Summer Care Tips In Marathi |
उन्हाळा म्हटलं की सर्व शाळांना सुट्टी असल्या कारणाने मुलांमध्ये सुट्टीची मजा घेण्यासाठी एक वेगळीच धडपड सुरू असते. मुलांना सतत बाहेर खेळण्यासाठी जायचे असते परंतु आज-काल वाढत्या उष्णतेमुळे अनेकांना विविध प्रकारचे त्रास होत असतात. त्यामुळे त्यांची विशेष करून काळजी घ्यावी लागते. उष्णतेमुळे लहान मुलांना घामोळ्या तसेच डीहायड्रेशन चा त्रास होऊन ते आजारी पडण्याची शक्यता जास्त असते.
लहान मुलेच नव्हे तर मोठ्या व्यक्तींनाही या उष्णतेचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत असल्याचे आजकाल प्रमाण वाढले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात आपल्या शरीराची तसेच आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यावी यासाठी वेगवेगळ्या टिप्स या ब्लॉग Summer Care Tips In Marathi मध्ये दिलेल्या आहेत. उन्हाळ्यामध्ये स्वतःची काळजी घेण्यासाठी हा ब्लॉग नक्की वाचा आणि यामध्ये दिलेल्या टिप्स आपल्या दैनंदिन जीवनात वापर करा त्यामुळे तुम्ही एक निरोगी आयुष्य आणि उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करू शकता.
आणखी वाचा : आयुष्यात व्यक्तिमत्व चांगले बनवायचे असेल तर या 6 गोष्टींवर नियंत्रण ठेवा
आणखी वाचा : आपला खरा मित्र कोण ? कसे ओळखाल ? 10 qualities..
Summer Care Tips In Marathi |
- उन्हाळ्यामध्ये आपल्या त्वचेची काळजी घ्या त्यासाठी योग्य स्किन केअर प्रॉडक्ट वापरा.
- उन्हाळ्यामध्ये भरपूर पाणी प्या.
- उन्हाळ्यामध्ये आरामदायक, हलके आणि फिक्या रंगाचे कपडे घाला.
- उन्हाळ्यामध्ये बाजारात मिळणारे कोल्ड्रिंक्स चा वापर कमी प्रमाणात करा.
- उन्हाळ्यामध्ये हेवी मेकअप टाळा.
- उष्माघातापासून वाचण्यासाठी शक्यतो दिवसा कामाव्यतिरिक्त बाहेर पडणे टाळा.
- उन्हाळ्यामध्ये बाहेरचे तेलकट आणि फास्ट फूड खाण टाळा.
- उन्हाळ्यामध्ये आपल्या दररोजच्या आहारात पालेभाज्या आणि शरीराला ऊर्जा देणाऱ्या पदार्थांचा वापर करा.
- आपल्या आसपासच्य परिसर थंड राहील याची काळजी घ्या.
- लहान मुलांना उन्हामध्ये बाहेर खेळणं सोडू नका. त्या ऐवजी संध्याकाळच्या वेळेस खेळायला सोडा.
- स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी घरगुती उपायांचा वापर करा.
आणखी वाचा : जीवनातील 10 वास्तव गोष्टी
Summer Care Tips In Marathi |
उन्हाळ्यामध्ये आपल्या त्वचेची काळजी घ्या त्यासाठी योग्य स्किन केअर प्रॉडक्ट वापरा.
- उन्हाळ्यामध्ये आपले त्वचेची काळजी घेण्यासाठी आपली त्वचा आणि त्वचेतील ओलावा टिकून ठेवायला पाहिजे. त्यासाठी उन्हामध्ये बाहेर पडताना योग्य सन स्क्रीनचा वापर करायला हवा.
- उन्हाळ्यामध्ये शक्यतो घामामुळे शरीरावर पुरळ उठते आणि त्याला खाजही येते त्यामुळे अंघोळ करताना अँटीबॅक्टरियल साबन चा वापर करावा.
- त्वचेची खूप जास्त प्रमाणात आग होत असेल तर त्यासाठी वेगवेगळे लेप आपण वापरू शकतो जसे की कडीलिंबाचा लेप आणि चंदन किंवा मुलतानी मातीचा लेप आपण आपल्या चेहऱ्यावर किंवा इतर शरीरावर लावू शकतो ज्याने आपल्या त्वचेला थंडावा मिळतो आणि त्वचा मुलायम राहते. त्याच बरोबर आपण ताकदही यांसारख्या थंड पदार्थांचाही वापर करू शकतो ज्याने त्याच्या ला थंड आणि शांत वाटून त्वचेला कुठलीही पुरळ येणार नाही.
उन्हाळ्यामध्ये भरपूर पाणी प्या.
- उन्हाळ्यात करणे मुळे शरीराला खूप जास्त घाम येत असतो त्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होत जाते. दिवसभर काम आल्यामुळे आपल्या शरीरातले पाणी कमी होत जाते आणि आपल्याला डिहायड्रेशन होऊन आपण आजारी पडण्याची शक्यता असते.
- शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यायला हवे. पाणी कमी पिल्यामुळे आपले शरीर आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूने खराब व्हायला सुरुवात होते. पाणी कमी पिल्याने आपली त्वचा रूक्ष दिसायला लागते त्याचबरोबर शरीराला खाज यायला लागते.
- उन्हाळा म्हटलं की सर्वच लोक थंड पाणी प्यायला लागतात परंतु हे अत्यंत चुकीचे आहे फ्रिजचे पाणी तर एक प्रकारचे विषच आहे, थंड पाणी प्यायचेच असेल तर मातीच्या मटक्यांमधील पाणी प्यायला हवे.
- बर्फाचे पाणी चुकूनही पिऊ नये त्यामुळे आपले शरीराची पाचन क्रिया बिघडते.
उन्हाळ्यामध्ये आरामदायक, हलके आणि फिक्या रंगाचे कपडे घाला.
- उन्हाळ्यात नेहमी हलक्या आणि फिक्या रंगाच्या कपड्यांचा वापर करायला हवा ज्याने आपल्या शरीराला थंडपणा मिळतो.
- हलक्या आणि फिक्या रंगाचा कपडांमुळे शरीराला घाम येत नाही आणि आपल्यालाही आरामदाय वाटते.
आणखी वाचा : आपल्या या 7 वाईट सवयीमुळे येते अपयश
Summer Care Tips In Marathi |
उन्हाळ्यामध्ये बाजारात मिळणारे कोल्ड्रिंक्स चा वापर कमी प्रमाणात करा.
- बाजारात येणाऱ्या कोल्ड्रिंक्स मुळे थोड्या वेळसाठी आपल्याला गर्मी पासून बचाव होतो परंतु हे कोल्ड्रिंक्स शरीरासाठी अत्यंत घातक असतात.
- बाजारात मिळणाऱ्या कोल्ड्रिंक्स मध्ये मोठ्या प्रमाणावर साखरेचा वापर केलेला असतो त्याचबरोबर यात वापरले जाणारे केमिकल्स शरीरासाठी चांगले नाही.
- आपले शरीर हे आतून गरम असते त्यात अतिशय थंड बर्फाचे कोल्ड्रिंक्स जर आपण घेत असेल तर आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम खराब होते आणि आपल्याला उलट्या जुलाब यांसारखे आजार होऊ शकतात.
उन्हाळ्यामध्ये हेवी मेकअप टाळा.
- उन्हाळ्यामध्ये आपला त्वचेला गर्मीमुळे खूप जास्त घाम येत असतो अशा मध्ये जर आपण खूप जास्त हेवी मेकअप केला तर त्वचेतून बाहेर निघणारा घाम मेकअप मुळे बाहेर पडणार नाही आणि त्वचेला श्वास घेण्यास अडचण निर्माण होते त्यामुळे त्वचा खराब होण्याची शक्यता असते त्याचबरोबर मेकअप मध्ये वापरली जाणारी केमिकल्स आणि उन्हाळ्यामध्ये असणारी गर्मी यामुळे स्किन डिसीज होण्याची शक्यता असते.
- आपण जर मेकअप करणार असाल तर नैसर्गिक पद्धतीने बनवलेल्या उत्पादनांचा वापर करावा ज्याने आपल्या चेहऱ्यावर काही केमिकल रिएक्शन होणार नाही आणि आपली त्वचा चांगली राहील.
उष्माघातापासून वाचण्यासाठी शक्यतो दिवसा कामाव्यतिरिक्त बाहेर पडणे टाळा.
- सकाळी 11 नंतर कोणाचा जर जास्त वाढायला लागतो त्यामुळे अशा वेळेस घराबाहेर पडणे घातक ठरते आपली त्वचा तसेच आपल्या शरीराचे हायड्रेशन यांवर या उन्हाचा परिणाम होतो.
- त्याचबरोबर उष्माघातामुळे मळमळ, उलट्या होणे त्याचबरोबर तीव्र डोकेदुखी आणि खूप जास्त घाम येणे, चक्कर येणे अशी लक्षणे दिसून येतात. उष्माघात हा शक्यतो लहान मुले, वृद्ध व्यक्ती, विविध आजार असणारे लोक त्याचबरोबर सहनशक्ती कमी असणाऱ्या व्यक्तींना हा त्रास जास्त होतो.
- उष्माघातापासून वाचण्यासाठी खूप जास्त उन्हामध्ये घराबाहेर न पडणे हे उत्तम आहे.
आणखी वाचा : ध्यान म्हणजे काय ? आणि ध्यानाचे फायदे..
Summer Care Tips In Marathi |
उन्हाळ्यामध्ये बाहेरचे तेलकट आणि फास्ट फूड खाण टाळा.
- उन्हाळ्यामध्ये गर्मीमुळे आपली पाचन क्रिया ही संथ झालेली असते आणि त्यात आपण जर तेलकट आणि बाहेरचे खाद्यपदार्थ जर वारंवार खात असेल तर ते पचायला अतिशय जड असते त्यामुळे आपली पाचन क्रिया बिघडते आणि आपल्याला उलट्या आणि जुलाब असे आजार होण्याची शक्यता असते.
उन्हाळ्यामध्ये आपल्या दररोजच्या आहारात पालेभाज्या आणि शरीराला ऊर्जा देणाऱ्या पदार्थांचा वापर करा.
- उन्हाळ्यात पालेभाज्यांचा जास्तीत जास्त वापर करावा कारण पालेभाज्यांमध्ये अनेक प्रकारचे विटामिन्स तसेच फायबर असतात त्यामुळे आपल्याला रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यास मदत मिळते.
- आपल्या जेवणामध्ये विविध सॅलड्सचा वापर अवश्य करावा ज्याने आपल्या शरीर हायड्रेटेड राहील.
आपल्या आसपासच्य परिसर थंड राहील याची काळजी घ्या.
- खूप जास्त गरम परिसर किंवा उन्हाच्या झळ्या डायरेक्ट आपल्या शरीरावर येत असेल तर अशा ठिकाणी जास्त काळ राहू नये त्यामुळे आपल्याला उष्माघात होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण ज्या ठिकाणी राहतो ती जागा थंड राहील याची काळजी घ्यावी.
आणखी वाचा : पालकत्व आणि मुलांशी पालकांचे नाते कसे असावे ??
Summer Care Tips In Marathi |
लहान मुलांना उन्हामध्ये बाहेर खेळणं सोडू नका. त्या ऐवजी संध्याकाळच्या वेळेस खेळायला सोडा.
- उन्हाळ्यामध्ये लहान मुलांना घराबाहेर खेळण्यात सोडू नये, लहान मुलांना उष्माघाताचा अतिशय जास्त प्रमाणात त्रास होत असतो.
- या दिवसांमध्ये शाळेंना सुट्टी असल्याकारणाने मुले बाहेर खेळण्यास जास्त उत्सुक असतात परंतु हे त्यांच्या आरोग्यासाठी खूप घातक असते.
स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी घरगुती उपायांचा वापर करा.
- डीहायड्रेशन पासून वाचण्यासाठी काही घरगुती पदार्थांचा वापर करून आपण स्वतः आपले डीहायड्रेशन कमी करू शकतो जसे की ताक.
- ताक हे पृथ्वीवरील अमृत आहे असे मानले जाते कारण हे आरोग्यास अतिशय चांगले असते.
- त्याचबरोबर नारळ पाणी, लिंबू पाणी, केळी आणि दही यांचाही वापर आपण करू शकतो.