांसाठी आवडता किल्ला आहे.
  • हा किल्ला समुद्रसपाटीपासून १३८७ मित्र उंचीवर आहे.
  • आपण या किल्ल्यावर आपली स्वतःची वाहने घेऊन सुद्धा जाऊ शकतो.

राजगड ( Rajgad )

  • पुण्यापासून ३६ किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे आणि इथे जाण्यासाठी साधारण १ ते दीड तासांचा कालावधी लागतो.
  • या गडावर आपण स्वतःची वाहने घेऊन जाऊ शकत नाही या गडावर जाण्यासाठी तुम्हाला ट्रेक करावी लागणार आहे.
  • ५ किलोमीटरचा ट्रेक करावा लागतो आणि त्यासाठी ४० ते ४५ मिनिटांचा वेळ लागतो.
  • आता या किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवे ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. हा एक डोंगरी किल्ला आहे आणि या ठिकाणी जायचे असेल तर आपल्या खाण्यापिण्याचे सामान स्वतः घेऊन जावे आणि या ठिकाणी कचरा करू नये.

लोहगड ( Lohgad )

  • पुण्यापासून ६८ किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे आणि त्यासाठी जवळ जवळ २ तासांचा कालावधी लागतो.
  • हा किल्ला १२ व्या शतकात बांधलेला आहे. अनेक राजांनी या किल्ल्यावर राहून राज्य केलेलं आहे. शिवाजी महाराजांनी हा किल्ला १६४८ मध्ये हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला होता.
  • हा किल्ला विनामूल्य प्रवेश करता येतो आणि इथे भेट देण्यासाठी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत चा कालावधीतच प्रवेशद्वार खुला असतो.
  • या गडाच्या पायथ्यापर्यंत आपण आपली वाहने घेऊन जाऊ शकतो. आणि या ठिकाणी टेन्ड कॅम्पिंग करण्याची परवानगी आहे परंतु त्यासाठी तुम्हाला इथल्या स्वच्यतेचीही काळजी घेणं गरजेच आहे.

आणखी वाचा : नाशिक जवळील १० निसर्गरम्य स्थळे

Forts In Pune In Marathi |

विसापूर ( Visapur )

  • पुण्यापासून ५७.६ किलोमीटर अंतरावर हा किल्ला असून त्याला जवळ जवळ २ तसंच वेळ लागतो.
  • या किल्ल्याची उंची ३५६७ मीटर उंच आहे आणि या किल्ल्याचा ट्रेक हा माध्यम कठीण प्रकारचा आहे.
  • या किल्ल्यावर गेल्यावर तुम्हाला पाणी मिळणार नाही त्यामुळे आपल्याला हवे तेवढे पाणी तुम्हाला स्वतःच घेऊन जावे लागणार आहे.

राजमाची किल्ला ( Rajmachi )

  • १६९.७ किलोमीटर अंतरावर हा किल्ला असून इथे जाण्यासाठी ३ ते साडे ३ तासांचा वेळ लागतो.
  • या किल्ल्याचा ट्रेक हा १३ किलोमीटरचा लांब आहे.
  • या ठिकाणी पर्यटनासाठी येण्याचा योग्य कालावधी हा सप्टेंबर ते डिसेंबर हा आहे. पावसाळ्यातील इथले वातावरण अतिशय निसर्गरम्य असते.
  • या ठिकाणी पावसाच्या दिवसांमध्ये छोटे मोठे धबधबे सुद्धा पाहायला मिळतात.

विचित्रगड ( Vichitrgad )

  • विचित्रगडलाच रोहिडा किल्ला असेही म्हणतात. हा किल्ला भोरपासून १० किलोमीटरच्या अंतरावर आहे.
  • या गडाची उंची १११६ मीटर आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये येथे वातावरण अतिशय सुंदर असते.

मल्हारगड ( Malhargad )

  • पुणे जिल्ह्यातील सासवड च्या जवळ हा किल्ला आहे. हा किल्ला पुण्यापासून ३० किलोमीटरच्या अंतरावर आहे. हा एक गिरिदुर्ग आहे. या किल्ल्याची उंची ३१०० मीटर आहे.
  • हा किल्ला पेशवे पानसे यांनी बांधलेला आहे.

प्रचंडगड ( Prachandgad )

  • प्रचंडगड या किल्ल्याला तोरणा किल्ला असेही म्हटले जाते. हा किल्ला पुण्यातील वेल्हे या ठिकाणी आहे.
  • हा किल्ला अतिशय दुर्गम आणि अतिशय प्रचंड असा आहे. शिवाजी महाराजांनी जेव्हा हा किल्ला जिंकून घेतला तेव्हा या किल्ल्याचे नाव तोरणा असे ठेवले होते.
  • या किल्ल्यावर जाण्यासाठी तुमचा संपूर्ण दिवस लागणार आहे कारण याच्या प्रवेशद्वारापर्यंत येण्यासाठी जवळ पास २ तसंच कालावधी लागतो आणि त्यानंतर संपूर्ण किल्ला फिरण्यासाठी जवळ जवळ ३ ते ४ तास लागतात. हा ट्रेक माध्यम आणि कठीण स्वरूपाचा असणार आहे.
  • या किल्ल्याची उंची १४०० मिटर आहे.

आणखी वाचा : महाबळेश्वर मधील 10 सुंदर पर्यटन स्थळे

Forts In Pune In Marathi |

हडसर ( Hadsar )

  • हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर या ठिकाणी आहे. जुन्नर या शहरापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे.
  • या किल्ल्याची उंची ३२५६ मीटर उंच आहे.

नारायणगड ( Narayangad )

  • हा एक गिरिदुर्ग आहे. इथे गडाची वाडी नावाची एक वस्ती आहे. हा डोंगरी किल्ला पुणे – नाशिक रोडवर नारायण गाव या ठिकाणी आहे.
  • या गडाची उंची सुमारे २५५७ मीटर आहे. या गडाचा ट्रेक मध्यम कठीण आहे.
  • पुण्यापासून ८७.६ किलोमीटर लांब आहे आणि इथे जाण्यासाठी साधारण अडीच तासांचा वेळ लागतो.

तुंग ( Tung )

  • हा किल्ला पुण्यापासून ६४.४ किलोमीटर लांब आहे आणि येथे जाण्यासाठी २ तासांचा कालावधी लागतो.
  • या किल्ल्याचा ट्रेक अत्यंत कठीण आहे आणि पवना धरणापासून साधारण ४०० मीटर उंच चढाई करावी लागते.
  • हा किल्ला लोणावळ्यापासून सुमारे २३ किलोमीटर अंतरावर आहे आणि इथला परिसर अत्यंत सुंदर आहे.

तिकोना ( Tikona )

  • पुण्यापासून ५२ किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे आणि २ तासांचा वेळ लागतो.
  • या किल्ल्याचा ट्रेक अतिशय सोपा आहे आणि त्यासाठी जवळ जवळ दीड ते २ .तासांचा वेळ लागतो.
  • या किल्ल्याची उंची ३५७९ मीटर आहे.

जीवधन ( Jivdhan )

  • पुण्यापासून १२४ किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे या ठिकाणी जाण्यासाठी ३ ते ४ तासांचा वेळ लागतो.
  • या किल्ल्याचा ट्रेक अवघड या प्रकारात मोडतो परंतु त्याचबरोबर हा ट्रेक तेवढाच सुरक्षित हि बनवलेला आहे. वानरलिंगी व्हॅली क्रॉसिंग, रॅपलिंग यांचीही या ठिकाणी सोय आहे.

आणखी वाचा : लोणावळ्यातील 25 निसर्गरम्य पर्यटन स्थळे

Forts In Pune In Marathi |

चावंड ( Chavand )

  • महाराणा प्रताप यांनी हा किल्ला बांधला आहे आणि यावेळेस त्यांनी राठोड घराण्याचा पराभव करून या किल्ल्यावर आपली राजधानी बनवली होती. याच किल्ल्यावर महाराणा प्रताप यांनी चामुंडा देवीचे मंदिर बांधले.
  • हा किल्ला जुन्नर तालुक्यात असून पुण्यापासून ११० किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे.

चाकण ( Chakan )

  • पुण्यापासून ३५ किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे आणि जवळ जवळ दिड तासांचा वेळ लागतो.
  • हा एक जुना किल्ला आहे आणि इथंला परिसर अत्यंत सुंदर आहे.

कुवारी ( Kuvari )

  • हा एक अतिशय सुंदर असा किल्ला पुणे जिल्ह्यात आहे.

आणखी वाचा : गोव्यातील 45 बीच बद्दल माहिती