Ooty Tourist Places In Marathi |
उटी, उटी हे असं निसर्गरम्य ठिकाण आहे जे तामिळनाडू या राज्यात आहे हिल स्टेशनची राणी म्हणून या ठिकाणाला ओळखले जाते कारण याबाबत आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर आणि हिरवळीने भरलेला आहे. त्याचबरोबर इथे असणाऱ्या सुंदर बागा तलाव पर्वत आणि जंगल यांनी हा परिसर भरलेला आहे.
या ठिकाणाबद्दल अधिक माहिती आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत. उटी या ठिकाणाला भेट देण्यासाठी कमीत कमी दोन ते तीन दिवसांची सुट्टी घेऊन या म्हणजे इथल्या सर्व स्थळांना आपल्याला भेट देता येईल आणि पर्यटनाचा आनंद घेता येईल. या ब्लॉगमध्ये ओटी आणि इथे असणाऱ्या इतर सर्व स्थळांबद्दल या ब्लॉगमध्ये आपण माहिती घेऊयात..
- पायकरा तलाव (Pykara Lake)
- पायकरा धबधबा (Pykara Falls)
- डब्बाबेत्ता पीक (DabbaBetta Peak)
- उटी तलाव (Ooty Lake)
- गव्हर्मेंट रोज गार्डन (Government Rose Garden)
- अवलांची तलाव (Avlanche Lake)
- Tea म्युझियम (Tea Muesum)
- एम्राल्ड तलाव (Emrald Lake)
- मधुमलाई नॅशनल पार्क (Madhumalai National Park)
- थंडर वर्ल्ड (Thunder World)
- एल्का हिल मुरुगन मंदिर (Elka Hill Murugan Temple)
- बोट हाऊस, उटी (Boat House,Ooty)
- गव्हर्मट बॉटनिकल गार्डन (Government Botanical Garden)
आणखी वाचा : महाबळेश्वर मधील 10 सुंदर पर्यटन स्थळे
Ooty Tourist Places In Marathi |
पायकरा तलाव (Pykara Lake)
- उटी पासून 22 किलोमीटर अंतरावर हा पायकरा तलाव आहे. या तलावाला भेट देण्यासाठी दहा रुपये प्रवेश शुल्क द्यावा लागतो.
- हा लेख पर्यटकांसाठी सकाळी 8.30 ते संध्याकाळी 5.30 मध्ये खुला असतो.
- या तलावामध्ये आपल्याला बोटिंग सुद्धा करता येते त्यासाठीही निश्चित वेळ आहे सकाळी दहा ते संध्याकाळी साडेपाच पर्यंत आपण बोटिंग करू शकतो.
- पावसाळा आणि हिवाळा या दिवसांमध्ये या तलावाचे सौंदर्यात अधिक भर पडते.
पायकरा धबधबा (Pykara Falls)
- पायकरा तलावावरच हा धबधबा सुद्धा आहे. पयकरा तलावाच्या आधी तुम्हाला या धबधब्यालां भेट देता येते.
- मेन रोड पासून अर्धा किलोमीटर अंतरावर आत चालत जाऊन या धबधब्यापर्यंत पोहोचता येते. या धबधब्याचा आनंद पर्यटक घेतात त्याचबरोबर या ठिकाणचा आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य आहे.
डब्बाबेत्ता पीक (DabbaBetta Peak)
- उटीपासून नऊ किलोमीटर अंतरावर हे शिखर आहे. उटी मधील सर्वात उंच आहे. याची उंची 2637 मी आहे आणि लोकप्रिय असे हे ठिकाण आहे सर्व बाजूने घनदाट झाडी म्हणजे जंगल आणि उंचावर हे शिखर आहे.
- या ठिकाणाहून खाली पाहिले असता संपूर्ण परिसराचा view तुम्हाला पाहायला मिळतो.
- ऑक्टोबर ते जून या महिन्यांमध्ये या ठिकाणाला भेट देण्यासाठी योग्य वेळ आहे.
उटी तलाव (Ooty Lake)
- उटीपासून 1.3 किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे. हा तलाव नैसर्गिक नसून कृत्रिम रित्या बनवण्यात आला होता परंतु हा तलाव ओटीतील सौंदर्यात अधिक भर घालतो.
- जॉन सुलिव्हण यांनी या तलाव तयार केला होता.
- या तलावावर बोटिंग ची व्यवस्था केलेली आहे.
- या तलावाला भेट देण्यासाठी सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा हा टाइम निश्चित केलेला आहे. या तलावाला भेट देण्यासाठी दहा रुपये आणि जर कॅमेरा घेऊन जाणार असाल तर वीस रुपये असे शुल्क आकारले जाते.
- या तलावावर असणारे अम्युजमेंट पार्क आणि मिनी ट्रेन यांमुळे हा तलाव प्रसिद्ध आहे.
गव्हर्मेंट रोज गार्डन (Government Rose Garden)
- गुलाबाची ही बाग ओटी पासून 3.5 किलोमीटर अंतरावर आहे.
- या ठिकाणी फ्लावर शो आयोजित केला जातो. शक्यतो मे महिन्यामध्ये या ठिकाणी फ्लावर शो होतो. या ठिकाणाला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ मार्च ते जून असा आहे कारण त्या वेळेत या ठिकाणची फुले फुललेली असतात.
- या गार्डनमध्ये जवळपास 20,000 हून अधिक गुलाबाची फुले आणि जवळ जवळ 2200 वेगवेगळ्या जाती आहेत.
- ही बाग सकाळी सात ते संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत चालू असते.
आणखी वाचा : कोकणात फिरायला जायचंय ? मग या 15 Beaches ला नक्की भेट द्या..
Ooty Tourist Places In Marathi |
अवलांची तलाव (Avlanche Lake)
- ओटी पासून अवलांची तलाव 22 किलोमीटर अंतरावर आहे.
- या तलावाला हिमरस्खलन तलाव असेही म्हणतात. हा तलाव तामिळनाडूमधील निलगिरी जिल्ह्यात आहे.
- या तलावाच्या भोवताली विविध प्रकारची फुले आहेत जसे की ऑर्किड , मॅग्नोलिया आणि रोडोडेंड्रोन इ.
- या तलावाला भेट येणारे पर्यटक या ठिकाणी फिशिंग करण्याचा आनंद घेऊ शकतात त्यासाठी लागणारे करणे या ठिकाणी उपलब्ध आहेत.
Tea म्युझियम (Tea Muesum)
- उटी या शहरापासून अंदाजे चार किलोमीटर अंतरावर हे चहा संग्रहालय आहे. हे एक फक्त संग्रहालय नसून या ठिकाणी चहाची फॅक्टरी आहे पर्यटकांसाठी या ठिकाणी या फॅक्टरीला संग्रहालयाचा स्वरूप देण्यात आलं आहे.
- चहाप्रेमी असो किंवा नसो परंतु प्रत्येक पर्यटक या ठिकाणाला भेट देतो.
- निलगिरी ही चहाची फॅक्टरी चहा उत्पादन आणि निर्यात यांसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणाहून इतर ठिकाणी चहा उत्पादन पोहोचवण्यासाठी या ठिकाणी रेल्वे लाईन बांधण्यात आल्या आहेत.
- उटी मधील वालपराई हे ठिकाण चहाच्या विस्तीर्ण मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे.
एम्राल्ड तलाव (Emrald Lake)
- ओटी या शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर एम्राल्ड हा तलाव आहे.
- या ठिकाणाला भेट देण्यासाठी तुम्हाला स्वतःची वाहन वापरावे लागते कारण या ठिकाणी जाण्यासाठी शासनाची कोणतीही बस तुम्हाला मिळणार नाही.
- या ठिकाणी असणारा sunset आणि sunrise पॉईंट प्रसिद्ध आहेत.
- या तलावाच्या आजूबाजूला चहा उत्पादने आणि चहा बागा आहेत.
मुदु मलाई नॅशनल पार्क (Mudumalai National Park)
- उटी या शहरापासून 40 किलोमीटर अंतरावर हा राष्ट्रीय अभयारण्य आहे.
- भारतातील व्याघ्र प्रकल्पांपैकी एक असणारे हे मुदू मलाई राष्ट्रीय उद्यान आहे. हे अभयारण्य तामिळनाडू राज्यातील कोइंबतूर शहरात आहे.
- या अभयारण्यात हत्ती, गौर , बिबट्या आणि बंगाल वाघ या प्रकारचे आणि इतरही अनेक वन्यप्राणी तुम्हाला पाहायला मिळतील.
- या ठिकाणी तुम्हाला हत्ती सफारी करण्याचा आनंद घेता येतो.
आणखी वाचा : गोव्यातील 25+ पर्यटक स्थळे
Ooty Tourist Places In Marathi |
थंडर वर्ल्ड (Thunder World)
- कुठे या शहरापासून 2.5 किलोमीटर अंतरावर हे पार्क आहे.
- या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पार्क तुम्हाला पाहायला मिळतील जसे की अम्युजमेंट पार्क, वॉटर पार्क, डियर पार्क , जुरासिक जंगल पार्क इ.
- अम्युजमेंट पार्कला भेट द्यायचे असेल तर तुम्हाला 450 rs प्रवेश शुल्क द्यावा लागतो.
- वॉटर पार्क ला भेट द्यायचे असेल तर 800 rs प्रवेश शुल्क द्यावा लागतो.
- डियर पार्क आणि जुरासिक जंगल पार्क यांसाठी तुम्हाला तीनशे रुपये प्रवेश शुल्क द्यावा लागतो.
एल्का हिल मुरुगन मंदिर (Elka Hill Murugan Temple)
- उटी या शहरापासून 4.5 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. रोज गार्डन पासून हे मंदिर एक किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर हेल्थ हिल या टेकडीवर आहे.
- या ठिकाणी 40 फूट उंच मुरुगन या देवाची मूर्ती आहे.
- या मंदिरावर गेल्यावर उटी शहर आणि या शहरातील आसपासचा सुंदर प्रदेश पाहायला मिळतो. या मंदिराच्या चहुबाजूने जंगल आहे त्यामुळे इथला परिसर भयावह असला तरी या मंदिराची सुंदरता अधिक आहे.
- या मंदिरात फक्त मुरुगन देवतेची मूर्ती नसून भगवान गणेश, शिव, देवी शक्ती , नवग्रह यांची ही मुळे आहेत.
- जानेवारी महिन्यात भगवान मरुगण यांचा एक धार्मिक सण थायपुसम हा जल्लोषात साजरा केला जातो.
आणखी वाचा : रायगड जिल्ह्यातील 25 किल्ल्यांची माहिती
Ooty Tourist Places In Marathi |
बोट हाऊस, उटी (Boat House,Ooty)
- उटी या तलावावर बोटिंगची व्यवस्था केलेली आहे यालाच बोटिंग हाऊस असेही म्हणतात.
- या ठिकाणी अनेक पर्यटक दरवर्षी भेट देत असतात आणि या बोटिंगचा आनंद घेतात.
गव्हर्मट बॉटनिकल गार्डन (Government Botanical Garden)
- उटी या शहरापासून 2.5 किलोमीटर अंतरावर हे गार्डन आहे. हे संपूर्ण गार्डन करण्यासाठी जवळपास दोन तासांचा वेळ लागतो.
- हे गार्डन 1848 तयार करण्यात आले होते हे गार्डन 54 एकर मध्ये पसरलेले आहे.
आणखी वाचा : महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे