Kolhapur Tourist Places In Marathi |
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला जर विचारलं कि कोल्हापूरची खासियत काय तर तो हेच बोलणार कि तिथला तांबडा आणि पंधरा रस्सा.. इथलं चविष्ट जेवण हि कोल्हापूरची ओळख असली तरी त्याच बरोबर इथं असणारे पर्यटन स्थळे हि खूप जास्त प्रसिद्ध आहे. याभागात दरवर्षी मुसळधार पाऊस होत असतो त्यामुळेइथले वातावरण हे अतिशय सुंदर असते आणि इथे फिरायला आलेला प्रत्येक पर्यटक याचा सुखद आनंद घेत असतो. चला तर मग या ब्लॉग Kolhapur Tourist Places In Marathi मध्ये पाहुयात इथली पर्यटन स्थळे ..
- महालक्ष्मी मंदिर (Mahalakshmi Temple)
- ज्योतिबा मंदिर (Jyotiba Temple)
- छत्रपती शाहू पॅलेस (Chhatrpati Shahu Palace)
- पन्हाळा किल्ला (Panhala Fort)
- रंकाळा तलाव (Rankala Lake)
- गगनबावडा (Gaganbavda)
- विशाळगड (Vishalgad Fort)
- राधानगरी धरण ( Radhanagari Dam)
- गारगोटी म्युझियम (Gargoti musium)
- बाळूमामा समाधी मंदिर (Balumama Temple)
- शालिनी पॅलेस कोल्हापूर (Shalini Palace, Kolhapur)
- भुरदगड (Bhuradgad)
- कोपेश्वर मंदिर (Kopeshwar Temple)
- सिद्धगिरी ग्राम जीवन संग्रहालय
- इर्विन कृषी संग्रहालय (Irwin Agricultural musium)
- दाजीपूर वन्यजीव अभयारण्य ( Dajipur Wildlife Sanctuary)
- बोटॅनिकल गार्डन (Botanical Garden)
- खासबाग मैदान (Khasbag Garden)
- ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क, कोल्हापूर (Dream World Water Park, Kolhapur)
आणखी वाचा : नागपूर मधील 20+ पर्यटन स्थळे
Kolhapur Tourist Places In Marathi |
महालक्ष्मी मंदिर (Mahalakshmi Temple)
- महालक्ष्मी मंदिर हे कोल्हापूर शहराच्या मधोमध आहे. या ठिकाणी भाविकांची कायमच गर्दी असते कारण अनेक भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि इतर ठिकाणाहूनही महालक्ष्मी देवीचे भाविक दरवर्षी या ठिकाणी येतअसतात .
- अतिशय सुंदर आणि प्राचीन असं हे मंदिर आहे आणि बदलत्या काळानुसार या मंदिराच्या आसपास नवनवीन सोयी करण्यात आलेल्या आहेत .
- तुम्हाला इथे जाऊन कुठल्याही प्रकारची पूजा करायची असेल तर या ठिकाणी अनेक ब्राम्हण पंडित तुम्हाला मिळतील जे तुम्हाला त्या पूजा करायला मदत करतील.
ज्योतिबा मंदिर (Jyotiba Temple)
- कोल्हापूर पासून जवळ जवळ १५ किलोमीटर अंतरावर हे मंदिर एका डोंगरावर आहे आणि या ठिकाणी जाण्यासाठी सुंदर असा घाट बनवण्यात आलेला आहे जो अतिशय हिरव्यागार परिसरातून जातो. या प्रवासातच अतिशय सुंदर वातावरणाचा अनुभव घेता येतो .
- रत्नासुराचा नाश करण्यासाठी ब्रह्म , विष्णू आणि महेश म्हणजेच शिव यांनी ज्योतिबा चा अवतार घेतला होता असे म्हटले जाते.
- या ठिकाणी अनेक पर्यटक दरवर्षी इथल्या वातावरणाचा आनंद आणि ज्योतिबा चे दर्शन घेण्यासाठी येत असतात .
छत्रपती शाहू पॅलेस (Chhatrpati Shahu Palace)
- कोल्हापूर पासून ३ किलोमीटर अंतरावर हे शाहू पॅलेस आहे.
- हा पॅलेस १९ व्या शतकातील असून याचे बांधकाम १८७७ मध्ये सुरु झाले आणि १८८४ मध्ये पूर्ण झाले होते.
- या पॅलेस चे सध्या संग्रहालयात रूपांतर करण्यात आलेले आहे आणि या पॅलेस च्या परिसरात एक तलाव आणि छोटस प्राणी संग्रहालय बनवण्यात आलेले आहे जिथेतुम्हाला मोर आणि पाण्यातबदक पाहायला मिळतील .
- या पॅलेस मध्ये शशू महाराजांचे सर्व शस्त्र आणि त्यांनी वापरलेल्या सर्व वस्तू त्याचबरोबर त्यांचे फोटो आहेत .
पन्हाळा किल्ला (Panhala Fort)
- पन्हाळा किल्ला हा एक डोंगरी किल्ला असून कोल्हापूर या शहर पासून अवघ्या २३ किलोमीटर अंतरावर आहे .
- या किल्ल्यालाभेट देण्यासाठो शक्यतो ऑक्टोबर ते फेब्रुवारी या महिन्यांमध्ये यावे कारण त्यावेळेस इथले वातावरण अतिशय सुंदर असते थंडी आणि नुकताच येऊन गेलेले मुसळधार पावूस यांमुळे निसर्गरम्य असे वातावरण निर्माण झालेले असते .
- या किल्याची स्थापना १२ व्या शतकात शहाजी महाराजांनी केली होती.
रंकाळा तलाव (Rankala Lake)
- कोल्हापूर शहरापासून ५ किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे. इथे राहणाऱ्या लोकांसाठी हे एक छोटं मारिन ड्राईव्ह (मुंबई) सारखं आहे.
- जवळ जवळ १०७ एकर्स मध्ये हा तलाव आहे आणि याची खोली १० फिट एवढी आहे.
- आता या ठिकाणी बोटिंग ची सुविधा सुद्धा करण्यात आली आहे आणि याच्या बाजूने अनेक खाण्या – पिण्याच्या गाड्याही लागतात त्यामुळे हा एक चौपाटी सारखा भाग तयार झालेला आहे.
गगनबावडा (Gaganbavda)
- कोल्हापूर पासून ५८ किलोमीटर अंतरावर हे स्थळ आहे आणि ठिकाणी तुम्हाला बरीचशी ठिकाण पाहायला मिळतील जिथे तुम्ही फिरू शकता जसे कि : गगनगड किल्ला , गगनबावडा घाट , गगनगिरी महाराज मठ मंदिर , पंत अमात्य बावडेकर वाडा , श्री रामलिंग मंदिर , नापणे धबधबा , राऊतवाडी धबधबा इ .
- गगनबावडा हे एक सुंदर असं हिल स्टेशन म्हणजेच थंड हवेच ठिकाण म्हणून ओळखलं जात. याची उंची समुद्रसपाटी पासून जवळपास ३००० फिट असावी .
विशाळगड (Vishalgad Fort)
- कोल्हापूर पासून ८० किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. या किल्ल्याचा इतिहास हा प्रत्येक मराठी माणसाला तोंडपाठ आहे . कारण हि एक अजरामर घटना या किल्ल्याच्या बाबतीत झाली होती .
- जेव्हा शिवाजी महाराज पन्हाळा गडाला असणारा वेढा तोडून या गडाकडे निघाले तेव्हा बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे बंधू फुलाजी प्रभू यांनी खिंड लढली आणि आपल्या महाराजांना सुखरूप गडाकडे जाण्यास सांगितले आणि जोपर्यंत ते गडापर्यंत पोहचत नाही तोपर्यंत खिंड अडवून एकही गनिमाला पुढे जाऊ दिले नाही. असा हा इतिहास आणि इथे गेल्यानंतर ते सगळं कस घडलं असेल याची कल्पना करणं हे खरंच अद्भुत अनुभव आहे.
आणखी वाचा : महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे
Kolhapur Tourist Places In Marathi |
राधानगरी धरण ( Radhanagari Dam)
- कोल्हापूर शहरापासून ५८ किलोमीटर अंतरावर हे धरण आहे . या धरणाचाउपयोग येथील जवळ पासच्या गावांना पाणीपुरवठाम्हणून होतोच त्याच बरोबर इथे जल सिंचन आणि जलविद्युत केंद्र हि आहे .
- भोगावती नदीवर हे धरण बांधलेले आहे . अनेक पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात .
बाळूमामा समाधी मंदिर (Balumama Temple)
- कोल्हापूर शहरापासून ४८ किलोमीटर अंतरावर अदमापूर हे ठिकाण आहे जिथे बाळूमामांचे समाधी स्थान असून हे अत्यंत धार्मिक स्थान आहे .
- “ज्ञान हे जीवन आणि अज्ञान हे मरण आहे ” असे बाळुमामाचे बोल त्यांच्या भक्तांच्या ओठी असतात. एक मेंढपाळ समाजात जन्माला आलेले बाळूमामा एक असे व्यक्ती होते आणि एक देवाचा अवतार होते. लाखो भाविक त्यांच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात .
शालिनी पॅलेस कोल्हापूर (Shalini Palace, Kolhapur)
- कोल्हापूर शहरापासून ५ किलोमीटर अंतरावर हे पॅलेस आहे .
- १९३० साली छत्रपती शहाजी द्वितीय आणि राणी प्रमिला राजे यांची मुलगी राजकुमारी शालिनी हिच्यासाठी या पॅलेस ची निर्मिती करण्यात आली होती.
- काहीकाळ हे पॅलेस एक ३ स्टार हॉटेल म्हणून चालवण्यात आले परंतु त्यात मोठ्या प्रमाणातनुकसानी झाल्याकरणं ते पुन्हा पालिकेने आपल्या ताब्यात घेतले. या पॅलेस मध्ये बऱ्याच चित्रपटांचे चित्रीकरण सुद्धा झाले होते.
भुरदगड (Bhuradgad)
- कोल्हापूर शहरापासून हा किल्ला ६३ किलोमीटर अंतरावर आहे. या किल्ल्याचे नाव हे तेथील तालुक्याच्या नावावरून ठेवण्यात आले होते.
- हा किल्ला शिलाहार राजा भोज दुसरा बांधला होता. सध्या या गडावर खाण्या पिण्याची सोया नसल्याकरणं तुम्हाला स्वतःच आपल्या सोबत पाणी घेऊन जावे लागते.
आणखी वाचा : मुंबई मधील 25+ सर्वोत्तम पर्यटन स्थळे
Kolhapur Tourist Places In Marathi |
कोपेश्वर मंदिर (Kopeshwar Temple)
- कोल्हापूर शहरापासून६० किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे आणि या मंदिरात शिव आणि विष्णू यांची सामंजस्यपणें शेजारी पूजा केली जाते.
- हे मंदिर कृष्णा नदीच्या काठी आहे .
सिद्धगिरी ग्राम जीवन संग्रहालय
- कोल्हापूर पासून १३ किलोमीटर अंतरावर हे संग्रहालय आहे.
- या संग्रहालयाला कन्हेरी मठ असेही म्हटले जाते. हा मठ जवळजवळ सात एकर्स मध्ये पसरलेला आहे या मठांमध्ये ग्रामीण जीवन कसे आहे याचे दृश्य बनवण्यात आलेले आहेत.
- या ठिकाणी तुम्हाला शेती करणारा शेतकरी जो बैलला जमलेला आहे, त्याचबरोबर प्रत्येक जाती जमातीचे लोक त्यांची घरे, त्यांचे व्यवसाय, त्याचबरोबर शाळा, मंदिरे असा संपूर्ण देखावा बनवण्यात आलेला आहे.
इर्विन कृषी संग्रहालय (Irwin Agricultural musium)
- हरित क्रांतीचा पाया घालण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी या ठिकाणी सर्वात मोठी कृषी प्रदर्शन भरवले होते.
- हे संग्रहालय कोल्हापूरच्या मुख्य शहरातच आहे.
दाजीपूर वन्यजीव अभयारण्य ( Dajipur Wildlife Sanctuary)
- या ठिकाणची जंगल सफारी करण्यासाठी 2375 रुपये प्रवेश शुल्क आकारला जातो.
- या अभयारण्यात विशेष करून रान गवा हे प्राणी मोठ्या संख्येने आढळतात त्याचबरोबर इतरही जंगली प्राणी या ठिकाणी आहेत.
- हे अभयारण्य 1985 साली बनवण्यात आले होते.
आणखी वाचा : महाबळेश्वर मधील 10 सुंदर पर्यटन स्थळे
Kolhapur Tourist Places In Marathi |
बोटॅनिकल गार्डन (Botanical Garden)
खासबाग मैदान (Khasbag Garden)
ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क, कोल्हापूर (Dream World Water Park, Kolhapur)
आणखी वाचा : कोकणात फिरायला जायचंय ? मग या 15 Beaches ला नक्की भेट द्या..