Jyotirlinga Information In Marathi | 12 ज्योतिर्लिंग बद्दल माहिती

Jyotirlinga Information In Marathi |

प्रत्येक महादेव भक्ताचे हे स्वप्न असते कि आयुष्यात एकदा तरी संपूर्ण १२ ज्योतिर्लिंगाचे दर्शन करावे . या ब्लॉग Jyotirlinga Information In Marathi मध्ये आपण पाहणार आहोत या १२ ज्योतिर्लिंग बद्दल माहिती घेणार आहे.

क्रमाने ज्योतिर्लिंगांची माहिती घेऊयात :

  • गुजरात – सोमनाथ
  • आंध्रप्रदेश – मल्लिकार्जुन
  • मध्यप्रदेश – महाकालेश्वर
  • मध्यप्रदेश – ओंकारेश्वर
  • महाराष्ट्र – वैजनाथ
  • महाराष्ट्र – भीमाशंकर
  • तामिळनाडू – रामेश्वर
  • महाराष्ट्र – नागनाथ हिंगोली
  • उत्तरप्रदेश – विश्वेश्वर
  • महाराष्ट्र – त्र्यंबकेश्वर
  • उत्तराखंड – केदारनाथ
  • महाराष्ट्र – घृष्णेश्वर

आणखी वाचा : अष्टविनायक यात्रा माहिती

Jyotirlinga Information In Marathi |

महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगाचे माहिती :

महाराष्ट्र – वैजनाथ

  • हे महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग आहे जे परळी या ठिकाणी आहे त्यामुळे याला परळी वैजनाथ असेही म्हणतात .
  • भारतातील झारखंड येथील देवघर येथेही वैजनाथ हे ज्योतिर्लिंग आहे .
  • मुंबई पासून ५४६ किलोमीटर आणि पुण्यापासून ३२५ किलोमीटर अंतरावर वैजनाथ हे ज्योतिर्लिंग आहे .
  • असे म्हटले जाते कि या ठिकाणी वैजनाथ शिवलिंगाला स्पर्श केला तर आपले सर्व आजार दूर होतात कारण या ठिकाणी शिवाचा अवतार हा एक वैद्य म्हणून झाला होता.
  • महादेवाला संपूर्ण प्रदक्षिणा घालू नये असे म्हणतात परंतु या ठिकाणी वैजनाथ ज्योतिर्लिंगाला संपूर्ण प्रदक्षिणा घालतात .
  • अनेक भाविक या ठिकाणी महादेवाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात .

महाराष्ट्र – भीमाशंकर

  • भीमाशंकर पुण्यापासून १२५ किलोमीटर अंतरावर आहे आणि या ठिकाणी सुट्टीच्या दिवसांमध्ये खूप जास्त गर्दी असते .
  • या ठिकाणी जाताना घाट चढून जावा लागतो कारण हे मंदिर सह्याद्री पर्वत रांगांच्या एका डोंगरामध्ये आहे त्यामुळे अनेक पर्यटक सुद्धा या ठिकाणाला भेट देत असतात आणि ट्रेक करत या मंदिरात दर्शनासाठी येतात .
  • या ठिकाणी तुम्हाला रांगेत उभा राहून दर्शन घ्यायचं नसेल आणि डायरेक्ट मंदिरात प्रवेश हवा असेल तर ५०० रुपये तिकीट काढून तुम्हाला VIP दर्शन मिळेल .
  • या मंदिरात शिवलिंगाला स्पर्श करून तुम्हाला दर्शन घेता येते . खूप छान असे हे मंदिर आहे आणि पर्यटनासाठी हि खूप छान असे वातावरण आणि स्थळे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल .

महाराष्ट्र – नागनाथ हिंगोली

  • पुण्यापासून ४२३ किलोमीटर अंतरावर हे ज्योतिर्लिंग हिंगोली या ठिकाणी आहे . हे एक प्राचीन ज्योतिर्लिंग असून या मंदिराची वास्तू अतिशय सुंदर आहे . हे एक पांडव कालीन मंदिर असल्याची आख्यायिका आहे असे म्हणतात कि भीमाने या शिवलिंगाचा शोध घेतला.
  • यादव घराण्याने या मंदिराचे बांधकाम १३ व्या शतकात केले होते . नंतर औरंगजेबाने या मंदिराला नष्ट केले होते परंतु कालांतराने अहिल्याबाई होळकर यांनी या या मंदिराचे पुनर्बांधकाम केले .

महाराष्ट्र – घृष्णेश्वर

  • छत्रपती संभाजी नगर मध्ये वेरूळ या ठिकाणी घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे . प्राचीन आणि सुंदर असं या मंदिराचं बांधकाम केलेले आहे .
  • अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम केले असून त्यावर अनेक देवी देवतांचे कोरीव शिल्पे बनवलेली आहे .
  • या मंदिरात जाण्यासाठी पुरुषांना आपले शर्ट काढून प्रवेश करावा लागतो. असं म्हटलं जात कि या ठिकाणी पॉसिटीव्ह एनर्जी त्यांच्या शरीरात जावी या साठी पुरुषांनी शर्ट ना घालता मंदिरात जावे आणि दर्शन घ्यावे.
  • या ठिकाणी शिवलिंगाला स्पर्श करून दर्शन घेण्यास परवानगी आहे . या मंदिरात आपण विविध प्रकारच्या पूजा करू शकतो जसे कि रुद्र अभिषेक वगैरे

महाराष्ट्र – त्र्यंबकेश्वर

  • हे ज्योतिर्लिंग नाशिक जिल्ह्यात असून पुण्यापासून २४४ किलोमीटर अंतरावर आहे . नाशिक मधून ३० किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला टॅक्सी किंवा बस मिळतील आणि तेथे पोहचण्यासाठी १ ते दीड तासांचा वेळ लागतो .
  • त्रिम्बकेश्वर या ठिकाणी एकाच मंदिरात तुम्हाला ब्रह्म , विष्णू आणि महेश यांचे दर्शन होते त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला शिवलिंगाला स्पर्श करून दर्शन घेता येत नाही आणि जर तुम्हाला स्पर्श करून दर्शन घ्यायचे असेल तर निर्वस्त्र होऊन फक्त धोतर घालून सकाळी ६ च्या वेळेस या ठिकाणी येऊन या ठिकाणी दर्शन घ्यावे लागते .
  • या ज्योतिर्लिंगाचे वैशिष्ट्य असे आहे कि या शिवलिंगाला तीन मुख पाहायला मिळतात ते त्रिदेव ब्रम्हा , विष्णू आणि महेश आहेत.

आणखी वाचा : कोल्हापूर मधील 15+ पर्यटन स्थळे

Jyotirlinga Information In Marathi |

मध्यप्रदेश मधील ज्योतिर्लिंग बद्दल माहिती :

मध्यप्रदेश – महाकालेश्वर

  • मध्यप्रदेश मधील उज्जैन या ठिकाणी महाकालेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे . उज्जैन पासून अवघ्या ३ किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर आहे .
  • अतिशय भव्य असं हे मंदिर आजच्या काळात बनवले गेले आहे . या मंदिरात असणार शिवलिंग हे दक्षिणाभिमुख आहे. या ठिकाणी शिवलिंगाला स्पर्श करण्यास परवानगी नाही . महाकालेश्वर ला मृत्यूचे स्वामी असे म्हटले जाते .

मध्यप्रदेश – ओंकारेश्वर

  • मध्यप्रदेश मधील खांडवा या ठिकाणी मामधाता शहरात जे ओंकारेश्वर म्हणूनही ओळखले जाते इथे बरवाहा पासून 16 किलोमीटर अंतरावर ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे.
  • ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग नर्मदा नदीवर आहे.
  • ओंकारेश्वर या ठिकाणी सहा तीर्थक्षेत्रे आणि 33 देवता आहेत. वेद आणि पुराण यामध्ये या मंदिराचा विशेष उल्लेख केलेला आहे.
  • या ठिकाणी भाविकांची नेहमीच गर्दी असते आणि या गर्दीचे व्यवस्थापन व्यवस्थित नसल्यामुळे आणि लोक फक्त दर्शनासाठी धडपड करत असल्यामुळे खूप जास्त गर्दी होते त्यामुळे दर्शन घेण्यास वेळ लागतो.
  • जर तुम्हाला व्हीआयपी दर्शन घ्यायचे असेल तर 300 रुपयांचे प्रवेश शुल्क तुम्हाला द्यावे लागते.
  • मंदिरात जास्त गर्दी होते त्यामुळे या ज्योतिर्लिंगाला स्पर्श करण्यास परवानगी नाही.

गुजरात मधील ज्योतिर्लिंग बद्दल माहिती :

गुजरात – सोमनाथ

  • बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे सोमनाथ मंदिर ज्याला देव पाटण असेही म्हणतात.
  • गजनीच्या मोहम्मद ने 1025 साली प्रथम सोमनाथ मंदिरावर हल्ला केला आणि मंदिर लुटले त्यावेळी त्याने या मंदिराचे मोठे नुकसान केले होते. परंतु त्यानंतरही या मंदिराचे बऱ्याच वेळा जिर्णोद्धाराचे काम करण्यात आले परंतु या मंदिरावर एकूण सतरा वेळा हल्ले होऊन प्रत्येक वेळेस या मंदिरास लुटण्याचे प्रसंग घडले.
  • शेवटी अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचे पुनर स्थापन केले. 1947 रोजी वल्लभभाई पटेल यांनी पुन्हा या मंदिराचे पुनर्बाणकाम करण्याचे आदेश दिले होते. पुनर् बांधकाम झाल्यानंतर राष्ट्रपती एस राधाकृष्णन यांनी या मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली होती.
  • सकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत आपण या ठिकाणी दर्शन घेऊ शकता या मंदिरात दररोज तीन वेळेस महादेवाची आरती केली जाते.

आंध्रप्रदेश मधील ज्योतिर्लिंग बद्दल माहिती :

आंध्रप्रदेश – मल्लिकार्जुन

  • कृष्णा नदीच्या काठावर असणारे मल्लिकार्जुन हे ज्योतिर्लिंग श्रीशैलम पर्वतावर आहे.
  • वर्षभरात कधीही तुम्ही या ठिकाणी दर्शनास येऊ शकता परंतु जर तुम्हाला येथे दर्शनाबरोबरच पर्यटनाचा आनंद घ्यायचा असेल तर नोव्हेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता.
  • श्रीशैलम येथील मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग हे मंदिर 18 महाशक्ती पिठांपैकी एक आहे.

आणखी वाचा : महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे

Jyotirlinga Information In Marathi |

उत्तरप्रदेश मधील ज्योतिर्लिंग बद्दल माहिती :

उत्तरप्रदेश – विश्वेश्वर

  • या मंदिराची ही अनेक वेळा पुनर बांधकाम करण्यात आली होती कारण या मंदिरावर सर्वप्रथम कुतुब उद्दिन ऐबक याने हल्ला केला आणि हे मंदिर पाडून या ठिकाणी मज्जित उभारली होती त्यानंतर तोडरमल या एका स्वाभिमानी राजाने या मंदिराचे पुनः निर्माण केले
  • परंतु यानंतरही औरंगजेबाने या मंदिराला पुन्हा नष्ट करण्याचे प्रयत्न केले त्यानंतर अहिल्याबाई होळकर यांनी अठराव्या शतकात विश्वनाथाचे मंदिर पुन्हा बांधले.
  • साधारण दोन ते तीन तासांचा कालावधी दर्शनाच लागतो. जर तुम्हाला ज्योतिर्लिंगाला स्पर्श करून आशीर्वाद घ्यायचा असेल तर मंदिर प्रशासन भाविकांकडून 500 ते हजार रुपये शुल्क आकारून त्यांना व्हीआयपी दर्शन देतात.
  • या मंदिराचा गर्भ भाग आणि मंदिराचा घुमट हा सोन्याने बनवण्यात आल्या आहे जवळजवळ 60 किलो सोन्याचा या ठिकाणी वापर करण्यात आला होता.

तामिळनाडू मधील ज्योतिर्लिंग बद्दल माहिती :

तामिळनाडू – रामेश्वर

  • अतिशय सुंदर असे हे रामेश्वर मंदिर भारताच्या तामिळनाडू राज्यात असून रामनाथपुरम या एका लहान शहरात आहे.
  • प्रभू श्रीराम यांनी रामेश्वरम याच ठिकाणाहून आपले सैन्य लंकेमध्ये नेण्यासाठी रामसेतूची रचना केली होती त्यामुळे या ठिकाणाला एक विशेष असे महत्त्व आहे.
  • दर्शना बरोबरच जर तुम्ही या ठिकाणी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येणार असाल तर ऑक्टोबर ते फेब्रुवारी या दरम्यान रामेश्वरला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ आहे कारण त्यावेळेस या ठिकाणचे वातावरण थंड आणि आनंददायी असते.

आणखी वाचा : कोकणात फिरायला जायचंय ? मग या 15 Beaches ला नक्की भेट द्या..

Jyotirlinga Information In Marathi |

उत्तराखंड मधील ज्योतिर्लिंग बद्दल माहिती :

उत्तराखंड – केदारनाथ

  • भारतात असे कोणीही नसेल ज्याला केदारनाथ धाम हे ज्योतिर्लिंग माहिती नसेल जवळपास 3584 मीटर उंच आणि बर्फानी वेढलेले हिमालय पर्वतांच्या शिखरामध्ये आणि मंदाकिनी नदीच्या काठावर स्थित हे मंदिर अतिशय सुंदर दिसते.
  • हे मंदिर जवळ जवळ 1000 होऊन अधिक जुने असल्याचे मानले जाते
  • केदारनाथ धम पर्यंत जाण्यासाठी 16 किलोमीटर अंतराचा ट्रेक करत जावा लागतो जो गौरीकुंड या ठिकाणाहून सुरू होतो या ट्रेक साठी सहा ते आठ तासांचा वेळ लागतो आणि हा ट्रेक तीव्र स्वरूपाचा अवघड आहे.
  • अनेक भाविक दरवर्षी या ठिकाणी केदारनाथ दर्शनासाठी येत असतात.

आणखी वाचा : केरळ मधील 25 बीच… नक्की भेट द्या ..