Delhi Tourist Places In Marathi |
भारताची राजधानी असलेले शहर म्हणजे दिल्ली. भारतातीलच नाही तर संपूर्ण जगभरातील लोक या ठिकाणी इथल्या पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी दरवर्षी येत असतात. वास्तु कलांनी संपूर्ण असणारे हे शहर प्रत्येक पर्यटकाची पसंती आहे. चला तर मग या ब्लॉग Delhi Tourist Places In Marathi मध्ये आपण पाहूयात दिल्ली या ठिकाणी असणाऱ्या विविध पर्यटन स्थळांची माहिती..
- India Gate (इंडिया गेट)
- Red Fort (लाल किल्ला )
- Taj Mahal (ताजमहल )
- Buland Darvaja (बुलंद दरवाजा, फत्तेपूर सिक्री)
- Lotus Temple ( लोटस टेम्पल)
- Qutub Minar ( कुतुब मिनार)
- Swaminarayan Akshardham ( स्वामीनारायण अक्षर धाम)
- Lodhi garden ( लोधी गार्डन)
- ISKON temple, Delhi (इस्कॉन टेम्पल दिल्ली)
- Humayun’s Tomb ( हुमायून ची कबर)
- Jama Masjid (जामा मस्जिद)
- National Museum, New Delhi ( राष्ट्रीय संग्रहालय)
- Rashtrapati bhavan ( राष्ट्र पती भवन )
- Jantar Mantar ( जंतर मंतर )
- Rajghat ( राजघाट)
- National Rail Museum (राष्ट्रीय रेल्वे संग्रहालय)
- Safdarjung Tomb ( सफदर जंग कबर)
- Dilli Haat (दिल्ली हाट)
आणखी वाचा : कोल्हापूर मधील 15+ पर्यटन स्थळे
Delhi Tourist Places In Marathi |
India Gate (इंडिया गेट)
- ज्या भारतीय सैनिकांनी पहिल्या महायुद्धात आपले प्राण गमावले, अश्या आपल्या 70,000 भारतीय वीर सैनिकांना स्मरण करणारे हे इंडिया गेट 1921 साली बांधण्यात आले होते पण आजही हे गेट सर्व भारतीयांसाठी भूषण आहे.
- दर वर्षी या ठिकाणी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
- नवी दिल्ली च्या मध्यभागी हे ठिकाण असून याची उंची 42 मीटर आहे. हे गेट अमर जवान स्मारक म्हणूनही प्रसिद्ध आहे.
- हे गेट पिवळ्या आणि लाल वाळू पासून बनवलेले आहे. या गेट समोर राजपथ आहे जो राष्ट्रपती भवन कडे जातो.
Red Fort (लाल किल्ला )
- शहाजहान यांनी 1648 रोजी या किल्ल्याचे बांधकाम केले, आता सध्या या किल्ल्यावर दरवर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वज फडकवण्याचे काम केले जाते.
- या किल्ल्यावर भेट देण्यासाठी 250 रुपये प्रवेश शुल्क द्यावे लागते.
- भव्य मोठा असा हा किल्ला पाहण्यासाठी जवळपास दोन तासांचा कालावधी लागतो. अतिशय सुंदर असा हा किल्ला पर्यटकांची खास पसंती आहे.
- या किल्ल्यामध्ये असणारे दिवाने खास त्याचप्रमाणे अनेक अशी त्या काळाची खास बांधकामे पाहण्यास अतिशय सुंदर वाटतात.
Lotus Temple ( लोटस टेम्पल)
- कुठलेही देवाची मूर्ती नसलेलं हे मंदिर कमळाच्या आकाराचे आहे. या मंदिराच्या सभोवताली तलाव आणि सुंदर बागा आहेत.
- Fariborz sohba नावाच्या एका इराणी आर्किटेक्चर ने या मंदिराचे डिझाईन तयार केले होते, 1986 साली हे मंदिर बांधण्यात आले होते.
- हे मंदिर बहाई पंथाचे असू या मंदिरात कुठल्याही देवाची मूर्ती नाही या ठिकाणी लोक मन एकाग्र करून मेडिटेशन करण्यास येतात. इथे आल्यानंतर एक विलक्षण शांतता मनाला मिळते असे अनेकांचे म्हणणे आहे.
Buland Darvaja (बुलंद दरवाजा, फत्तेपूर सिक्री)
- सोळाव्या शतकात बादशाह अकबर याचे या ठिकाणी मुघल साम्राज्याची राजधानी होती.
- अकबराने या ठिकाणी आपल्या तीन प्रिय राणींसाठी तीन सुंदर महाल बनवले होते त्याचबरोबर मस्जिद आणि मंदिरेही बनवली होती कारण अकबराच्या तीन राण्यांपैकी एक राणी हिंदू , दुसरी मुस्लिम आणि तिसरी राणी इराणी होती. अकबराने त्यांच्या मध्ये कुठलाही भेदभाव न करता मंदिरे आणि मज्जिद यांचे बांधकाम केले.
- 1575 मध्ये सम्राट अकबराने आपल्या विजयाचे स्मारक म्हणून बुलंद दरवाजाचे बांधकाम केले. जामा मस्जिद याचा दरवाजा बुलंद दरवाजा म्हणून ओळखला जातो.
Taj Mahal (ताजमहल )
- भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी ताजमहल हे एक महत्त्वाचे आणि जगभरात लोकप्रिय असणारे स्थळ आहे
- शहाजहान याने आपल्या पत्नी साठी या महालाचे बांधकाम केले होते त्यांच्या पत्नीचे नाव मुमताज महल असे होते तिच्या नावावरून या महालाचे नाव ताजमहल असे ठेवण्यात आले.
- अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असा हा महल अतिशय सुंदर आहे. प्रेमाचे प्रतीक म्हणून या महालाकडे पाहिले जाते.
- या महालाचे बांधकाम 1632 मध्ये झाले होते.
आणखी वाचा : कोकणात फिरायला जायचंय ? मग या 15 Beaches ला नक्की भेट द्या..
Delhi Tourist Places In Marathi |
Qutub Minar ( कुतुब मिनार)
- कुतुब मिनार यालाच विजय बुरुज असेही म्हणतात. हा मिळणार तोमर राजपूत यांनी लाल कोर्ट च जागेवर स्थापन केला होता. यामिनारची उंची 72.5 मीटर आहे. भारतातील सर्वात उंच दगडी बुरुज म्हणून कुतुब मिनार ला ओळखले जाते.
- सर्वप्रथम या गुरुजाची बांधकाम कुतुबुद्दीन ऐबक यांनी सुरू केले होते परंतु त्याने फक्त तळघर पूर्ण केले त्यानंतर इलतुमिष आणि फिरोजशाह तुबलक यांनी यामध्ये आणखी काही मजले वाढवले. 1192 मध्ये या मिनाराचे बांधकाम पूर्ण झाले.
Swaminarayan Akshardham ( स्वामीनारायण अक्षर धाम)
- जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर म्हणून ओळखले जाणारे हे स्वामीनारायण अक्षरधाम हे नवी दिल्ली येथे जवळपास शंभर एकराच्या जागेत पसरलेले आहे.
- या मंदिराला भेट देण्यासाठी प्रौढांसाठी 205 रुपये तर लहान मुलांसाठी 155 रुपये प्रवेश शुल्क आकारले जाते.
- अतिशय सुंदर असे हे मंदिर व आसपासचा परिसर फिरण्यासाठी जवळजवळ अर्ध्या तासाचा वेळ लागतो.
Lodhi garden ( लोधी गार्डन)
- पंधराव्या शतकात हे गार्डन बनवण्यात आले होते आणि इब्राहिम लोधी यांनी हे गार्डन बांधले होते. 90 एकरामध्ये हे गार्डन पसरलेले आहे. या गार्डनमध्ये एकूण चार स्मारके आहेत त्यामध्ये बडा गुंबड , सिकंदर लोधी, शीशा कुंबड आणि मोहम्मद शहा यांची कबर आहे.
- जर समजा तुम्ही चालत हे गार्डन फिरत असाल तर तुम्हाला जवळपास एक ते दोन तास हे संपूर्ण गार्डन फिरण्यासाठी लागतील. हे गार्डन फिरण्यासाठी कुठलेही प्रवेश शुल्क घेतले जात नाही.
ISKON temple, Delhi (इस्कॉन टेम्पल दिल्ली)
- श्रीकृष्णाचे हे सुंदर मंदिर पाहण्यासाठी पर्यटक नेहमीच आतुर असतात. हे मंदिर दिल्लीपासून 17 किलोमीटर अंतरावर आहे
Humayun’s Tomb ( हुमायून ची कबर)
- नवी दिल्ली पासून पाच किलोमीटर अंतरावर ही कबर आहे इथे जाण्यासाठी जवळपास दहा ते पंधरा मिनिटांचा वेळ लागतो.
- इथे भेट देण्यासाठी 35 रुपये प्रवेश शुल्क आकारले जाते. अतिशय सुंदर अशी ही वास्तु संगमरवरी असून यामध्ये लाल वाळूच्या दगडांचा वापर केला आहे.
National Museum, New Delhi ( राष्ट्रीय संग्रहालय)
- हे म्युझियम दिल्ली पासून 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे येथे पोहोचण्यासाठी जवळपास एक तासाचा वेळ लागतो.
- येथे 350 रुपये प्रवेश शुल्क आकारले जाते.
आणखी वाचा : केरळ मधील 25 बीच… नक्की भेट द्या ..
Delhi Tourist Places In Marathi |
Jantar Mantar ( जंतर मंतर )
- दिल्ली पासून 19 किलोमीटर अंतरावर आहे.
- महाराजा जयसिंग दोन यांनी बांधलेल्या पाच वेधशाळांपैकी जंतर-मतर ही एक नावाजलेली वेधशाळा आहे.
- खगोलशास्त्राची आवड असणारे पर्यटक नेहमीच अशा ठिकाणांना भेट देत असतात.
- या ठिकाणी सूर्य चंद्र आणि इतर ग्रहांचे निरीक्षण करण्याचे काम केले जाते
Rashtrapati bhavan ( राष्ट्र पती भवन )
- राष्ट्रपतींचे निवासस्थान असणारे राष्ट्रपती भवन पाहण्यासाठी पर्यटक नेहमीच येथे येतात परंतु बाहेरील बाजूनेच राष्ट्रपती भवन पाहता येते.
- येथे जाण्यासाठी पन्नास रुपये प्रवेश शुल्क भरावे लागते.
Rajghat ( राजघाट)
- नवी दिल्ली पासून सहा किलोमीटर अंतरावर राजघाट आहे.
- महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर त्यांच्यावर या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या ठिकाणी त्यांचे स्मारक बनवण्यात आले आहे.
- राजघाट पाच एकर मध्ये पसरलेला आहे. राजघाटाला गांधी स्मृती असेही म्हटले जाते.
- हा घाट नवी दिल्लीत असणाऱ्या यमुना नदीच्या तीरावर आहे.
आणखी वाचा : महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे
Delhi Tourist Places In Marathi |
National Rail Museum (राष्ट्रीय रेल्वे संग्रहालय)
- हा म्युझियम पाहण्यासाठी पन्नास रुपये प्रवेश शुल्क आकारला जातो.
- हे म्युझियम नवी दिल्ली पासून पाच किलोमीटर अंतरावर आहे.
- या म्युझियम मध्ये भारतीय रेल्वेचा जवळजवळ 160 वर्षांचा इतिहास पाहण्यास मिळतो.
- आमिर खानच्या “फना” ह्या मूवी मध्ये या म्युझियम चा काही भाग एका गाण्यांमध्ये चित्रित केलेला आहे.
Safdarjung Tomb ( सफदर जंग कबर)
- नवी दिल्ली पासून साडेपाच किलोमीटर अंतरावर ही कबर आहे.
- अवध प्रांताचा राज्यपाल आणि मुघल सम्राट अहमदशहा यांचा वजीर म्हणजे सफदरजंग (१७०८-१७५४)
- या ठिकाणी फोटो काढण्यास किंवा व्हिडिओ शूटिंग काढण्यास सक्त मनाई आहे.
- ही वास्तु दिल्ली तर इतर ऐतिहासिक इमारतींपैकी एक महत्त्वाची इमारत आहे.
Dilli Haat (दिल्ली हाट)
- दहा वर्षाखालील लहान मुलांना प्रवेश फी नाही परंतु मोठ्या लोकांसाठी वीस रुपये प्रवेश फी आकारली जाते.
- नवी दिल्ली पासून जवळ जवळ सात किलोमीटर अंतरावर दिल्ली हाट आहे.
- या ठिकाणी तुम्हाला विविध प्रकारच्या धातूंच्या हस्तकला तसेच रेशीम आणि लोकरचे कपडे पहायला मिळतील. त्याचबरोबर मणी, रत्ने आणि चंदनचे कोरिवकाम, सुशोभित उंटांची पादत्राणे, आत्याधुनिक भांडी पाहायला मिळतील आणि आपण हे सर्व वस्तू योग्य दरात विकत घेता येतील.
आणखी वाचा : महाबळेश्वर मधील 10 सुंदर पर्यटन स्थळे