Jaipur Tourist Places In Marathi |
जयपूरला पिंक सिटी असेही म्हणतात, पण पिंक सिटी का म्हणतात हे तुम्हाला माहित आहे का ? तर १८७६ मध्ये महाराजा राम सिंग यांनी या शहरातील सर्व घराणं गुलाबी रंगाने रंगवले असल्या कारणाने हे शहर गुलाबी रंगाचे दिसायला लागले त्यामुळे या शहराला पिंक सिटी असे नाव पडले. चला तर मग या ब्लॉग Jaipur Tourist Places In Marathi मध्ये पाहुयात या पिंक सिटी मधील पर्यटक स्थळांची माहिती..
- हवा महाल (Hava Mahal, Jaipur)
- आमेर सागर ( Amer Sagar, Jaipur)
- चुलगिरी जैन मंदिर (Chulgiri Jain Temple)
- बडी बाजार ( Badi Choupar, Jaipur)
- चांदलाई तलाव (Chandlai Lake)
- गलता मंदिर (Galta Temple)
- आमेर किल्ला ( Amer Fort)
- चोखी धानी (Chokhi Dhani)
- अल्बर्ट हॉल संग्रहालय (Albert Hall Museum)
- जल महाल ( jalmahal)
- जंतर मंतर ( Jantar Mantar, Jaipur)
- सिटी पॅलेस ( city palace )
आणखी वाचा : गोव्यातील 25+ पर्यटक स्थळे
Jaipur Tourist Places In Marathi |
हवा महाल (Hava Mahal, Jaipur)
- भगवान श्रीकृष्णाला समर्पित असणारी हि इमारत पाच मजल्यांची आहे आणि या इमारतीचे बांधकाम हे बिना पाया घालता बांधलेली आहे.
- हे हवा महाल हे अतिशय लोकप्रिय आणि भारतीय सर्वात प्रतिष्ठित वारसा असणाऱ्या स्थळांपैकी एक आहे.
- हा महल जयपूर शहरापासून ४ किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि इथे पोहचण्यासाठी १० मिनिटांचा वेळ लागतो.
- भारताच्या वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी पर्यटक येत असतात आणि या ठिकाणालाआवर्जून भेट देत असतात.
आमेर सागर ( Amer Sagar, Jaipur)
- आमेर सागर हे जयपूर रेल्वे स्टेशन पासून जवळ जवळ १३ किलोमीटर अंतरावर आहे आणि यासाठी ३० मिनिटांचा वेळ लागतो.
- या तलावाला भेट देण्यासाठी पावसाळ्यातील कालावधी उत्तम आहे कारण त्यावेळेस इथला आसपासचा परिसर अतिशय सुंदर होतो.
- जवळच्या आमेर किल्ला आणि जयगड किल्ला याना पाणीपुरवठा व्हावा म्हणून या तलावाची निर्मिती करण्यात आली होती.
- जर तुम्ही जयपूरला गेला असाल तर या ठिकाणाला नक्कीच भेट द्या. या ठिकाणचे वातावरण तुमच्या मनाला उत्साह आणि आराम देईल.
चुलगिरी जैन मंदिर (Chulgiri Jain Temple)
- जयपूर पासून हे ठिकाण २० किलोमीटर अंतरावर आहे आणि इथे येण्यासाठी ४० मिनिटांचा वेळ लागतो.
- दिल्ली – आग्रा या महामार्गावर हे ठिकाण आहे आणि या मंदिरात आवर्जून भेट द्या.
- या मंदिराला जवळ जवळ १००० पायऱ्या आहेत.
बडी बाजार ( Badi Choupar, Jaipur)
- जयपूर या शहरापासून ५ किलोमीटरच्या अंतरावर हा बाजार आहे आणि या ठिकाणी जाण्यासाठी २० मिनिटांचा वेळ लागतो.
- या ठिकाणी तुम्हाला जयपूर मधील सगळ्या खास वस्तू मिळतील जसे कि इथल्या पद्धतीच्या चपला , कपडे , खेळणी इ.
- पर्यटक या बाजाराला आवर्जून भेट देतात कारण या ठिकाणी तुम्हाला जयपूरच्या तिथल्या पारंपरिक वस्तू पाहायला मिळतात आणि खरेदी करायला मिळते.
- या बाजारातील सर्व गोष्टी तुम्हाला अतिशय उत्तम क्वालिटी आणि स्वस्तात मिळणार आहे.
आणखी वाचा : महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे
Jaipur Tourist Places In Marathi |
चांदलाई तलाव (Chandlai Lake)
- कोटा जयपूर महामार्गावर हा तलाव आहे. जयपूर पासून ३० किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे आणि इथे जाण्यासाठी जवळ जवळ एक तासांचा वेळ लागतो.
- या तलावाची खासियत अशी आहे कि या ठिकाणी विविध प्रकारचे तुम्हाला पाहायला मिळतात. या तलावाच्या पाण्यात खेळून ते पक्षी मनसोक्त आनंद घेत असतात.
- या तलावाच्या भोवतालचे निसर्गरम्य दृश्य आणि या पक्षांच्या आवाजाने या वातावरणात एक अद्भुत अनुभव तुमच्या मनाला होतो त्यामुळे या तलावाला नक्की भेट द्या.
गलता मंदिर (Galta Temple)
- दिल्ली – आग्रा महामार्गावर असणार हे मंदिर
- देवी काली चे एक रूप शीला माता चे हे मंदिर आहे. या मंदिराची खासियत अशी आहे कि हे मंदिर चहुबाजूनी पर्वतांनी वेढलेले आहे आणि या मंदिरात येण्यासाठी तुम्हाला एक कंचोटास डोंगर चहाडहून या ठिकाणी यावे लागते.
- आजूबाजूचा परिसर हा झाडाझुडपांच्या आणि डोंगडी असल्याकारणाने या ठिकाणी अनेक माकड तुम्हाला पाहायला मिळतील.
- या मंदिरासमोर एक जलकुंड आहे त्यात कायम पाणी भरलेले असते आणि त्याच मुले इथला परिसर हा अतिशय सुंदर दिसतो.
आमेर किल्ला ( Amer Fort)
- हा किल्ला राजा मानसिंग , राजा सवाई सिंग आणि राजा जयसिंग यांनी बनवला होता आणि या किल्ल्यामध्ये असलेला महल हा काचेचा बनवण्यात आलेला आहे त्यामुळे त्याची सुंदरता अधिक पटीने वाढते.
- हा किल्ला जयपूर या शहरापासून ११ किलोमीटर अंतरावर आहे.
- या किल्ल्यावर दररोज संध्याकाळच्या वेळेला Light And Sound Show होत असतो त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते.
- या किल्ल्याच्या जवळच मावोता नावाचा एक जलाशय आहे त्याच जलाशयातुन या ठिकाणी पाणीपुरवठा होत असतो. जलाशय आणि भव्य असा हा किल्ला त्याच्या सुंदरतेचा अधिक भर टाकत असतो.
- या सुंदरता शब्दात मंडन खूप कठीण आहे परंतु प्रत्यक्षपणे हा किल्ला अतिशय सुंदर आहे त्यामुळे या किल्ल्याला नक्कीच भेट द्या.
चोखी धानी (Chokhi Dhani)
- हे एक हॉटेल आहे परंतु या ठिकाणचा ambiance त्यांनी एकदम राजस्थानी गावासारखा बनवलेला आहे.
- या ठिकाणी तुम्हाला शाकाहारी , मांसाहारी आणि या ठिकाणच्या पारंपरिक थाळी जेवणासाठी मिळतील.
- या ठिकाणी मातीची घरे, प्राण्यांची सवारी, राजस्थानी खाद्यपदार्थ, राजस्थानी संगीत यांचा आनंद तुम्हाला या ठिकाणी घेता येतो.
- या ठिकाणी राजस्थानी लोकनृत्य, संगीत सादरीकरण, कठपुतली लोककथा, जादुई कार्यक्रम, ज्योतिषीय वाचन आणि विविध खेळ खेळायला तुम्हाला मिळतील.
- या ठिकाणची price ७५० ते १२०० मोठ्या लोकांसाठी आणि लहान मुलांसाठी ४५० ते ८०० रुपये एवढी आहे. या ची वेळ हि संध्याकाळी ५ ते ११ अशी आहे.
आणखी वाचा : कोकणात फिरायला जायचंय ? मग या 15 Beaches ला नक्की भेट द्या..
Jaipur Tourist Places In Marathi |
अल्बर्ट हॉल संग्रहालय ( Albert Hall Museum)
- जयपूरपासून ४ किलोमीटर अंतरावर हे संग्रहालय आहे आणि इथे जाण्यासाठी १५ मिनिटांचा वेळ लागतो.
- संपूर्ण संग्रहालय फिरण्यासाठी जवळ जवळ २ तासांचा वेळ लागतो.
- या संग्रहालयामध्ये पर्यटकांसाठी काही सुवीधा करण्यात आलेल्या आहेत जस कि लॉकर रूम , गार्डन , टॉयलेट , गाईडेड टूर , लायब्ररी आणि पार्किंग इ.
- हे संग्रहालय राजस्थानचा एक समृद्ध वारसा म्हटले तरी चालेल. महाराजा सवाई रामसिंग यांनी हे संग्रहालय १८८७ साली स्थापन केले होते आणि या संग्रहालयात शिल्पे , ऐतिहासिक वस्तू आणि विविध कलाकृती तसेच चित्रे तुम्हाला पाहायला मिळतील.
- त्याचबरोबर या संग्रहालयात कोटा , किशनगड , जयपूर ,उदयपूर आणि बुंदी यांसारख्या आसपासच्या शाळांमधील विविध कलाकृती हि प्रदर्शित केल्या जातात.
जल महाल ( jalmahal)
- हा महाल १६९९ साली बांधण्यात आला होता, हा जलमहाल मानसागर या तलावात आहे. हे महाल राजपुत घराण्याची आणि त्यांच्या शैलीतील वास्तुकलेचे एक प्रतीक आहे.
- हि एक ५ माजली इमारत आहे परंतु या इमारतीचे खालचे ४ माजले पाण्यात आहेत.
- राजा जयसिंग यांनी आपल्या राणीसोबत आपला महत्वाचा वेळ घालावा यासाठी हा पॅलेस बांधला होता त्याचबरोबर या पॅलेस मध्ये विविध शाही कार्यक्रम व्हायचे.
- आता सध्या या पॅलेस च्या आत मध्ये जाण्यास परवानगी नाही परंतु तलावाच्या काठी जाऊन आपण हा पॅलेस दुरूनच पाहू शकतो आणि याचे दृश्य अतिशय सुंदर आहे.
- जयपूर पासून हे जलमहाल १० किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि इथे जाण्यासाठी जवळ जवळ ३० मिनिटांचा वेळ लागतो.
जंतर मंतर ( Jantar Mantar, Jaipur)
- या ठिकाणाला भेट देणारे खगोलीय निरीक्षणांचे चमत्कार प्रत्यक्षपणे पाहू शकतात.
- खगोलीय वेधशाळा आणि विषुववृत्तीय सूर्यप्रकाश हि जंतर मंतर ची खरी ओळख म्हटले तरी चालेल. १८ व्या शतकात या इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. भारतात अशे अजून ५ जंतर मंतर च्या इमारती आहेत.
- या ठिकाणाला भेट देण्यासाठी २०० रुपयांचे तिकीट काढावे लागते.
- जयपूर पासून १५ किलोमीटरच्या अंतरावर हे जंतर मंतर आहे आणि इथे पोहचण्यासाठी साधारण ३० मिनिटांचा वेळ लागतो.
सिटी पॅलेस ( city palace )
- या पॅलेस मध्ये जाण्यासाठी २५० रुपयांचे तिकीट काढावे लागते.
- जयपूर पासून १५ किलोमीटर अंतरावर हे पॅलेस आहे इथे येण्यासाठी ३० मिनिटांचा वेळ लागतो.
- मुघल आणि राजपूत यांच्या संगमातून या पॅलेस ची स्थापना झाली असे म्हणायला हरकत नाही.
- सिटी पॅलेस मध्ये इमारती , मंडप , उद्याने आणि मंदिर यांचे संगम आहे. हे पॅलेस ४५० वर्षयांपूर्वी बांधले गेले आहे.
आणखी वाचा : महाबळेश्वर मधील 10 सुंदर पर्यटन स्थळे