Ahmednagar Tourist Places In Marathi | अहमदनगर मधील 25 पर्यटन स्थळे

Ahmednagar Tourist Places In Marathi |

महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर जिल्हा आहे. हिरवीगार शाल पांगरलेली अनेक डोंगरे किंवा डोंगर रांगा या जिल्ह्याला लाभल्या आहेत. तसेच अतिशय सुंदर असे अनेक धबधबे या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. पावसाळ्यातील काही सुंदर पर्यटन स्थळे या जिल्ह्यांमध्ये आहेत. चला तर मग या ब्लॉग मध्ये पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे आणि त्यांची थोडक्यात माहिती…

  • Akole ( अकोले)
  • Bhandardara (भंडारदरा)
  • Ahmednagar Fort (अहमदनगर किल्ला)
  • Kapurbavadi Lake (कापूरबावडी तलाव)
  • Mula Dam (मुळा धरण)
  • Ghatghar Dam ( मुळा धरण)
  • Randha WaterFall (रंधा धबधबा)
  • Sandhan Valley (सांधण व्हॅली)
  • Ambrella Falls (अम्ब्रेला धबधबा)
  • salabat Khan 2 Tomb (सलाबत खान 2 ची कबर)
  • Bhistbag Mahal (भिस्तबाग महल)
  • Mehrabad (मेहराबाद)
  • Damadi Mashid (दमडी मशीद)
  • Agasti Rishi Ashram (अगस्ती ऋषी आश्रम)
  • Cavelory Tank Museum
  • Rehekuri Kalvit Sanctury (रहेकुरी काळवीट अभयारण्य)
  • Siddheshwar Temple (सिद्धेश्वर मंदिर)
  • Vishal Ganpati Temple (विशाल गणपती मंदिर)
  • Vriddheshwar Temple (वृद्धेश्वर मंदिर )
  • Dhokeshwar Mahadev Temple (ढोकेश्वर महादेव मंदिर)
  • Amruteshwar Temple (अमृतेश्वर मंदिर)

आणखी वाचा : कोकणात फिरायला जायचंय ? मग या 15 Beaches ला नक्की भेट द्या..

Ahmednagar Tourist Places In Marathi |

Akole तालुक्यातील निसर्गरम्य स्थळे

  • हरिश्चंद्रगड
    • हरिश्चंद्रगड अहमदनगर शहरापासून 146 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यापासून 1066 किलोमीटर आणि मुंबईपासून 218 किलोमीटर अंतरावर आहे.
    • या किल्ल्याची उंची 1424 मीटर आहे. हा एक ऐतिहासिक किल्ला असून या गडाची सुंदरता त्यात अधिक भर घालते.
    • या गडावर काही लेण्या पाहायला मिळतील ज्या अकराव्या शतकात कोरल्या गेल्या असतील असे म्हटले जाते. या लेण्यांमध्ये विष्णूच्या मुर्त्या कोरलेल्या आहेत.
    • या गडावरील ट्रेक हा सोपा असून जवळजवळ तीन तासांचा वेळ यासाठी लागतो. या किल्ल्याला भेट देण्यासाठी पावसाळा आणि हिवाळा हा सर्वोत्तम काळ आहे.
  • कळसुबाई
    • कळसुबाई हे अकोले तालुक्यातील सर्वात उंच शिखर आहे या शिखराची उंची 1646 मीटर आहे. सह्याद्री पर्वतरांगां मध्ये महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून कळसुबाई हे शिखर ओळखले जाते.
    • कळसुबाई शिखर ट्रेक जवळजवळ सात किलोमीटर लांब आहे त्यासाठी चार तासांचा वेळ लागतो.
    • अहमदनगर शहरापासून 200 किलोमीटर अंतरावर ही शिखर आहे आणि पुण्यापासून 171 किलोमीटर आहे.
  • विश्रामगड
    • नगर नाशिक जिल्ह्यांच्या हद्दीवर असणारे विश्रामगड ज्याला पट्टागड असेही म्हटले जाते हे अकोले तालुक्यात आहे.
    • अहमदनगर शहरापासून 180 किलोमीटर अंतरावर हा गड आहे.

Bhandardara

  • प्रवरा नदीवर असणारा भंडारदरा हे धरण विल्सन धरण म्हणूनही ओळखले जाते हे धरण भंडारदरा या गावात असल्याकारणाने याला भंडारदरा धरण असे नाव पडले. या तलावाला लेक आर्थर हिल असेही म्हटले जाते.
  • भंडारदरा धरण आणि निसर्गाने नटलेले इथला परिसर इथल्या सुंदरतेत अधिक भर घालतो. इथे असणारी हिरवीगार झाडे शुद्ध आणि थंड हवा हा जलाशय आणि डोंगररांगा पाहण्यासाठी पर्यटक अधिक उत्सुक असतात.
  • पावसाळ्यात या परिसराच्या सुंदरतेत अधिक भर घालणारे धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात.
  • अहमदनगर शहरापासून 148 किलोमीटर अंतरावर हे धरण आहे.

Ahmednagar Fort

  • निजामशाही घराण्यातील पहिला सुलतान मलिक अहमद निजाम शहा याची अहमदनगर या ठिकाणी राजधानी होती.
  • 1707 मध्ये औरंगजेबाचा याच किल्ल्यामध्ये मृत्यू झाला होता.
  • ब्रिटिश राजवटीत या किल्ल्याचा वापर तुरुंग म्हणून केला जात होता याच ठिकाणी जवाहरलाल नेहरू अबुल कलाम आझाद सरदार वल्लभभाई पटेल आणि काही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या काही सदस्यांना नजर कैदेत ठेवण्यात आले होते.
  • याच किल्ल्यामध्ये जवाहरलाल नेहरू यांनी ” डिस्कवरी ऑफ इंडिया” हे पुस्तक लिहिले होते.
  • अहमदनगर किल्ला अहमदनगर शहरांमधील नाला भिंगार या ठिकाणी आहे.

Kapurbavadi Lake

  • अहमदनगर शहरापासून सात किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे.
  • या तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे थंडीच्या दिवसात या ठिकाणी विविध प्रकारचे रंगेबिरंगी पक्षी पाहायला मिळतात.
  • त्यामुळे थंडीच्या दिवसात या तलावाला भेट देण्यासाठी हजारो पर्यटक या ठिकाणी येतात.

Mula Dam

  • अहमदनगर शहरापासून 55 किलोमीटर अंतरावर हे धरण आहे.
  • मुळा धरण हे राहुरी तालुक्यात जवळ मुळा नदीवर बांधलेले आहे.
  • मूळ आहे नदी आजोबा डोंगर जवळ उगम पावते. मुळा धरण हे ज्ञानेश्वर सागर धरण म्हणूनही ओळखले जाते. या धरणाचे बांधकाम 1974 मध्ये पूर्ण झाले होते.
  • या धरणाच्या आजूबाजूचा परिसर नेहमीच पर्यटकांना आकर्षित करतो त्याचबरोबर इथे मिळणारे गोड पाण्यातील मासे खाण्यासाठी पर्यटक आवर्जून येतात.

आणखी वाचा : महाबळेश्वर मधील 10 सुंदर पर्यटन स्थळे

Ahmednagar Tourist Places In Marathi |

Ghatghar Dam

  • घाटघर धरण हे अकोले तालुक्यात असून अकोले शहरापासून 58 किलोमीटर अंतरावर आहे.
  • वीज निर्मितीसाठी या धरणाचा विशेष उपयोग केला जातो. त्याचबरोबर या ठिकाणचा आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर आहे.

Randha WaterFall

  • अकोले शहरापासून 24 किलोमीटर अंतरावर हा धबधबा प्रवरा नदीवर आहे.
  • पावसाळ्यात या धबधब्याचे रौद्ररूप पाहण्यास मिळते.
  • या धबधब्यावर काही चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे जसे की मैने प्यार किया, प्रेम ,कुर्बान, राजू चाचा इत्यादी.
  • या धबधब्याची उंची 50 मीटर आहे.

Sandhan Valley

  • सांधण दरी ही आशिया खंडातील दुसरी सर्वात मोठी दरी म्हणून ओळखली जाते.
  • ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांची सांधण दरी ही खास पसंती आहे.
  • 200 ते 400 फूट खोल आणि जवळपास दोन किलोमीटर लांब ही सांधण दरी निसर्गाचं एक आश्चर्यच आहे.
  • पावसाळ्यात या ठिकाणी मुसळधार पाऊस असल्याकारणाने दरड कोसळण्याचा धोका असतो या कारणाने या ठिकाणी पावसाळ्यात भेट देणे धोक्याचे ठरते म्हणून हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात या ठिकाणी पर्यटक भेट देत असतात.

Ambrella Falls

  • भंडारदरा धरणातून पाणी सोडल्यानंतर अम्ब्रेला धबधबा यातून छत्रीसारखा आकारात पाणी खाली कोसळते यालाच अम्ब्रेला फॉल्स असेही म्हणतात.
  • हजारो पर्यटक दरवर्षी या ठिकाणी हा धबधबा आणि भंडारदरा धरण पाहण्यास येत असतात.

salabat Khan 2 Tomb

  • या ठिकाणाला पाचशे वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. या ठिकाणी सलबत खान 2 याची कबर आहे तसेच याच ठिकाणी चांद बेबी यांचा महाल आहे. या ठिकाणाला चांदबीबी महाल म्हणून ओळखला जातो.
  • अहमदनगर शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर हा महाल आहे.

आणखी वाचा : लोणावळ्यातील 25 निसर्गरम्य पर्यटन स्थळे

Ahmednagar Tourist Places In Marathi |

Bhistbag Mahal

  • भिस्तबात महल यालाच हस्त बेहस्त महल असेही म्हणतात.
  • हा महाल निजामशाही राजवट येथील आहे.
  • या महालाच्या बाजूला पूर्वी एक मोठी बाग होती त्या ठिकाणी एक तलाव सुद्धा होता परंतु सध्या या ठिकाणी फक्त या महालाचे काही अवशेष उरलेले आहेत तरीसुद्धा या जागेला भिस्तबाग असे म्हटले जाते.

Mehrabad

  • अहमदनगर येथील अरणगाव या ठिकाणी मेहराबाद हे स्पिरिच्युअल ठिकाण अहमदनगर शहरापासून नऊ किलोमीटर अंतरावर आहे.
  • या ठिकाणी भारताचे अध्यात्मिक गुरु मेहेरबाबा यांची समाधी मंदिर आहे मेहराबाद ची स्थापना मेहेरबाबा यांनी 19 व्या शतकात केली आज ते आश्रम म्हणून ओळखले जाते.
  • दरवर्षी या ठिकाणी 31 जानेवारी रोजी अमृत तिथी म्हणून साजरी केली जाते कारण 31 जानेवारी 1969 रोजी मेहेर बाबा यांनी या ठिकाणी समाधी घेतली होती.

Damadi Mashid

  • निजाम कालीन काही कामगारांनी स्वतःच्या कमाईतून एक तांबडी जमवून या मशिदीचे बांधकाम केले होते म्हणून याला दमडी मशीद असे नाव पडले.
  • त्या कामगारांचे म्हणणे होते की राजे लोक स्वतःचे किल्ले बांधून अजरामर होतात मात्र कामगारांचे असे कुठलेही शिल्प आजपर्यंत झाले नाही आपल्या नावानेही काहीतरी नावे राहायला हवे यासाठी त्यांनी या वास्तूची उभारणी केली होती.
  • इसवी सन 1567 मध्ये सरदार सहेल खान यांनी ही मशीद बांधली.
  • अहमदनगर शहरांमध्ये असणाऱ्या अहमद नगर किल्ल्यापासून जवळच बुऱ्हानगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर ही मशीद आहे.

Agasti Rishi Ashram

  • प्रवरा नदीच्या काठावर अकोले शहरात अगस्ती ऋषी यांचे भव्य मंदिर आहे

Cavalry Tank Museum

  • अहमदनगर मधील रणगाडा संग्रहालय हे आशियातील एकमेव संग्रहालय आहे.
  • 1994 मध्ये लष्कराचे तत्कालीन जनरल बी. सी. जोशी यांच्या हस्ते या संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले होते.

Rehakuri blackbuck Sanctury

  • अहमदनगर शहरापासून ८० किलोमीटर अंतरावर कर्जत तालुक्यातील रेहकुरी या गावात हे अभयारण्य आहे. रहेकुरी अभयारण्याला काळ्या हरणाचे अभयारण्य असेही म्हणतात.
  • सुमारे 400 ते 500 काळवीट या अभयारण्यात असतील असा अंदाज आहे.
  • हे अभयारण्य वर्षभर खुले असते परंतु या अभयारण्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ हा उन्हाळा आहे.

आणखी वाचा : नाशिक जवळील १० निसर्गरम्य स्थळे

Ahmednagar Tourist Places In Marathi |

Siddheshwar Temple

  • नगर शहरापासून 40 किलोमीटर अंतरावर पारनेर तालुक्यात सिद्धेश्वर मंदिर आहे.
  • श्रावण महिन्यात विशेष करून या ठिकाणी भाविकांची गर्दी असते. त्याचबरोबर या दिवसांमध्ये पावसामुळे इथले वातावरण अधिक हिरवळ आणि निसर्गरम्य असतात.

Vishal Ganpati Temple

  • अहमदनगर शहरातील मुख्य बस स्टॉप म्हणजे माळीवाडा पासून जवळच विशाल गणपती मंदिर आहे. हे मंदिर शंभर वर्ष व अधिक जुने असावे असे म्हटले जाते.

Vriddheshwar Temple

  • अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात घाटशीरस येथे श्री क्षेत्र वृद्धेश्वर हे नाथपंथाचे आद्य शक्तीपीठ आहे.

Dhokeshwar Mahadev Temple

  • अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी ढोकेश्वर या ठिकाणी एका टेकडीवर काही लेणी आहेत याच ठिकाणी महादेवाचे एक मंदिर आहे.

Amruteshwar Temple

  • अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात रतनवाडी या गावात हेमाडपंती स्थापत्य कलेचे पुरातन असे अमृतसर म्हणजे आहे.

आणखी वाचा : पावसाळ्यातील पुण्यातील 10 unique निसर्गरम्य स्थळे