Monsoon Care Tips In Marathi |
लहान मुलांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत सर्वांनाच आवडणारे ऋतू म्हणजे पावसाळा. पावसाळा हा ऋतू आपल्याबरोबर आनंद आणि पर्यटनाचे सौंदर्य घेऊन येतो. पावसाळ्यामध्ये सर्व परिसर हा जणू काही गर्द हिरव्यागार शाल पांघरल्यासारखा दिसतो. पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्यासाठी जाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. काही विशेष ठिकाणे असे असतात की जी फक्त पावसाळ्यामध्ये अनुभवायला मिळतात. पर्यटनाचा आनंद तसेच पावसाळ्यात असणारे मजा अनुभवायला सगळ्यांनाच आवडते परंतु त्याचबरोबर स्वतःची आणि आपल्याबरोबर असणाऱ्या सर्वांची आरोग्याची काळजी घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे.
पावसाळ्यामध्ये स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबद्दलची माहिती आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत. पावसाळ्यामध्ये आपली त्वचा आपला आहार आणि त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये होणारे वेगवेगळे आजार यांपासून वाचण्यासाठी काही खास टिप्स या ब्लॉग Monsoon Care Tips In Marathi मध्ये मला पाहायला मिळतील.
आणखी वाचा : पालकत्व आणि मुलांशी पालकांचे नाते कसे असावे ??
Monsoon Care Tips In Marathi |
- पावसाळ्यामध्ये बाहेरील जंगफूड खाणे टाळावे.
- आपले हात नेहमी स्वच्छ ठेवावे.
- पिण्याचे पाणी हे स्वच्छ आहे याची खात्री करूनच पाणी प्यावे.
- शक्यतो होईल तेवढे पावसात भिजणे टाळावे.
- आपल्या आसपास कुठेही पाणी साचू देऊ नये.
- या दिवसांमध्ये स्वतःची स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे.
- कुठलेही फळ किंवा भाज्या काळजीपूर्वक धुवून मगच वापरात घ्याव्यात.
- नियमित व्यायाम करावा.
- झोपेच्या वेळा पाळा.
- निरोगी आरोग्य हवे असेल तर ताजे आणि पौष्टिक असे जेवण करावे.
- घरामध्ये स्वच्छता ठेवावी, दिवसभरात आपण ज्या ठिकाणी जास्तीत जास्त हात लावतो अशी जागा नेहमी स्वच्छ ठेवा.
- आजारी पडल्यास काही घरगुती उपायांचा वापर करावा.
आणखी वाचा : ध्यान म्हणजे काय ? आणि ध्यानाचे फायदे..
Monsoon Care Tips In Marathi |
पावसाळ्यामध्ये बाहेरील जंगफूड खाणे टाळावे.
- पावसाळ्यामध्ये शक्यतो बाहेरील खाण्याची इच्छा जास्त होते. गरमागरम भजी तसेच वडापाव खाण्याची आणि चहा पिण्याची इच्छा जास्त होते परंतु हे खाद्यपदार्थ आपल्या घरीच बनवून खाल्ले तर ते आरोग्यासाठी चांगले आहे बाहेरील पदार्थ खाऊन आपण आजारांना निमंत्रण देत असतो.
- जेव्हा आपण बाहेरील जंक फूड खातो त्यावेळेस त्या खाण्याच्या आसपासचा परिसर हा जर अस्वच्छ असेल आणि त्या खाण्यामध्ये ही अस्वच्छता असेल तर आपण आजारी पडण्याची शक्यता असते.
आपले हात नेहमी स्वच्छ ठेवावे.
- पावसाळ्यामध्ये सूर्यप्रकाश अतिशय कमी प्रमाणात असल्याकारणाने विविध प्रकारचे जंतू आपल्या सभोवताली असतात त्यामुळे आपले हात नेहमी स्वच्छ असावे याची काळजी घ्यायला हवी.
- पावसाळ्यामध्ये बॅक्टेरिया विविध मार्गाने आपल्या शरीरात जाण्याची शक्यता असते त्यामुळे शक्य होईल तेवढे आपले हात आणि आपल्या आसपासचा भाग स्वच्छ असणे गरजेचे आहे.
- आपल्या हातांमुळे आपला तोंडाने त्याच बरोबर डोळ्याने विविध बॅक्टेरिया आपल्या शरीरात जाण्याची शक्यता असते.
पिण्याचे पाणी हे स्वच्छ आहे याची खात्री करूनच पाणी प्यावे.
- पावसाळ्यामध्ये नेहमी पिण्याचे पाणी हे खराब असण्याची शक्यता असते कारण पावसाळ्यामध्ये बराच वेळा चांगल्या पाण्यामध्ये खराब पाणी मिसळले जाते किंवा आपल्या घरी येणारे पाणी त्यासाठी वापरले जाणाऱ्या पाईपलाईन फुटण्याची किंवा त्यामध्ये इतर पाणी मिसळण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण जे पाणी पितो ते स्वच्छ असण्याची खात्री करूनच पाणी प्यावे.
- शक्यतो पाणी हे उकळलेलेच असावे त्यामुळे त्यातील बॅक्टेरिया निघून जातात आणि शुद्ध पाणी पिण्यास राहते.
- पावसाळ्यामध्ये पाण्यातूनच अनेक आजार होण्याची शक्यता असते त्यामुळे खात्रीशीर प्युरिफाइड पाणीच पिण्यास योग्य असते.
आणखी वाचा : आपल्या या 7 वाईट सवयीमुळे येते अपयश
Monsoon Care Tips In Marathi |
शक्यतो होईल तेवढे पावसात भिजणे टाळावे.
- कामाशिवाय पावसात घराबाहेर पडणे टाळावे. जास्त वेळा भिजल्याकारणाने आपल्याला थंडी वाजून आजारी पडण्याची शक्यता असते.
- पावसाचा आनंद घ्यायचाच असेल तर घरी असतानाच पावसाचा आनंद घ्यावा परंतु नेहमी नेहमी पावसामध्ये भिजल्याने आपण आजारी करू शकतो.
- पाऊस पडत असताना आपल्या लहान मुलांची विशेष करून काळजी घ्यायला हवी, त्यांना पावसामध्ये भिजू देऊ नये.
आपल्या आसपास कुठेही पाणी साचू देऊ नये.
- आपल्या आसपास कुठे पाण्याचा संचय होतोय का याची खबरदारी घ्यावी कारण छोट्या छोट्या पाण्याच्या साठ्यांमध्ये डासांची उत्पत्ती होत असते त्यामुळे आपल्या जवळपास कुठेही पाणी साचू देऊ नये.
- डासांमुळे डेंग्यू सारखे अनेक आजार होण्याची शक्यता पावसाळ्यामध्ये वाढते त्यामुळे आपल्या जवळपास डास होऊ नये याची काळजी सर्वांनी घ्यायला हवी.
- डेंग्यू, चिकनगुनिया आणि मलेरिया हे पावसाळ्यामध्ये होणारे जीवघणे आजार आहेत. आपल्या लहान मुलांना किंवा वयस्कर व्यक्तींना हे आजार होऊ नयेत म्हणून विशेष काळजी घ्यावी.
या दिवसांमध्ये स्वतःची स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे.
- पावसाळ्यामध्ये सूर्यप्रकाश नसल्याकारणाने वाटणारे जीव जंतू हे जीव घेणे असतात त्यामुळे आपल्या परिसराची त्याचबरोबर आपल्या स्वतःच्या शरीराची काळजी घेणे आणि स्वच्छता ठेवणे हे पावसाळ्यामध्ये आवश्यक असते.
- आपले हात आणि त्याचबरोबर आपले संपूर्ण शरीर हे स्वच्छ असणे गरजेचे आहे त्यामुळेच आपण एक निरोगी आयुष्य जगू शकतो.
आणखी वाचा : जीवनातील 10 वास्तव गोष्टी
Monsoon Care Tips In Marathi |
कुठलेही फळ किंवा भाज्या काळजीपूर्वक धुवून मगच वापरात घ्याव्यात.
- बाजारातून आणलेली फळे आणि भाज्या या नेहमी स्वच्छ धुऊन मगच वापरात घ्याव्यात. कारण बाजारामध्ये त्या फ्रेश राहण्यासाठी त्यावर पाणी शिंपडले जाते हे पाणी नेहमीच चांगलेच असेल याची खात्री नसते त्याचबरोबर बाजारात या फळ आणि भाज्यांवर अनेक जीवजंतू असण्याची शक्यता असते त्यामुळे त्यात होऊनच वापराव्यात.
- बाजारामध्ये फळभाज्यांवर अनेक लोकांचे खराब हात लागलेले असतात त्यामुळे त्यावर अनेक बॅक्टेरिया ज्या जीव घेण्या असू शकतात.
नियमित व्यायाम करावा.
- शरीर निरोगी ठेवायचे असेल तर नियमित व्यायाम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
- आपले शरीर हे रोगप्रतिकारक असावे असे वाटत असेल तर नेहमी आठवड्यातून किमान तीन ते चार वेळेस व्यायाम करायलाच हवा ज्याने आपले प्रतिकारक्षमता वाढते आणि आपण आजारी पडत नाही.
- पावसाळ्यामध्ये आपल्याला अनेक आजार होण्याची शक्यता असते त्यामुळे आपली प्रतिकारक्षमता चांगली असेल तर आपण अशा रोगांना बळी पडत नाहीत.
झोपेच्या वेळा पाळा.
- संपूर्ण झोप ही प्रत्येक मनुष्यप्राण्यासाठी आवश्यक असते.
- आपला रोजच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये आपले शरीर निरोगी राहावे यासाठी झोप घेणे अत्यंत गरजेचे आहे.
- आपले शरीर त्याचबरोबर आपले विचार क्षमता ही व्यवस्थित राहण्यासाठी किमान दिवसातून आठ तासाची झोप घेणे महत्त्वाचे आहे.
आणखी वाचा : आयुष्यात व्यक्तिमत्व चांगले बनवायचे असेल तर या 6 गोष्टींवर नियंत्रण ठेवा
Monsoon Care Tips In Marathi |
निरोगी आरोग्य हवे असेल तर ताजे आणि पौष्टिक असे जेवण करावे.
- जेवण हे नेहमी ताजे आणि पौष्टिक असावे. आपल्या दररोजच्या आहारामध्ये प्रोटीन्स असणारे पौष्टिक पदार्थ यांचा समावेश करावा.
- आपण जेवढे ताजे आणि प्रोटीन्स युक्त असे पदार्थ खाऊ तेवढी आपली प्रतिकारक्षमता वाढते आणि आपले शरीर हे ताजेतवाने राहते.
- आपला आहार हा आपल्या शरीराला घडवतो आणि बिघडवतो ही. जेवढा चांगला आहार असेल तेवढे आपले शरीर मजबूत राहते.
घरामध्ये स्वच्छता ठेवावी, दिवसभरात आपण ज्या ठिकाणी जास्तीत जास्त हात लावतो अशी जागा नेहमी स्वच्छ ठेवा.
- आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ राहील याची काळजी घ्या.
- आपल्या आसपासचा परिसर जेवढा स्वच्छराहील तेवढं आपण आजारी किंवा रोगांना बळी पडण्यापासून वाचू शकतो . पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्वत्र पाण्यामुळे ओलावा निर्माण हतो आणि त्यात विविध Bactaria जन्म घेतात आणि आपल्या आजारांचे कारण ठरतात .
आजारी पडल्यास काही घरगुती उपायांचा वापर करावा.
- आजारी पडल्यास लगेचच अँटिबायोटिक न घेता घरगुती उपायांनी बरे होण्याचा प्रयत्न करा.
- आज-काल अनेक घरगुती उपाय सोशल मीडिया वरून आपल्याला मिळू शकतात जे आपल्या उपयोगी पडतात त्यांचा वापर करून आपण अनेक आजारांपासून वाचू शकतो.
आणखी वाचा : आपला खरा मित्र कोण ? कसे ओळखाल ? 10 qualities..