Mumbai Tourist Places Information In Marathi | मुंबई मधील 25+ सर्वोत्तम पर्यटन स्थळे

Mumbai Tourist Places Information In Marathi |

महाराष्ट्र राज्याची राजधानी असणारी आपली सर्वांची आवडती आपली मुंबई… खूप सारे लोक खूप सारे स्वप्न घेऊन या शहरात येत असतात. कोणी corporate क्षेत्रात कामानिमित्त येत, तर कोणी फिल्मसिटी मध्ये आपलं नशीब पडताळायला येत, तर कोणी रोज एक वेळच आपलं पोट भारत येईल काहीतरी काम करून या साठी या शहरात येत असत. एक ना अनेक स्वप्न घेऊन या शहरात रोज कोणी ना कोणी येतच असत. परंतु आज आपण या ठिकाणी इथले आकर्षक अशी पर्यटन स्थळे पाहणार आहोत. चला तर मग या ब्लॉग Mumbai Tourist Places Information In Marathi मध्ये पाहुयात अशीच काही पर्यटन स्थळे …..

  • Gate Way Of India ( गेट वे ऑफ इंडिया )
  • Marine Drive ( मरीन ड्राईव्ह )
  • Elephanta Caves ( एलिफंटा लेणी )
  • Chhatrapati shivaji Terminus ( छत्रपती शिवाजी टर्मिनल)
  • Global Vipassana Pagoda ( ग्लोबल विपासना पागोडा)
  • Colaba Causeway ( कोलाबा बांध)
  • Siddhivinayak Temple ( सिद्धिविनायक मंदिर)
  • Hanging Garden ( हँगिंग गार्डन)
  • Juhu ( जुहु)
  • Haji Ali Dargah ( हाजी अली दर्गाह)
  • Bollywood Tours ( बॉलीवूड टूर)
  • Dharavi ( धारावी)
  • Powai Lake ( पवाई तलाव )
  • Sailing In Mumbai ( सेलिंग मुंबई )
  • Girgaum Chowpatty ( गिरगाव चौपाटी)
  • ISKCON Temple, Juhu ( ISKCON मंदिर, जुहू )
  • Dhobi Ghat ( धोबी घाट)
  • Worli Sea Link Bridge ( वारली ब्रिज)
  • Sanjay Gandhi National Park ( संजय गांधी नॅशनल पार्क)
  • Essel World ( एस्सेल वर्ल्ड)
  • Nehru Science Center ( नेहरू सायन्स केंद्र )

आणखी वाचा : कोकणात फिरायला जायचंय ? मग या 15 Beaches ला नक्की भेट द्या..

Mumbai Tourist Places Information In Marathi |

Gate Way Of India

  • २० व्या शतकात हे स्मारक अपोलो बंदर येथे बांधण्यात आले आहे. १९११ मध्ये Queen Merry आणि King Jorge Pancham हे पहिल्यांदा जेव्हा भारतात आले तेव्हा ते याच ठिकाणाहून आले असता त्यांच्या स्मरणार्थ हे स्मारक या ठिकाणी बांधण्यात आले होते. आता हे स्मारक मुंबईची एक ओळख म्हणून प्रसिद्ध आहे.
  • अनेक पर्यटक या ठिकाणी भेट देण्यास येत असतात. याच परिसरात मुंबईचे नावाजलेले हॉटेल ” हॉटेल ताज ” आहे.

Marine Drive

  • मुंबईमधील सर्वात रोमँटिक असं ठिकाण म्हणजे मारिन ड्राईव्ह… अनेक couples या ठिकाणाला आवर्जून भेट देतात.
  • या ठिकाणी भेट देण्यासाठी शक्यतो सकाळ आणि संध्याकाळची वेळ योग्य आहे.
  • रोज सकाळी या ठिकाणी इथली लोकल पब्लिक जॉगिंग साठी येतात.
  • संध्याकाळ ची वेळी या ठिकाणी भेट देण्यास अत्यंत चांगली आहे कारण एक निवांत संध्याकाळ जर तुम्हाला घालवायची असेल तर हे ठिकाण चांगले आहे.

Elephanta Caves

  • मुंबई पासून १० किलोमीटर असणार हे पर्यटन स्थळ “घारापुरी” या ठिकाणी स्थित आहे.
  • हि गुहा ८ व्या शतकात राष्ट्रकूट राजांनी खोदलेली असून या ठिकाणी भगवान शिवाच्या वैभवाचे कोरीव काम केले आहे.
  • या ठिकाणी जाण्यासाठी बोटींची व्यवस्था आहे त्यामुळे या ठिकाणी जाण्याचा आनंद हा दुगुणा होतो.

Chhatrapati shivaji Terminus

  • पूर्वी या ठिकाणचे नाव VT म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनस असे होते परंतु नंतर याचे नाव बदलून याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे ठेवण्यात आले.
  • अतिशय सुंदर असं हे रेल्वे स्टेशन आहे आणि हे १८ व्या शतकात बांधलेले आहे.

Global Vipassana Pagoda

  • हे स्तूप ३ ऱ्या शतकातील इसवी सन पूर्व महान बुद्ध सिद्धार्थ गौतम यांच्या काळातील असून हे स्तूप पहिले पॅगोडा बौद्ध धर्माचे स्तूप म्हणून ओळखले जाते.
  • येथे येऊन बौद्ध धर्माचे लोक प्रार्थना करता किंवा ध्यानास बसतात. या ठिकाणी भगवान बुद्ध आणि त्याच बरोबर इतर सर्व भारतीय धर्माची उपासना केली जाते.

Colaba Causeway

  • या ठिकाणी खूप मोठं मार्केट आहे आणि या ठिकाणाला कोलाबा हे नाव तेथे असणाऱ्या कोळी लोकांमुळे पडलेले आहे.

आणखी वाचा : महाबळेश्वर मधील 10 सुंदर पर्यटन स्थळे

Mumbai Tourist Places Information In Marathi |

Siddhivinayak Temple

  • SK bole रोड , प्रभादेवी मुंबई या ठिकाणी हे सिद्धिविनायक मंदिर आहे. या ठिकाणी भाविकांची गर्दी हि असतेच, पहाटे ३.१५ पासून रात्री १० वाजेपर्यंत आपण या ठिकाणी दर्शनास येऊ शकतो.
  • १८०१ साली या मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. या ठिकाणी नवीन नियमन जाहीर केल्यानुसार ऑनलाईन बुकिंग करावी लागते त्याशिवाय दर्शन घेता येत नाही.

Hanging Garden

  • Ridge Rd, शिमला नगर , Malabar Hill, Mumbai या ठिकाणी हे गार्डन आहे.
  • हे गार्डन भव्य असून या ठिकाणी जॉगिंग आणि ध्यानासाठी पाहायच्या वेळी लोकांची जास्त गर्दी असते.
  • हिरव्यागार परिसरात लहान मुलांसाठी त्यांना खेळण्यासाठी अनेक खेळण्या ठेवण्यात आलेल्या आहेत.

Juhu

  • या ठिकाणी पर्यटक फक्त समुद्रकिनारा पाहायलाच नाही तर या ठिकाणी असणाऱ्या स्ट्रीट फूड साठी येतात. या ठिकाणी मिळणारी भेळ, पाणीपुरी वडापाव आणि त्याच बरोबर पावभाजी खूप जास्त फेमस आहे.
  • या ठिकाणी सुर्यास्थानांतर पाण्यात जाण्यास परवानगी नाही.
  • याच ठिकाणी अभिनेता अमिताभ बच्चन यांचे घर असल्याकारणाने या ठिकाणी पर्यटकांची कायम गर्दी असते.

Haji Ali Dargah

  • हा दर्गाह पाण्यावर तरंगत आहे असा आभास होतो. चहुबाजूने पाण्यावर असणाऱ्या या दर्गाहवर पर्यटन आवर्जून भेट देत असतात.
  • या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना हि विनंती असते कि विनम्र कपडे घालावे आणि डोके झाकलेले असावे.

Bollywood Tours

  • तुम्ही बॉलीवूड चे दिवाने असाल तर या ठिकाणाला नक्कीच भेट द्या. या ठिकाणी वेगवेगळ्या सिनेमांचे चित्रीकरण होत असते.
  • या ठिकाणाला भेट देण्यासाठी तुम्हाला तिकीट बुक करावे लागतात ज्याची किंमत तुम्हाला द्यावी लागेल.
  • या ठिकाणाला अनेक लोक आवर्जून भेट देत असतात.

Dharavi

  • धारावी हा एक दाट लोकवस्ती असलेला शहरी भाग म्हणजेच झोपडपट्टी एरिया म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी अनेक लघुउदयॊग करणारे लोक राहतात जसे कि पुनर्वापर, मातीची भांडी, कापड आणि चामड्याचे उत्पादन.
  • संपूर्ण भारतातील लोक जे फक्त कामानिमित्त मुंबई या ठिकाणी आले आहेत असे लोक या ठिकाणी राहतात.

Powai Lake

  • मुंबईला पाणीपुरवठा करणारा हा तलाव ब्रिटिश राजवटीत १८९० मध्ये बांधण्यात आला होता. या तलावाच्या पूर्वेस IIT Bombay असल्या कारणाने या ठिकाण च view अतिशय सुंदर दिसतो.

आणखी वाचा : नाशिक जवळील १० निसर्गरम्य स्थळे

Mumbai Tourist Places Information In Marathi |

Sailing In Mumbai

  • या ठिकाणी काही नावाजलेले sailing clubs आहेत. जसे कि Gateway Sailing Club , Aquasail 360 Sailing आणि Dreams Sailing Club या ठिकाणी तुम्ही sailing चा आनंद घेऊ शकता.
  • या ठिकाणी ३५०० पासून sailing च्या किमती चालू होतात.
  • समुद्रकिनारी आलात आणि sailing केली नाही तर काय मजा केली.

Girgaum Chowpatty

  • गणपती विसर्जनासाठी या ठिकाणी भाविकांची खूप जास्त गर्दी असते. मुंबईतील बहुतांश गणपती या ठिकाणी विसर्जनासाठी येत असतात.
  • त्याच प्रमाणे दसऱ्याच्या वेळेस राम-लीला प्रदर्शन केले जाते.

ISKCON Temple, Juhu

  • जुहू मध्ये असणारे हे मंदिर खूप जास्त लोकप्रिय आहे. या ठिकाणी कृष्ण भक्तांची कायमच गर्दी असते.
  • हे मंदिर वैदिक किंवा हिंदू संस्कृतीतील एक गौडीय वैष्णव संप्रदायाशी संबंधित असणारे आहे.

Dhobi Ghat

  • हे जगातील सर्वात मोठे मैदान आहे जे कपडे धुण्यासाठी बनवण्यात आले आहे.
  • या ठिकाणी मुंबईतील सर्वात जास्त धोबी काम करणारे लोक राहतात जे मुंबईतील लोकांचे कपडे धुवून इस्त्री करून दिले जातात.

Worli Sea Link Bridge

  • ५.६ किलोमीटर लांब असणारा हा ब्रिज मुंबईच्या सुंदरतेचा आणखी भर घालते. या ठिकाणी पर्यटक हा ब्रिज पाहण्यासाठी आणि समुद्रकिनाऱ्याच्या आनंद घेण्यासाठी जमतात.
  • अनेक चित्रपटांमध्येही या ब्रिज चे चित्रीकरण करण्यात आलेले आहे. मुंबईच्या श्रीमंतीचे हे एक प्रतीक आहे.

आणखी वाचा : पुण्यातील 20+ सुंदर बाग

Mumbai Tourist Places Information In Marathi |

Sanjay Gandhi National Park

  • शहराच्या हद्दी मध्ये असणारे हे जगातील सर्वात मोठे उद्यान आहे. दरवर्षी २० ते ३० लाखांहुनही अधिक पर्यटक या ठिकाणाला भेट देत असतात.
  • या ठिकाणी हरीण , बिबट्या, फ्लॅइंग फॉक्स , किंगफिशर, sunbirds आणि सिंह यांसारखे प्राणी आणि पक्षी पाहायला मिळतात.

Essel World

  • या ठिकाणी अनेक राइड्स तुम्हाला खेळायला मिळतात. १५०० रुपये तिकिट काढून या ठिकाणी तुम्ही तुमचा संपूर्ण दिवस घालवू शकता.
  • ऱ्या ठिकाणी वॉटर राइड्स हि तुम्हाला खेळायला मिळतील.

Nehru Science Center

  • ज्यांना विज्ञान या विषयाची आवड असेल त्यांच्या साठी हे ठिकाण सर्वोत्तम आहे. या ठिकाणी फिरण्यासाठी ४ ते ५ तसंच वेळ लागतो.
  • या ठिकाणी असणाऱ्या विज्ञान शी संबंधित उपकरणे पाहायला अनेक लोकांची गर्दी असते.

आणखी वाचा : पुण्यातील 18 महत्वाची किल्ले