Darjeeling Tourist Places In Marathi |
दार्जिलिंग हे शहर पश्चिम बंगालमधील एक शहर आहे जे चहा आणि त्याच्या विशिष्ट चवीसाठी जगप्रसिद्ध आहे. दार्जिलिंग हे शहर ‘ ऑर्थोडॉक्स ‘ म्हणून ओळखला जाणाऱ्या जुन्या मूळ पद्धतीने चहाचे उत्पादन करते त्यामुळे हे जगभरात प्रसिद्ध आहे. जुन्या पद्धतीची वसाहत आणि आधुनिकता यांचे विशेष आकर्षण या शहराला लाभलेले आहे.
दार्जिलिंग हे एक सुंदर हिल स्टेशन असून या ठिकाणी हिरव्यागार चहाच्या बागा, रोडोडेंत्रोन , फिरत्या पर्वत रांगा आणि ऑर्किड गार्डन्स यासाठी ही दार्जिलिंग ओळखले जाते. या वैशिष्ट्य म्हणजे इथे असणाऱ्या हिमालय पर्वतरांगा आणि इथले असणारे नैसर्गिक सौंदर्य यांमुळे या शहराला ” टेकड्यांची राणी “असे म्हणतात.
या ब्लॉग Darjeeling Tourist Places In Marathi मध्ये आपण दार्जिलिंग या शहरात असणाऱ्या विविध पर्यटन स्थळांची माहिती घेणार आहोत.
- kanchenjunga Mountain (कांचनजुंगा माउंटन)
- Himalayan Railways ( हिमालय रेल्वे)
- Padmaja Naidu Himalayan Zoological Park ( पद्मजा नायडू पार्क)
- Tiger Hill (टायगर हिल)
- Lamahatta ( लामहत्ता)
- Batasia Loop (बटॅसिया लूप)
- Mahakal Temple ( महाकाल मंदिर)
- Himalaya Mountaineering Institute (हिमालय माऊंटेनिरिंग इन्स्टिटयूट)
- Japanese Peace Pagoda ( जापनीज शांती पॅगोडा)
- Passenger Ropeway (रोपेवे)
- Tea Garden View ( टी गार्डन)
- Barbotey Rock Garden ( बारबोटे रॉक गार्डन)
- Lava ( लावा)
- Mirika Lake ( मिरीक तलाव )
- singalila National Park ( सिंगालीला नॅशनल पार्क)
- Nightingale Park ( नाईट पार्क)
- Sandakphu Trek ( संदकफू ट्रेक)
- Chowrasta Darjeeing ( चोवरस्त दार्जिलिंग)
- Dali Monastery (दाली मोनॅस्टरी )
- Ghoom Monastery (घूम मोनॅस्टरी)
- River Rafting In Teesta (रिव्हर राफ्टिंग)
आणखी वाचा : माथेरान येथील 20+पर्यटन स्थळे
Darjeeling Tourist Places In Marathi |
kanchenjunga Mountain (कांचनजुंगा माउंटन )
- दार्जीलिंग या शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर आहे.
- जगातील तिसऱ्या क्रमांकावर असणारे हे एक सर्वात उंच शिखर आहे.
- हे शिखर नेपाळ, सिक्कीम आणि तिबेट यांनी वेढलेले आहे. या शिखराची उंची सुमारे 8586 मीटर आहे.
Himalayan Railways ( हिमालय रेल्वे)
- दार्जिलिंग या शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर हे रेल्वे स्टेशन आहे.
- या ठिकाणी तुम्हाला दार्जिलिंग टॉय ट्रेन पहायला मिळतील. ज्या पाहायला तर सुंदर आहेच परंतु या ट्रेनचा प्रवास अतिशय सुंदर होतो कारण या ट्रेन मधून आपल्याला निसर्गाला जवळून पाहण्याचा आनंद मिळतो.
- या टॉय ट्रेनचा प्रवास हा इथे असणाऱ्या चहाचे मुळे त्याचबरोबर डोंगर , दऱ्या यांमधून होतो त्यामुळे संपूर्ण निसर्गाचा आनंद आपल्याला घेता येतो.
Padmaja Naidu Himalayan Zoological Park ( पद्मजा नायडू पार्क)
- हे झूलॉजिकल पार्क दार्जीलिंग शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे.
- इथे तुम्हाला विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी पाहायला मिळतील.
Tiger Hill (टायगर हिल)
- दार्जिलिंग शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर हे हिल स्टेशन आहे. या हिल स्टेशनची उंची सुमारे 2590 मीटर आहे.
- टायगर हिल हा एक सनसेट पॉईंट सुद्धा आहे. या ठिकाणावर उभे राहिले असता आपल्याला समोर असणाऱ्या पर्वत रांगा बर्फाने झाकलेल्या अतिशय सुंदर अशा दिसतात आणि हेच या ठिकाणाचे वैशिष्ट्य आहे.
Lamahatta ( लामहत्ता)
- दार्जिलिंग पासून 23 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.
- या ठिकाणी पाईन ट्री चे जंगल आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 5000 फूट उंचीवर आहे. उंचावर असल्यामुळे आणि त्याचबरोबर इथे असणाऱ्या उंच झाडांमुळे ज्याच्या सुंदरतेत अधिक भर पडते.
- पर्यटकांसाठी या ठिकाणी विविध प्रकारचे निसर्गरम्य त्याचबरोबर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या ठिकाणाला सुंदर नटवण्यात आलेले आहे.
- या ठिकाणाला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात आणि पर्यटनाचा आनंद घेतात या ठिकाणी त्यांच्या खाण्याची आणि राहण्याचे उत्तम सोय करण्यात आलेली आहे त्यामुळे या ठिकाणाला नक्की भेट द्या.
Batasia Loop (बटॅसिया लूप)
- दार्जिलिंग शहरापासून हे ठिकाण तीन किलोमीटर अंतरावर आहे.
- या ठिकाणाहून टॉय ट्रेनचा रेल्वे रूट आहे त्याचबरोबर इथे पर्यटकांसाठी निसर्गाच्या सानिध्यात असणारा व्ह्यू पॉइट आहे.
आणखी वाचा : कोकणात फिरायला जायचंय ? मग या 15 Beaches ला नक्की भेट द्या..
Darjeeling Tourist Places In Marathi |
Mahakal Temple ( महाकाल मंदिर)
- दार्जिलिंग शहरापासून 60 किलोमीटर अंतरावर हे महादेवाचे मंदिर आहे.
- हे महादेवाचे मंदिर अठराव्या शतकातील असावे असे म्हणण्यात येते. हे ठिकाण एक हिल स्टेशन आहे.
Himalaya Mountaineering Institute (हिमालय माऊंटेनिरिंग इन्स्टिटयूट)
- हे माउंटेनरिंग इन्स्टिट्यूट दार्जिलिंग शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे.
- या ठिकाणी नवशिक्या लोकांसाठी माऊंटेनरिंग शिकवली जाते हे इन्स्टिट्यूट भारतातील नावाजलेल्या इतर माउंटेनरिंग इन्स्टिट्यूट मधील एक आहे.
- या माउंटेनरिंग इन्स्टिट्यूट ची स्थापना 4 नोव्हेंबर 1954 रोजी झाली आहे.
Japanese Peace Pagoda ( जापनीज शांती पॅगोडा)
- दार्जिलिंग शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर हा पॅगोडा आहे.
- हा एक उत्तम प्रकारचा snow clad peak आहे.
- निसर्गप्रेमी आणि शहराच्या गोंगाटा पासून दूर या ठिकाणी पर्यटक भेट देत असतात.
Passenger Ropeway (रोपेवे)
- दार्जिलिंग शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर हा रोपवे बनवण्यात आलेला आहे.
- या रोपवेचा वापर करून आपण इथे असणाऱ्या डोंगररांगांना जवळून पाहण्याचा आनंद घेऊ शकतो.
- हजारो पर्यटकांसाठी हा रोपे वे दार्जिलिंग चे विशेष आकर्षण बनलेला आहे.
Tea Garden View ( टी गार्डन)
- दार्जिलिंग हे शहर इथे असणाऱ्या डोंगररांगा आणि चहाच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे.
आणखी वाचा : महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे
Darjeeling Tourist Places In Marathi |
Barbotey Rock Garden ( बारबोटे रॉक गार्डन)
- दार्जिलिंग पासून दहा किलोमीटर अंतरावर असणारे हे गार्डन अखंड दगडामध्ये बनवलेले आहे त्याचबरोबर इथे असणारे विविध प्रकारची फुले तुम्हाला आकर्षित करतील.
- अतिशय सुंदर असं हे एका टेकडीवर बनवण्यात आले आहे त्यामुळे या गार्डनमध्ये फिरताना आपण टेकडीवर असताना संपूर्ण गार्डनचा व्ह्यू पाहू शकतो.
Lava ( लावा)
- दार्जिलिंग पासून 80 किलोमीटर अंतरावर असणार हे छोटसं शहर आहे.
Mirika Lake ( मिरीक तलाव )
- हिरव्यागार जंगलाने वेढलेल्या हे एक तलाव आहे.
- हा तलाव दार्जीलिंग पासून 49 किलोमीटर अंतरावर आहे आणि हा तलाव मिरीक या शहरात आहे.
- मिल्क हे शहर एक हिल स्टेशन असून इथल्या निसर्ग रम्य वातावरणात फिरण्यासाठी लाखो पर्यटक दरवर्षी या ठिकाणाला भेट देतात.
singalila National Park ( सिंगालीला नॅशनल पार्क)
- दार्जीलिंग पासून 20 किलोमीटर अंतरावर हे नॅशनल पार्क आहे.
- याची उंची सुमारे 7000 फूट आहे.
- हा एक उत्तम पिकनिक स्पॉट आहे.
Nightingale Park ( नाईट पार्क)
- दार्जिलिंग पासून दोन किलोमीटर अंतरावर हा पार्क आहे हा पार्क संपूर्णपणे बर्फाने झाकलेला आहे.
- या पार्कला भेट देणारे पर्यटक या ठिकाणी असणाऱ्या बर्फाचा या ठिकाणी वेगवेगळे खेळ खेळून आनंद घेतात.
Sandakphu Trek ( संदकफू ट्रेक)
- पश्चिम बंगालमधील हे ठिकाण सर्वात उंच आहे. दार्जिलिंग शहरापासून 27 किलोमीटर अंतरावर हे शिखर आहे.
- या शिखराची उंची सुमारे 11,941 फूट उंच आहे.
आणखी वाचा : मुन्नार मधील 25+ पर्यटन स्थळे
Darjeeling Tourist Places In Marathi |
Chowrasta Darjeeing ( चोवरस्त दार्जिलिंग)
- ज्या ठिकाणी चार रस्ते एकत्र मिळतात त्यालाच चौरस्ता असं म्हणतात हे ठिकाण दार्जिलिंगच्या शहराच्या मध्यभागी आहे.
- हे ठिकाण दार्जीलिंगच्या मध्यभागी असल्यामुळे या ठिकाणाहून आपल्याला संपूर्ण दार्जीलिंग फिरता येते. हे ठिकाण एक प्रकारचे मार्केट प्लेस आहे.
Dali Monastery (दाली मोनॅस्टरी )
- दार्जिलिंग शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर ही मॉनेस्ट्री आहे.
- दाली मोनॅस्ट्री druk sangag chiling monastery म्हणूनही ओळखली जाते.
- हे ठिकाण तिबेटन बुद्धिझम यांच्या आहे.
Ghoom Monastery (घूम मोनॅस्टरी)
- घुम मॉनेस्ट्री ही तीबेटन बुद्धिझम ची सर्वात जुनी मॉनस्ट्री आहे.
River Rafting In Teesta (रिव्हर राफ्टिंग)
- या ठिकाणी आपण रिवर ड्राफ्टिंग चा आनंद घेऊ शकतो.
- ज्या पर्यटकांना या अशा प्रकारच्या एडवेंचरची आवड असेल तर या ठिकाणी रिव्हर ड्राफ्टिंग करण्याचा आनंद ते घेऊ शकतात.
आणखी वाचा : पावसाळ्यातील पुण्यातील 10 unique निसर्गरम्य स्थळे