Positive Thinking In Marathi | अशी करा नकारात्मकतेवर मात..

Positive Thinking In Marathi |

दैनंदिन जीवनात आपल्या आजूबाजूला आपल्याला अनेक लोक मिळतात. सगळेच आपल्याला चांगले वाटत किंवा बोलतात असे नाही. रोज कोणी ना कोणी आपल्याला भेटताच असत आणि जर तुम्ही नोकरी करत असाल तर वेळोवेळी तुम्हला नवनवीन लोकांना भेटावं लागत किंवा त्यांचा सामना हा होतोच. मग तो ट्रॅव्हलींग दरम्यान असो किंवा कामाच्या ठिकाणी असो. नवीन व्यक्ती, नवी व्यक्तिमत्व, नवी विचार धारणा हे गणित ठरलेलंच असत.

मग अश्या वेळेस आपल्या आस पासची लोक एकत्र खुप जास्त Positive असतात नाहीतर Negative असतात. आता हि positivity आणि Negativity आपल्या आजूबाजूला आहे कि नाही हे कस ओळखणार?? पण त्या आधी आपण हे जाणून घेऊयात कि Positive लोकं आपल्या आजूबाजूला असल्यावर आपल्यावर त्यांच्या संगतीचा काय परिणाम होतो? आणि Negative लोकं आपल्या आजूबाजूला असल्यावर आपल्यावर काय परिणाम होतो ??

थोडं लक्ष देऊन जाणून घ्या कि आपल्या आजूबाजूला कोणत्या प्रकारची लोकं आहेत. जर Positivity असणारे लोकं असतील तर ते नेहमी तुम्हाला प्रोत्साहित करणार , त्यांच्यात नेहमी नवीन काहीतरी करण्याची ऊर्जा तुम्हाला जाणवणार आणि या उलट Negativity असणारे लोक तुम्हाला नेहमी Demotivate करत राहणार आणि तुम्हाला कधीही नवीन काही करण्यास प्रोत्साहन देणार नाही.

  • नकारात्मक विचार करणारे लोक आणि सकारात्मक विचार करणारे लोक ते पाहुयात …
Negative People Positive People
कायम चिडचिड करणारे आणि सतत अडचणींबद्दल बोलणारे Active आणि हसतमुख
तुम्ही केलेल्या कुठल्याही कार्याबद्दल कधीही चांगलं न बोलणारे किंवा तुमच्या नेहमी चुका काढणारे तुमच्या अडचणींवर तुम्हाला योग्य तो सल्ला देणारे किंवा अडचण सोडवण्यात मदत करणारे
अशी लोक जे तुमच्या जवळ असले कि तुम्हाला नकोसे वाटतात ज्यांच्या बरोबर राहिल्यावर तुम्हाला देखील Positive energy feel होते
कुठल्याही परिस्थितीत फक्त नकारात्मक गोष्टी बोलणार जी लोक तुमचं बोलणं ऐकून घेतात आणि आपल्याला तुम्हाला पुढे काम करण्यास प्रोत्साहन देणार
जी लोक नेहमी दुसऱ्यांचे negative उदाहरण देऊन तुम्हाला demotivate करत राहणार चांगल्या लोकांचे चांगले उदाहरण देऊन सतत तुम्हाला motivate करत राहणार

Positive Thinking In Marathi |

  • नकारात्मकता घालवण्याचे उपाय :

प्रश्न हा नाहीये कि लोक नकारात्मक का होतात आणि अश्या नकारात्मक लोकांपासून आपण दूर कस राहावं !! एक लक्षात घ्या . आपण ज्या भावनात्मक परिस्थितीत राहत असतोआपल्या सभोवतालीसुद्धा तशीच साधर्म्य परिस्थिती असणारे लोक आपल्या भोवती जमा होतात किंबहुना आपल्या सोबतच्या लोकांच्या भावनिक परिस्थितीचा आपल्यावर बरा- वाईट परिणाम हा कळत न कळत होत असतो. ज्या लोकांची समान भावनिक परिस्थिती असणारे लोक एकमेकांच्या समोर येत असतात आणि जर एखादा नकारात्मक विचाराचा व्यक्ती आपल्यासोबत असेल तर आपला mindset नकारात्मक होऊ शकतो.

त्यामुळे अश्या नकारात्मक भावनांपासून किंवा लोकांपासून आपण कस दूर राहायचं त्याचे काही सोपे उपाय आपण आता पाहणार आहोत :

  • आपला दिनक्रम सुरळीत करण्यासाठी सर्वप्रथम आपण झोपेच्या वेळा आणि उठण्याच्या वेळा अतिशय कटाक्षाने पाळल्या पाहिजे.
  • जर तुम्ही भावनाविवश किंवा भावनात्मक होऊन खूप जास्त थकून गेला असाल थोडीशी विश्रांती घ्या. स्वतःला वेळ द्या.
  • स्वतःचे मुल्ल्यांकन करत राहा.
  • स्वतःवर प्रेम करा. आत्मविश्वास ठेवायला शिका . स्वतःबद्दलच प्रेम तुम्हाला न्यूनगंड दूर कर्णयंटसाठी फार उपयोगी पडेल.
  • आपण दिवसातून थोडा वेळ असं काही ऐकलं पाहिजे ज्यामुळे आपल्यातील सकारात्मकता वाढेल.
  • स्वतःला भावनेच्या आहारी जाऊ देऊ नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि विश्वास पूर्ण निर्णय घ्या.
  • तुमच्या आत्मसन्मानाला कोणी ठेच पोहचवू शकणार नाही याची काळजी घ्या.

Positive Thinking In Marathi |

जर जवळचाच एखादा नकारात्मक विचाराचा असेल तर :

  • बऱ्याचदा असं होत कि नकारात्मकता हि आपल्याच जवळच्या लोकांमध्येच असते ते मग आपलेच आई, वडील, भाऊ, बहीण, मुलगा, नवरा, बायको, मित्र,शेजारी अगदी कोणीही असू शकत. त्यामुळे अश्या लोकांपासून आपण दूर राहू शकत नाही. घरातल्याच लोकांपासून आपण दूर कसे राहणार. अश्यावेळी परिस्थिती पासून लांब पळून चालणार नाही तर परिस्थिती स्वीकारून जबाबदारी घेऊन आपण ती परिस्तिथी सुधारण्याचा निर्णायक प्रयत्न केला पाहिजे .
  • अश्या परिस्थितीत अडकलेल्या व्यक्तीला आपण विश्वासात घेऊन सांगितलं पाहिजे कि त्यांच्यातील नकारात्मकतेचा प्रभाव सर्वांवर अपायकारक परिणाम करत असतो. तसेच अश्या प्रकारच्या नकारात्मक भावनेमुळे कस त्याच आरोग्य खराब होतंय याची त्यांना जाणीव करून द्या. तसेच या परिस्थितीतून बाहेर पाडण्यासाठी त्यांना सर्वतोपरी मदत करा.
Positive Thinking In Marathi |
  • मनात वाईट विचार का येतात ??

इंग्रजीमध्ये एक म्हण आहे GIGO म्हणजे त्याचा अर्थ असा कि Garbage In Garbage Out त्याचा अर्थ असा कि जर आपण आतंकचरा टाकला कि कचराच बाहेर येणार. त्याचप्रमाणे आपलं आयुष्य देखील GIGO या संकल्पनेशीच समरस आहे. जर तुमच्या मनाच्या हार्डडिस्क मध्ये नकारात्मकता असेल, तर बाहेर पण फक्त तुम्ही नाकारात्मकताच देणार.

याउलट पण जर तुमच्या मनाच्या हार्डडिस्क मध्ये जर सकारात्मकता असेल तर तुमच्या हातून सगळ्या सकारात्मक गोष्टी घडू लागतील. त्यामुळं आपण नेहमी अत्यंत सावधपूर्वक विचार करून ठरवायला हवं कि आपण आपल्या मनाच्या हार्डडिस्क मध्ये नेमकं साठवून ठेवतोय.

एक उदाहरणात असं पाहता येईल कि रामायणात प्रभू श्रीरामांवर कैकयीच फार जास्त प्रेम होत असं म्हणतात कि कौशल्येपेक्षाही कैकयीचे रामांवर खूप प्रेम होत, पण ती जेव्हा मंथरेच्या संगतीत आली तेव्हा तिच्यामध्ये नकारात्मकता निर्माण झाली आणि तिऊच्या मनात वाईट विचार यायला सुरुवात झाली आणि तिने राजा दशरथास सांगून तिने प्रभू रामांना १० वर्ष्यासाठी वनवासास पाठवले आणि आपला मुलगा भरत यास सिंहासनावर बसवले. तर मग तिच्यामध्ये हि नकारात्मकता आली कुठून तर मंथरेच्या संगतीतून.

याचप्रमाणे आपणही विचार केला पाहिजे कि आपल्या आयुष्यात मंथरा कुठून कुठून प्रवेश करते तर ती येऊ शकते आपल्या वाचनातून, मित्राकडून , चित्रपटातून, नातेवाईकांकडून, किंवा इंटरनेट वरून या गोष्टी आपल्यात नकारात्मक विचार टाकण्याचे काम करत असतात. आणि अश्या नाकारात्मकतेतूनच आपल्या मनामध्ये वाईट विचार यायला सुरुवात होते त्यामुळे या सर्वांच्या मुळावर वार करणे फार गरजेचे आहे नाहीतर मग या नकारात्मक विचारातून बाहेर पडणं फार कठीण होऊन जाईल. त्यासाठीच आपल्या मनाची हार्डडिस्क म्हणजेच आपले अंतर्मन साफ ठेवणे फार महत्वाचे आहे.

Positive Thinking In Marathi |
  • पण जर एखाद्याचे मन नाकारात्मकतेने किंवा वाईट विचारांनी भरलेले असेल तर तयार अश्या परिस्थिती मध्ये काय केले पाहिजे ???

जेव्हा आपण नेहमी वाईट विचारांबद्दलच विचार करतो आणि त्याला खतपाणी घालतो. त्यावेळी हे विचार तुमच्या अंतर्मनामध्ये घर करून राहतात. अश्यावेळी फार गरजेचं आहे कि आपण आपल्या मनातील गोष्टी एखाद्या समजदार व्यक्तीस सांगीतल्या पाहिजे. जेणे करून तो आपल्याला यातून बाहेर पडण्याचा काहीतरी उपाय सुचवेल आणि त्यातून आपल्याला बाहेर पडण्यास मदत कारेन. त्यामुळे होईल काय कि जे नकारात्मक विचार जे मनाच्या पृष्ठभागावर आहेत ते हळूहळू भविष्यकाळामध्ये मनामध्ये घर करणार होते ते बाहेर येतील त्यामुळे आपले मन नेहमी कुणाकडे मोकळे केले पाहिजे जेणे करून ते शुद्ध होईल.

ज्या प्रमाणे महाभारतामध्ये अर्जुन गोंधळलेल्या मनःस्थितीमध्ये होता त्याने भगवान श्रीकृष्णा समोर आपले मन मोकळे केले आणि भगवान श्रीकृष्णानाने योग्य तो उपदेश करून भागवत्गीतेचे ज्ञान दिले आणि त्याची नकारात्मकता दूर केली. त्यामुळे मनातील नकारात्मक विचार एखाद्या समजदार व्यक्तीबरोबर व्यक्त केल्याने आपला त्रास कमी होतो. कारण ते विचार काही प्रमाणात का होईना बाहेर पडलेले असतात. त्यामुळे मनाच्या हार्डडिस्क मध्ये आपण जे विचार साठवतो ते चांगले असले पाहिजे. त्यासाठी आपण काय केले पाहिजे….

  • सतत चांगली पुस्तके वाचली पाहिजे .
  • चांगल्या लोकांशी बोलून चांगल्या विचारांची देवाणघेवाण केली पाहिजे .
  • याचा परिमाण म्हणून सतत तुमच्या मनात सतत चांगले विचार येत राहतील

त्यामुळे सकारात्मक विचार अंतर्मनात मूळ धरतील. आणि तुम्ही एक सकारात्मक माणूस किंवा व्यक्ती म्हणून तुमचे आयुष्य जगू शकता त्यामुळेच नेहमी चांगले वाचन करा , चांगला व्यायाम करा , चांगले ऐका आणि चांगल्या व्यक्तींच्या संगतीत राहा. दुसर्यांबद्दल आपले विचार चांगले ठेवा. त्यामुळे तुमचे अंतर्मन शुद्ध होईल आणि जरी कधी वाईट विचार किंवा नकारात्मकता आली तरी सुद्धा जास्त वेळ टिकणार नाही..

आणखी वाचा : आयुष्यात व्यक्तिमत्व चांगले बनवायचे असेल तर या 6 गोष्टींवर नियंत्रण ठेवा

आणखी वाचा : आपला खरा मित्र कोण ? कसे ओळखाल ? 10 qualities..