Matheran Tourist Places In Marathi |
पावसाळ्यातील सुट्ट्यांमध्ये फिरायला जायचं म्हटलं की असे ठिकाणी आठवतात ज्या ठिकाणी सुंदर पर्यटन आणि डोळ्यांना आनंद देणारा निसर्गरम्य असा देखावा आणि थंडगार वातावरण हे आपल्या डोळ्यासमोर येते. अशाच काही स्थळांपैकी माथेरान हे रायगड जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातून विविध ठिकाणाहून अनेक पर्यटक या ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात.
जवळ जवळ 2600 फूट उंच एका पठारावर हे माथेरान बसलेले आहे. चहुबाजूने घनदाट झाडी आणि निसर्गाचा आस्वाद घेत हे माथेरान आपल्याला आपल्या सुट्टीचा आनंद देतो. माथेरान हे असं एक ठिकाण आहे जिथे आपण वर्षभरात कधीही जाऊन भेट देऊ शकतो. प्रत्येक ऋतूमध्ये या ठिकाणचा एक वेगळा आनंद घेता येतो. प्रत्येक ऋतूमध्ये या ठिकाणी वेगवेगळे वातावरण अनुभवायला मिळते. आज आपण या ब्लॉग Matheran Tourist Places In Marathi मध्ये माथेरान या ठिकाणावरील पर्यटन स्थळांची माहिती घेणार आहोत.
- Louisa Point (लॉईस पॉईंट)
- Charlotte Lake ( चार्लोट तलाव)
- Alexzandar Point (अलेक्सान्डर पॉईंट)
- Panorama Point ( पॅनोरमा पॉईंट)
- One Tree Hill Point ( वन ट्री हिल पॉईंट)
- Porcupine Point (Sunset Point ) (पोर्कपिन पॉईंट)
- Echo Point (इको पॉईंट)
- Prabal Fort ( प्रबळ किल्ला)
- Rambagh Point (रामबाग पॉईंट)
- Irshalgad Fort (ईशरालगड किल्ला)
- Lord Point (लॉर्ड पॉईंट )
- King George Point ( किंग जॉर्ग पॉईंट)
- Khandala Point ( खंडाळा पॉईंट)
- Belvedere Point (बेलसदरे पॉईंट)
- Little Chowk Point (लिट्ल चॉक पॉईंट)
- Ambarnath Temple (अंबरनाथ मंदिर)
- Pisarnath Mahadev Temple (पिसरनाथ महादेव मंदिर)
- Hart Point (हार्ट पॉईंट)
- Mount Barry (माऊंट बॅरी)
- Holy Cross Church (होली क्रॉस चर्च)
- Malang Point (मलंग पॉईंट)
- Paymasters Point (पेमास्तर पॉईंट)
- Neral Matheran Toy Train (नेरल माथेरान टॉय ट्रेन)
Matheran Tourist Places In Marathi |
Louisa Point (लॉईस पॉईंट)
- माथेरान पासून हा पॉईंट दोन किलोमीटर अंतरावर आहे. आणि माथेरान रेल्वे स्टेशन पासून हा पॉईंट 2.5 किलोमीटर अंतरावर आहे.
- या ठिकाणावर उभे राहिले असता दोन व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतात ज्यामध्ये एक स्वच्छ निळे आकाश आणि दुसरे म्हणजे खाली असणारी दरी.
Charlotte Lake ( चार्लोट तलाव)
- माथेरान पासून 2.5 किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे.
- या तलावा जवळ तुम्हाला धबधबा हे पाहायला मिळेल. तलाव आणि धबधबा यांचे दृश्य अतिशय निसर्गरम्य आहे.
- या धबधब्याला पिसरनाथ धबधबा असेही म्हणतात.
Alexzandar Point (अलेक्सान्डर पॉईंट)
- हा पॉईंट sunset पॉईंट म्हणून ओळखला जातो. ठिकाणाहून अजूनही काही पॉईंट्स आपल्याला पाहायला मिळतात तसेच रामबाग, गारपट, चौक पॉईंट आणि पळसदरी तलाव हे यांचेही दृश्य या ठिकाणाहून पाहायला मिळतात.
- माथेरान पासून हा पॉईंट 1.4 किलोमीटर अंतरावर आहे.
Panorama Point ( पॅनोरमा पॉईंट)
- माथेरान पासून हा पॉईंट 7.5 किलोमीटर अंतरावर आहे.
- या पॉईंटपासून दक्षिण घाट पाहता येतो आणि त्याचबरोबर या ठिकाणाहून निसर्गाचा आनंद घेता येतो.
One Tree Hill Point ( वन ट्री हिल पॉईंट)
- हा पॉईंट समुद्रसपाटीपासून सुमारे 2625 फूट उंचीवर आहे. हजारो पर्यटक येथे ट्रेकिंग साठी घेत असतात.
- माथेरान पासून हा पॉईंट 2.7 किलोमीटर अंतरावर आहे.
आणखी वाचा : अष्टविनायक यात्रा माहिती
Matheran Tourist Places In Marathi |
Porcupine Point (Sunset Point ) (पोर्कपिन पॉईंट)
- माथेरान पासून दोन किलोमीटर अंतरावर हा पॉईंट आहे. हजारो पर्यटक या ठिकाणी सनसेट पाहण्यासाठी येत असतात.
Echo Point (इको पॉईंट)
- माथेरान पासून हा पॉईंट दोन किलोमीटर अंतरावर आहे.
- माथेरान मधील हा एक प्रसिद्ध पॉईंट आहे.
- इको पॉइंट म्हणजे काय हे तर सर्वांनाच माहित आहे आपण एकदा जर आवाज दिला तर तोच आवाज आपल्याला पुन्हा काही वेळेस ऐकायला येतो यालाच इको असे म्हणतात.
Prabal Fort ( प्रबळ किल्ला)
- माथेरान आणि पनवेल यामध्ये हा प्रबळगड आहे याची उंची जवळ जवळ 2300 फूट आहे
- हा किल्ला पर्यटकांची पसंती तर आहेच त्याचबरोबर नवशिक्या आणि ट्रेकिंगची आवड असणाऱ्या पर्यटकांसाठी पहिली पसंती आहे.
- या गडाचा ट्रेक हा जवळ जवळपास चार तासांचा आहे.
Rambagh Point (रामबाग पॉईंट)
- हा एक असा पॉईंट आहे ज्या ठिकाणाहून तुम्हाला कर्जत आणि खंडाळा यांचा निसर्ग रम्य नजारा पाहायला मिळतो त्याचबरोबर याहून खाली पाहिले असता खोलवर असणाऱ्या दर्या तुम्हाला पाहायला मिळतील.
- माथेरान पासून हा पॉईंट दोन किलोमीटर अंतरावर आहे.
Irshalgad Fort (इर्शालगड किल्ला)
- या गडाचा ट्रेक हा मध्यम स्वरूपाचा आहे. हा गड प्रबळगडाची बहीण म्हणून ओळखला जातो.
- या गडावर पूर्वीचे काहीही उरलेले नाही तरीही हा गड ट्रेकिंग साठी प्रसिद्ध आहे.
- माथेरान पासून हा गड 40 किलोमीटर अंतरावर आहे
Lord Point (लॉर्ड पॉईंट )
- माथेरान पासून अवघ्या दोन मिनिटांच्या अंतरावर हा पॉईंट आहे.
आणखी वाचा : महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे
Matheran Tourist Places In Marathi |
King George Point ( किंग जॉर्ग पॉईंट)
- माथेरान मधील हा पॉईंट हॉर्स रायडिंग साठी ओळखला जातो.
- माथेरान पासून दोन किलोमीटर अंतरावर हा पॉईंट आहे आणि चार लोट तलावापासून अवघ्या दहा मिनिटाच्या अंतरावर हा पॉईंट आहे.
Khandala Point ( खंडाळा पॉईंट)
- निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचा असेल तर या ठिकाणाला नक्की भेट द्या कारण या ठिकाणाहून आपल्याला निसर्गाचा आनंद घेता येतो आणि माथेरान पासून अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर हा पॉईंट आहे
- एक सुंदर संध्याकाळ घालवण्याचा आनंद तुम्हाला या ठिकाणी येते.
Belvedere Point (बेलसदरे पॉईंट)
- खंडाळा पॉईंट पासून हा पॉइंट अवघ्या दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे.
Little Chowk Point (लिट्ल चॉक पॉईंट)
- माथेरान पासून हा पॉईंट पाच किलोमीटर अंतरावर आहे.
Ambarnath Temple (अंबरनाथ मंदिर)
- महादेवाचे हे मंदिर अकराव्या शतकातला असावा असं म्हणण्यात येते.
- याच मंदिराला अमरेश्वर मंदिर असे म्हणतात.
Pisarnath Mahadev Temple (पिसरनाथ महादेव मंदिर)
- माथेरान पासून दोन किलोमीटर अंतरावर हे महादेवाचे मंदिर आहे.
Hart Point (हार्ट पॉईंट)
- माथेरान पासून 2.5 किलोमीटर अंतरावर हा पॉईंट आहे.
- माथेरान मधील हा पॉईंट जंगल सफारी, हिल स्टेशन, ट्रेकिंग, माऊंटेनिंग, हायकिंग, पिकनिक यांसाठी प्रसिद्ध आहे.
आणखी वाचा : कोकणात फिरायला जायचंय ? मग या 15 Beaches ला नक्की भेट द्या..
Matheran Tourist Places In Marathi |
Mount Barry (माऊंट बॅरी)
- माथेरान पासून हा पॉईंट पाच किलोमीटर अंतरावर आहे.
- या ठिकाणाहून तुम्हाला दक्षिण घाटाचा व्हिव पाहायला मिळेल.
Holy Cross Church (होली क्रॉस चर्च)
- 1860 मध्ये या चर्चे काम झाले आहे.
- हे चर्च माथेरान मध्येच आहे.
Malang Point (मलंग पॉईंट)
- माथेरान पासून 2.1 किलोमीटर अंतरावर हा पॉईंट आहे.
Paymasters Point (पेमास्तर पॉईंट)
- हा एक पिकनिक स्पॉट असून हा एक पार्क आहे.
- माथेरान पासून एक किलोमीटर अंतरावर हा पार्क आहे.
Neral Matheran Toy Train (नेरल माथेरान टॉय ट्रेन)
- नेरळ या ठिकाणाहून माथेरान पर्यंत फक्त पर्यटकांसाठी खास ट्रेन बनवण्यात आली आहे ही एक प्रकारची ट्रेन आहे परंतु निसर्गाचा आनंद घेत या ट्रेनमध्ये बसून तुम्ही नेरळ पासून माथेरान पर्यंत येऊ शकता.
- तुम्हाला जर या ट्रेनचा प्रवास करायचा असेल तर अर्धा तास आधी बुकिंग करावे लागते.
- माथेरान ते नेरळ हा जवळ जवळ दोन तासाचा प्रवास आपल्याला या ट्रेनमध्ये करता येतो.
- लहान मुलांबरोबरच सर्वच पर्यटकांना या ट्रेनचा प्रवास अतिशय आवडतो.
- आसपासचा जंगल निसर्गाच्या आनंद घेत हा ट्रेनचा प्रवास अतिशय सुखकारक असतो त्याचबरोबर ट्रेनचा प्रवास करताना आपल्याला बरेचसे व्ह्यू पॉईंट पाहायला मिळतात.
पूर्वी या ट्रेन साठी वाफेचे इंजिन वापरले जात होते परंतु नंतर ते बदलून डिझेलची इंजिन वापरण्यात आले.
माथेरान हे या ट्रेनमुळे अधिक जास्त प्रसिद्ध झाले आणि लाखो पर्यटकांची पसंती बनले. आज माथेरान म्हटलं की या ट्रेनची सवारी करायची हे ठरलेलं असतं. अगदी कमी शुल्कामध्ये आपण या ट्रेनचा आनंद घेऊ शकतो. मोठ्या माणसांसाठी 25 तर लहान मुलांकरता दहा रुपये तिकीट या ट्रेन प्रवासा साठी घेतली जाते.
जर माथेरानला भेट देण्याचा तुम्ही प्लान करत असाल तर हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच मदत करेल अशी अपेक्षा..
आणखी वाचा : पावसाळ्यातील पुण्यातील 10 unique निसर्गरम्य स्थळे