Maharashtra Tourist Places In Marathi |
महाराष्ट्रात फिरायला अनेक छोटी मोठी पर्यटन ठिकाणे आहेत. अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य असे वातावरण असणारे अनेक ठिकाण महाराष्ट्रात पाहायला मिळतील. महाराष्ट्रात अनेक किल्ले, किनारपट्टी, मार्केट आणि बगीचे पाहायला मिळतात. इथली अनेक शहरे अशी आहेत जी पाहायला अनेक पर्यटक येत असतात. या ब्लॉग Maharashtra Tourist Places In Marathi मध्ये आपण अशेच काही पर्यटन स्थळे पाहणार आहोत.
- Mumbai ( मुंबई )
- Igatpuri ( इगतपुरी)
- Matheran ( माथेरान)
- Ganpati pule ( गणपती पुळे)
- Sambhaji Nagar ( संभाजी नगर)
- Tarkarli ( तारकर्ली )
- khandala Ghat ( खंडाळा घाट)
- Pachagani ( पाचगणी )
- Diveagar ( दिवेआगर )
- Malvan ( मालवण)
- Mahabaleshwar ( महाबळेश्वर )
आणखी वाचा : कोकणात फिरायला जायचंय ? मग या 15 Beaches ला नक्की भेट द्या..
Maharashtra Tourist Places In Marathi |
Mumbai ( मुंबई )
- मुंबई हि महाराष्ट्राची राजधानी असून हे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत शहर आहे. त्याच बरोबर इथे अनेक पर्यटन स्थळे देखील आहेत.
- सुंदर असा समुद्रकिनारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी एक ठिकाण तुम्हाला असे पाहायला मिळेल कि जिथे अनेक जोडपी आपला quality time घालवायला येत असतात आणि ते म्हणजे मारिन ड्राईव्ह. या ठिकाणी तुम्हाला समुद्रकिनाऱ्यावर बसून एक आनंदाचा क्षण घालवू शकता.
- त्याचबरोबर इथे असणारे बाजार, हॉटेल्स , ब्रिज, मंदिर , मस्जिद, पार्क आणि बीचेस तुम्हाला पाहायला मिळेल.
- या ठिकाणी मिळणारे काही खाद्य पदार्थ हि खूप जास्त फेमस आहेत जसे कि वडापाव, भजी, पावभाजी आणि पाणीपुरी यांसारखे चाट या ठिकाणी खूप जास्त आवडीने खालले जातात.
Igatpuri ( इगतपुरी)
- सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले हे शहर पूर्णपणे निसर्गरम्य पर्यटन स्थळांनी भरलेले आहे.
- हे ठिकाण नाशिक जिल्ह्यात असून या ठिकाणी अनेक पर्यटक पावसाळ्यात आणि हिवाळ्यात भेट देत असतात.
- या ठिकाणी अनेक ट्रेक तुम्हाला पाहायला मिळतील त्याचबरोबर धबधबे, टेकड्या, लेणी, शिखर आणि मंदिर अतिशय सुंदर आहेत.
- या ठिकाण ची काही खास स्थळे : कळसुबाई शिखर, कसारा घाट, विहिगाव धबधबा, ट्रिंगळवाडी किल्ला, विपश्यना केंद्र, अमृतेश्वर मंदिर, बितनगड ट्रेक, कॅमल व्हॅली, सांधण व्हॅली, भावली धारण
- पावसाळ्यात या ठिकाणी अनेक पर्यटक ट्रेक साठी येत असतात. इथे येऊन ट्रेक करत अनेक धबधबे पाहायला मिळतात आणि इथले वातावरण अतिशय निसर्गरम्य असते. हिरवीगार शाल स्थळे जसे कि डोंगर आणि दऱ्या इथे पाहायला मिळतात.
Matheran ( माथेरान)
- या ठिकाणी जाण्याची योग्य वेळ हि सप्टेंबर ते मार्च हि आहे. या ठिकाणी या दिवसांमध्ये पाऊस पडलेला असतो त्यामुळे हिरवेगार वातावरण झालेले असते आणि वातावरणात थंडावा आलेला असतो.
- शहरातल्या धगधगत्या आयुष्याला कंटाळले असाल तर या ठिकाणी आपले मन ताजेतवाने व्हायला मदत होईल. या ठिकाणी अनेक पर्यटक येतात आणि इथल्या निसर्गाचा आनंद घेत असतात.
- या ठिकाणी असणारी हिरवी गर जंगले, तलाव आणि त्याच बरोबर धबधबे अतिशय सुंदर आहेत.
Ganpati pule ( गणपती पुळे)
- या ठिकाणी असणार मंदिर सुमारे ४०० वर्ष्यांपुर्वीचे आहे. या ठिकाणी गणपतीचे अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे आणि हे मंदिर समुद्रकिनाऱ्यावर आहे.
- या ठिकाणचा समुद्रकिनारा हा स्वच्छ आणि सुंदर आहे.
- या ठिकाणी भेट देण्यासाठी योग्य वेळ हि ऑक्टोबर ते मार्च हि आहे कारण या वेळेस येथील वातावरण हे थंड आणि आल्हाददायक असते.पावसाळ्यात या ठिकाणी समुद्रकिनारा हा खवळलेला असल्या कारणाने इथे जास्त पर्यटकांना पाण्यात येण्यास मनाई असते. त्यामुळे शक्यतो थंडीच्या दिवसांमध्ये या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते.
आणखी वाचा : महाबळेश्वर मधील 10 सुंदर पर्यटन स्थळे
Maharashtra Tourist Places In Marathi |
Sambhaji Nagar ( संभाजी नगर)
- पूर्वी या शहराला औरंगाबाद असे नाव होते. या ठिकाणी असणारे अजिंठा आणि वेरूळ लेणी खूप जास्त फेमस आहेत.
- खूप सारे पर्यटक या ठिकाणी या लेण्या पाहण्यासाठी येत असतात.
- या ठिकाणी १२ ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग या ठिकाणी आहे ते म्हणजे घृष्णेश्वर. या ठिकाणी अनेक भाविक भेट देत असतात.
- या ठिकाणी असणारे ” बीवी का मकबरा ” हे ताजमहाल ची प्रतिकृती आहे.
- जायकवाडी डॅम या ठिकाणीही पर्यटकांची गर्दी आहे .
tarkarli ( तारकर्ली )
- मालवण पासून ७ किलोमीटर वर हे ठिकाण असून हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे.
- या ठिकाणचा समुद्रकिनारा अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे आणि इथली वाळूही अतिशय सुंदर आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक आपल्या मानसिक समाधानासाठी येतात.
- या ठिकाणी स्कुबा डायविंग ची व्यवस्र्था आहे. इथे २० ते ४० फूट खोलीची स्कुबा डायविंग करता येते. त्याच बरोबर इथे snorkeling आणि parasailing यांसारखे वॉटर स्पोर्ट्स उपलब्ध आहेत.
- कोकण विभागाचा राणी बीच म्हणून या ठिकाणाला ओळखले जाते.
khandala Ghat ( खंडाळा घाट)
- हे एक पुणे जिल्ह्यातील हिल स्टेशन आहे. लोणावळा – खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रात अतिशय प्रसिद्ध आहे.
- हे ठिकाण चिक्की साठी खूप जास्त फेमस आहे.
- मुंबई आणि पुणे महामार्गावर हा खंडाळा घाट आहे आणि या ठिकाणी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खूप छान निसर्गरम्य वातावरण तयार होते आणि त्याचबरोबर अनेक छोटे मोठे धबधबे या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामुळे इथे भेट देण्याची योग्य वेळ हि जून ते सप्टेंबर आहे.
- या ठिकाणी असणारे तलाव हि पावसाने काठोकाठ भरलेले पाहायला मिळतात.
- या ठिकाणी धबधबे तर आहेतच त्याचबरोबर भाजा लेणी, बुशी धारण, कार्ल लेणी आणि राजमाची किल्ला त्याचबरोबर रायवूड तलाव यांसारखी निसर्गरम्य स्थळे पाहायला मिळतात.
Pachagani ( पाचगणी )
- पाचगणी ला भेट देण्याची योग्य वेळ हि सप्टेंबर ते एप्रिल दरम्यान आहे. पावसाळा आणि हिवाळ्यात या ठिकाणचे वातावरण हे थंड आणि आल्हाददायक झालेले असते.
- या स्थळाजवळूनच कृष्ण नदी वाहते त्यामुळे इथे धोम धारण बांधण्यात आलेले आहे या ठिकाणीही पर्यटकांची गर्दी असते.
- दांडेघर , गोदवली , आंब्राल , खिंगर आणि ताईघाट या पाच गावांचा ज्या टेकड्या आहेत यांचा मिळून हा प्रदेश निर्माण होतो ज्याला पाचगणी असे नाव देण्यात आले. थोडक्यात या पाच निसर्गरम्य टेकड्या मिळून पाचगणी बनते.
- समुद्रसपाटीपासून पाचगणी हे ठिकाण १३०० मीटर पेक्षा जास्त उंचीवर आहे.
- आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे पर्वतीय पठार म्हणून ओळखले जाणारे ” टेबल लँड ” हे पठार ज्याची उंची ४५०० मीटर उंच आहे हे याच ठिकाणी आहे.
आणखी वाचा : नाशिक जवळील १० निसर्गरम्य स्थळे
Maharashtra Tourist Places In Marathi |
Diveagar ( दिवेआगर )
- रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात हे दिवेआगर बीच आहे. मुंबईपासून १७० किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.
- या किनारपट्टीला भेट देण्याची योग्य वेळ हि ऑक्टोबर ते जानेवारी आहे. कारण या दिवसात या ठिकाण चे वातावरण हे कमी दमात आणि आल्हाददायक थंड असते.
- या ठिकाणी असणारे काही पर्यटन स्थळे : बाणकोट किल्ला , श्रीवर्धन बीच ,बागमंडला , हरिहरेश्वर बीच , रुपनारायण मंदिर , वेलास बीच, कोंडिवली बीच, मुरुड जंजिरा किल्ला , फणसाड पक्षी अभयारण्य
- दिवेआगर बीच त्याचबरोबर श्रीवर्धन बीच, हरिहरेश्वर बीच, कोंडिवली बीच मुरुड जंजिरा हे सर्व बीचेस अतिशय सुंदर आहेत या ठिकाणी तुम्ही वर्षातून कधीही भेट देऊ शकता.
Malvan ( मालवण)
- हे ठिकाण काजू, कोकम आमी त्याचबरोबर अल्फान्सो आंब्यांसाठी खूप जास्त प्रसिद्ध आहे आणि त्याचबरोबर इथले मसाले खूप जास्त आवडीने खरेदी केले जातात. इथे मिळणार मालवणी खाज हा गॉड पदार्थ आवर्जून पर्यटक घेतात.
- या ठिकाणी मालवण बीच आणि त्याच बरोबर देवबाग बीच, कोलम्ब बीच, चिवला बीच, आचार बीच, तोंडवळी बीच,वैरी भागवत बीच, आरसे महाल बीच हे समुद्रकिनारा सुद्धा खूप जास्त फेमस आहेत. या ठिकाणीही पर्यटकांची गर्दी असते.
- या ठिकाणचे फिश करी आणि भात हे प्रसिद्ध आहार आहे. या ठिकाणचे मालवणी मसाले अतिशय चविष्ट आहेत.
Mahabaleshwar ( महाबळेश्वर )
- हे एक महाराष्ट्रातील अतिशय नावाजलेले थंड हवेचे ठिकाण आहे. पाचगणी पासून अगदी थोड्याच अंतरावर हे ठिकाण आहे.
- या ठिकाणी असणारा प्रतापगड हा किल्ला ट्रेकिंग साठी ओळखला जातो. निर्मळ लिंगमला धबधबा आणि वेण्णा तलाव हे या ठिकाणच विशेष आकर्षण आहे.
- या ठिकाणी भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा कालावधी योग्य आहे.
- या ठिकाणी स्ट्रॉबेरी चे मळे तुम्हाला पाहायला मिळतील. स्ट्रॉबेरी चा नेहमीच हंगाम हा ऑक्टोबर – नोव्हेम्बर आणि एप्रिल -मे या दरम्यानचा असतो.
- महाबळेश्वर मध्ये असणारी पर्यटन स्थळे : महाबळेश्वर मंदिर, elephants हेड पॉईंट, प्रतापगड, कृष्णाबाई मंदिर, श्री पंचगंगा मंदिर, वेण्णा तलाव, लक्ष्मी स्ट्रॉबेरी फार्म, विल्सन पॉईंट,
आणखी वाचा : मुंबई मधील 25+ सर्वोत्तम पर्यटन स्थळे