Ashtavinayak Yatra Information In Marathi |
महाराष्ट्रातील आठ महत्वाचे गणपती जे अष्टविनायक म्हणून ओळखले जातात. आपण या ब्लॉग Ashtavinayak Yatra Information In Marathi मध्ये पाहणार आहोत कि अष्टविनायक ची यात्रा कशी करायची आणि कुठल्या ठिकाणाहून सुरुवात केल्यानंतर दुसऱ्या ठिकाणावर जायला किती वेळ लागेल आणि किती अंतर जावे जावे लागणार आहे. ही सर्व माहिती आपण या ब्लॉगमध्ये घेणार आहोत. चला तर मग पाहुयात..
आठ गणपती :
- गणपती पहिला – श्री मोरेश्वर (मोरगाव, पुणे)
- गणपती दुसरा – श्री सिद्धिविनायक (सिद्धटेक, अहमदनगर)
- गणपती तिसरा – श्री बल्लाळेश्वर (पाली, रायगड)
- गणपती चौथा – श्री वरद विनायक (महाड, रायगड)
- गणपती पाचवा – श्री चिंतामणी (थेऊर, पुणे)
- गणपती सहावा – श्री गिरिजात्मक (लेण्याद्री, पुणे)
- गणपती सातवा – श्री विघ्नेश्वर (ओझर, पुणे)
- गणपती आठवा – श्री महागणपती (रांजणगाव, पुणे)
आणखी वाचा : कोल्हापूर मधील 15+ पर्यटन स्थळे
Ashtavinayak Yatra Information In Marathi |
गणपती पहिला – मोरेश्वर
- पुणे शहरातील मोरगाव या ठिकाणी असणारे अष्टविनायका पैकी पहिला गणपती म्हणजे मोरेश्वर. पुणे शहरापासून जवळ जवळ ६५.५ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे आणि इथे पोहचण्यासाठी २ तासांचा वेळ लागतो.
- पुणे – जेजुरी – बारामती महामार्गावर हे ठिकाण आहे. या ठिकाणाहून अष्टविनायक दर्शनाची सुरुवात केली तर व्यवस्थित इतर सर्व गणपतीची यात्रा करता येते .
- या ठिकाणाहून जवळच जेजुरी चे दर्शन करता येते. दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी येत असतात.
- मोरेश्वर या गणपतीला मयुरेश्वर असेही म्हटले जाते.
- “सुखकर्ता दुखहर्ता” ही गणपतीची आरती जी घरोघरी आपण गणपतीसाठी बोलतो ही श्री समर्थ रामदास स्वामींनी याच मंदिरात लिहिली असे म्हटले जाते.
- श्री मोरया गोसावी महाराज यांनी मयुरेश्वराची अखंड भक्ती केली आणि त्यांना प्रसन्न होऊन त्यांची भक्ती पाहून गणपतीने या ठिकाणी आपले वास्तव्य बनवले होते अशी अख्यायिका आहे.
गणपती दुसरा – सिद्धिविनायक
- अहमदनगर शहरातील सिद्धटेक या ठिकाणी अष्टविनायका पैकी आपला हा दुसरा गणपती म्हणजे सिद्धेश्वर. मोरेश्वर पासून म्हणजेच आपण या आधीच पाहिलेल्या गणपती पासून सिद्धटेक हे अंतर सुद्धा ६५ किलोमीटर आहे आणि या ठिकाणी यायला २ तासांचा वेळ लागतो .
- चौफुला – पाटस – दौड या मार्गानेआपण या ठिकाणी जाऊ शकतो.
- या ठिकाणी आल्यानंतर जर तुम्ही एखादी इच्छा मनात ठेवून सलग २१ दिवस या मंदिराच्या २१ प्रदक्षिणा जर पूर्ण केल्या तर तुमच्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होईल असे म्हटले जाते.
- इतर सर्व गणपतीची सोंड हि डाव्या बाजूला वळलेली असते परंतु या गणपतीची सोंड उजव्या बाजूला आहे आणि असे मानले जाते कि या मुळे हा गणपती सर्वात शक्तिशाली आहे .
- पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराच्या गाभाऱ्याचे बांधकाम केले होते. हे मंदिर एक टेकडी वर आहे.
- अतिशय सुंदर असं हे मंदिर असून या मंदिरा जवळूनच भीमा नदी वाहते .
- असे म्हटले जाते कि असुरांचा नाश करण्यासाठी महादेवाने विष्णूला गणपतीची उपासना करायला सांगितली होती आणि भगवान विष्णू ने याच ठिकाणी गणपतीची आराधना करून त्यांना आपल्या सोबत घेऊन असुरांचा नाश केला होता .
गणपती तिसरा – बल्लाळेश्वर
- पाली, रायगड या ठिकाणी आहे आपला तिसरा गणपती बल्लाळेश्वर. मोरेश्वर पासून पाली हे अंतर २२२ किलोमीटर आहे आणि इथे पोहचण्यासाठी ८ ते ९ तासांच वेळ लागतो .
- पुणे – कामशेत – खालापूर – पाली या मार्गेआपण या ठिकाणी येऊ शकतो. रोहा पासून २६ किलोमीटर अंतरावर पाली या ठिकाणी बल्लाळेश्वराचे मंदिर आहे .
- सरसगड आणि अंबा नदीच्या मध्ये हे मंदिर आहे .
- या गणपतीचे नाव हे त्याच्या एक भक्ताच्या नावावरून पडले आहे. बल्लाळ नावाचा गणपतीचा एक खूप मोठा भक्त होता. या मंदिरात एका दगडाच्या सिंहासनावर गणपतीची मूर्ती विराजमान आहे .
आणखी वाचा : नागपूर मधील 20+ पर्यटन स्थळे
Ashtavinayak Yatra Information In Marathi |
गणपती चौथा – वरद विनायक
- पाली पासून ४२ किलोमीटर अंतरावर असणारे आपला चौथा गणपती म्हणजे वरद विनायक हा आहे .
- रायगड जिल्ह्यातच खोपोली च्या जवळ महाड या ठिकाणी या गणपतीचे मंदिर आहे. या मंदिराला मठाचे रूप आहे.
- महाड हे ठिकाणच अतिशय सुंदर आहे त्यामुळेया ठिकाणचे वातावरणही अतिशय मनमोहक आणि प्रसन्न आहे . महाड येथे तुम्हाला डोंगर , दऱ्या , धबधबे पाहायला मिळतात त्यामुळे या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला देव दर्शना बरोबरच पर्यावरणाचा आनंद हि घेता येतो .
गणपती पाचवा – चिंतामणी
- पुणे जिल्ह्यातील थेऊर या ठिकाणी आपला पाचवा गणपती आहे चिंतामणी. महाड पासून थेऊर हे ११० किलोमीटर आहे .
- प्रत्येक भक्ताची चिंता हरणारे आपले सर्वांचे आवडते बाप्पा मोरया म्हणजे चिंतामणी. असे म्हणतात कि या ठिकाणी दर्शन घेतले कि आपल्या मनातील असणाऱ्या सर्व चिंता दूर होत जातात. त्यामुळे अनेक भाविक दरवर्षी या ठिकाणी येत असतात. खूप सुंदर असं हे मंदिर आहे. भव्य असा गाभारा आहे.
- पूर्व दिशेला तोंड करून हि मूर्ती आहे आणि चिंतामणी गणपतीच्या डोळ्यांमध्ये लाल मणी आणि हिरे आहेत .
गणपती सहावा – गिरिजात्मक
- पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका ज्या ठिकाणी सर्व बाजूंनी सह्याद्रीच्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत अशाच लेण्याद्री या ठिकाणी अष्टविनायकापैकी एक गिरीजात्मक लेण्याद्री गणपती प्रसिद्ध आहे.
- या ठिकाणी एकूण 28 लेण्या आहेत ज्यापैकी आठव्या गुहेमध्ये हे गिरेजात्मक गणपतीचे देव आहे. या लेणीला गणेश लेणी असेही म्हणतात या लेणी चढून जाण्यासाठी जवळपास 360 पायऱ्या आहेत या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे संपूर्ण देऊळ एकाच दगडापासून खोदून तयार केलेले आहे.
- थेऊर पासून लेण्याद्री अंदाजे शंभर किलोमीटर लांब आहे.
- या ठिकाणची वातावरण अतिशय सुंदर आहे कारण सहभाजूने डोंगररांगा असल्याकारणाने या ठिकाणी भरपूर हिरवळ पसरलेली आहे.
- दरवर्षी हजारो पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. या ठिकाणच्या लेण्या आणि गणपतीचे दर्शन करण्यासाठी पर्यटक येतात त्याचबरोबर इथे ट्रेकिंग सुद्धा करता येते यामुळे पावसाळ्याच्या दिवसात या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते.
आणखी वाचा : महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे
Ashtavinayak Yatra Information In Marathi |
गणपती सातवा – विघ्नेश्वर
- विघ्नेश्वर हा अष्टविनायकापैकी आपला सातवा गणपती ओझर या ठिकाणी आहे. लेण्याद्रीपासून ओझर हे फक्त 15 किलोमीटर अंतरावर आहे.
- विघ्नेश्वर म्हणजेच विघ्नहर्ता हा गणपती अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळखला जातो ओझर हे गाव कुकडी या नदीवर वसलेले असून पुणे शहरापासून 90 किलोमीटर अंतरावर आहे. पुणे नाशिक रस्त्यावरील जुन्नर तालुक्यात नारायणगाव पासून जवळजवळ आठ किलोमीटर अंतरावर ओझर हे ठिकाण आहे
- बाजी बाजीराव पेशवे यांचे बंधू भाऊ चिमाजी आप यांनी हे 1785 रोजी हे मंदिर बांधले आणि त्यावर सोन्याचा कळस चढवला होता.
गणपती आठवा – महागणपती
- अष्टविनायकापैकी शेवटचा गणपती म्हणजे महागणपती. हा गणपती रांजणगाव या ठिकाणी आहे ओझर पासून अंदाजे 70 किलोमीटर अंतरावर हा गणपती आहे.
- अहमदनगर पुणे रोडवर रांजणगाव पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे.
- महागणपतीचे हे मंदिर पुणे अहमदनगर या महामार्गाच्या कडेलाच आहे त्यामुळे हे मंदिर शोधण्यासाठी धडपड करावी लागत नाही.
महाराष्ट्रात असणारे हे अष्टविनायक महाराष्ट्राच्या आठ वेगवेगळ्या भागांमध्ये पसरलेले आहे. अष्टविनायकांची वैशिष्ट्य असे आहे की प्रत्येक गणपतीची मूर्ती ही वेगवेगळी आहे आणि प्रत्येक मूर्ती ही एकाच दगडामध्ये बनवलेली आहे आणि या मूर्तींना भगवा रंग म्हणजेच शेंदूर लावलेला आहे.
दरवर्षी हजारोंच्या संख्येने भाविक अष्टविनायकाची यात्रा करत असतात महाराष्ट्र शासनाकडून अष्टविनाकाची यात्रेसाठी विशेष बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचबरोबर काही प्रायव्हेट कंपन्यांनीही अष्टविनायकाची टूर्स भाविकांसाठी बनवलेले आहेत. आपण या टूर्सचा किंवा महाराष्ट्र शासनाच्या बसेसचा वापर करून अष्टविनायक यात्रा करू शकता.
जर तुम्हाला स्वतःच्या वाहनाने अष्टविनायक यात्रा करायची असेल तर हा ब्लॉक तुम्हाला नक्कीच मदत करेल अशी अपेक्षा आहे.
आणखी वाचा : कोकणात फिरायला जायचंय ? मग या 15 Beaches ला नक्की भेट द्या..