Forts From Raigad In Marathi |
महाराष्ट्र राज्य हे पर्यटन सौंदर्याने भरलेले आहे आणि या सौंदर्यात अधिक भर घालते ते इथले किल्ले . महाराजांच्या काळापासून किंवा त्या आधीच इतिहास असलेले जवळ जवळ ४०० हुन अधिक किल्ले महाराष्ट्रात तुम्हाला पाहायला मिळतील. या किल्ल्यांचे वनदुर्ग, जलदुर्ग, गिरीदुर्ग तसेच भुईकोट असे प्रकार आहेत. आपण या ब्लॉग Forts From Raigad In Marathi मध्ये या रायगड जिल्ह्यातील काही किल्ला बद्दल माहिती घेणार आहोत.
- रायगड किल्ला (Raigad Fort)
- लिंगाणा किल्ला (Lingana Fort)
- जंजिरा किल्ला (Janjira Fort)
- अवचित गड (Avchitgad Fort)
- सुधागड (Sudhagad Fort)
- सरसगड (Sarasgad Fort)
- बिरवाडी (Birwadi Fort)
- सुरगड (Surgad Fort)
- तळगड (Talgad Fort)
- विश्रामगड (Vishramgad Fort)
- मानगड (Mangad Fort)
- कासा किंवा पद्मदुर्ग (Kasa / Padmdurg Fort)
- राजकोट किंवा चौल चा किल्ला ( Rajkot / Choul Fort)
- कोरलाई किल्ला (Korlai Fort)
- वीरगड किंवा घोसाळगड ( Veergad / Ghosalgad Fort)
- महेंद्र गड किंवा चांभारगड ( Mahendragad / Chanbhargad Fort )
- चंद्रगड (Chandragad Fort)
- बाणकोट किल्ला (Bankot Fort)
- फत्तेदुर्ग (Fattedurg Fort)
- सुवर्णदुर्ग ( Suvarndurg Fort)
- कोकण दिवा गड (Kokan Diva Fort)
- सागरगड ( Sagargad Fort)
- माणिकगड ( Manikgad Fort)
- मेघडंबरी गड (Meghandabari Fort)
- विकतगड किल्ला ( Vikatgad Fort)
- कर्नाळा किल्ला (Karnala Fort)
आणखी वाचा : महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे
Forts From Raigad In Marathi |
रायगड किल्ला (Raigad Fort)
- रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणी रायगड हा किल्ला दख्खनच्या पठारावर आहे याच किल्ल्याला रायरीचा किल्ला असेही म्हणतात.
- शिवाजी महाराजांनी 1665 मध्ये हा किल्ला जिंकला होता. हा किल्ला बराच काळ मराठ्यांची राजधानी होता.
- रायगड या शहरापासून साडेपाच किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे आणि पुण्यापासून 132 किलोमीटर आहे.
लिंगाणा किल्ला (Lingana Fort)
- शिवलिंग सारखा आकार असणारा हा उपदुर्ग रायगड जिल्ह्यात असून सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये आहे. शिवलिंगासारखा आकार असल्याकारणाने याचे नाव लिंगाणा असे पडले.
- या किल्ल्याची उंची 3100 फूट आहे.
- रायगड पासून हा किल्ला जवळजवळ 60 किलोमीटर अंतरावर आहे आणि पुण्यापासून 146 किलोमीटर अंतरावर आहे.
जंजिरा किल्ला (Janjira Fort)
- रायगड जिल्ह्यातील मुरुड या ठिकाणी असणारा जंजिरा किल्ला हा चहूबाजूने पाण्याने भेटलेला असल्याकारणाने तो एक बेटासारखा स्थित आहे. हा किल्ला अतिशय मजबूत आहे.
- पुण्यापासून हा किल्ला 160 किलोमीटर अंतरावर आहे आणि रायगड पासून हा किल्ला 87 किलोमीटर अंतरावर आहे.
अवचित गड (Avchitgad Fort)
- रायगड जिल्ह्यातील रोहा या ठिकाणी हा किल्ला सह्याद्री रांगेत आहे. या किल्ल्याचा ट्रेक हा मध्यम स्वरूपाचा आहे त्यामुळे या ठिकाणी नवशिके लोक ट्रेकिंग साठी येत असतात.
- पुण्यापासून हा किल्ला 141 किलोमीटर अंतरावर आहे आणि रायगड पासून 71 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे.
सुधागड (Sudhagad Fort)
- भोर संस्थानाचे वैभव असणाऱ्या सुधागड पूर्वी भोरप या नावाने ओळखला जात असे परंतु नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र होऊन या गडाचे नाव सुधागड असे ठेवण्यात आले.
- पुण्यापासून हा गड 114 किलोमीटर अंतरावर आहे आणि रायगड पासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे.
आणखी वाचा : मुंबई मधील 25+ सर्वोत्तम पर्यटन स्थळे
Forts From Raigad In Marathi |
सरसगड (Sarasgad Fort)
- रायगड जिल्ह्यातील पाली या गावामध्ये सारसगड हा किल्ला आहे या ठिकाणापासून दहा किलोमीटर अंतरावर हा किल्ला स्थित आहे.
- सरसगड हा एक लोकप्रिय गड जो ट्रेकिंग साठी आहे विशेष करून पावसाळ्यात या ठिकाणी ट्रेकिंग साठी पर्यटकांची गर्दी असते.
- पुणे जिल्ह्यापासून हा गड 120 किलोमीटर अंतरावर आहे आणि रायगड शहरापासून हा गड 72 किलोमीटर अंतरावर आहे.
बिरवाडी (Birwadi Fort)
- रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यामध्ये बिरवाडी या गावांमध्ये हा किल्ला आहे. बिरवाडी या गावापासून तीन किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे या गडाची उंची 1200 फूट उंच आहे आणि हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारात मोडतो.
- पुणे शहरापासून हा गिरीदुर्ग 144 किलोमीटर अंतरावर आहे आणि रायगड या शहरापासून हा किल्ला 82 किलोमीटर अंतरावर आहे.
सुरगड (Surgad Fort)
- सुरगड हा किल्ला देवांचा किल्ला म्हणून ओळखला जातो. हा किल्ला रायगड जिल्ह्यातील रोहा या ठिकाणी आहे सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधील हा एक पर्वतीय किल्ला आहे. या ठिकाणी पर्यटक ट्रेकिंग साठी येतात जवळजवळ सहा किलोमीटर अंतराचा हा ट्रेक चार तासांमध्ये पूर्ण होतो.
तळगड (Talgad Fort)
- तळगड हा किल्ला रायगड जिल्ह्यातील रोहा या ठिकाणी आहे रोहा पासून हा किल्ला 18 किलोमीटर अंतरावर आहे.
- पुणे शहरापासून तळगड हा किल्ला 128 किलोमीटर अंतरावर आहे आणि रायगड पासून 55 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे.
आणखी वाचा : नाशिक जवळी १० निसर्गरम्य स्थळे
Forts From Raigad In Marathi |
मानगड (Mangad Fort)
- रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात हा एक डोंगरी किल्ला आहे. या किल्ल्याच्या दक्षिण बाजूस “जोरे” नावाची एक खोल दरी आहे त्याचबरोबर या किल्ल्याच्या पायथ्याशी विंझाई देवी चे एक जुने मंदिर आहे.
- मुंबईपासून हा किल्ला 150 किलोमीटर अंतरावर आहे आणि पुण्यापासून हा किल्ला 84 किलोमीटर अंतरावर आहे.
- रायगड पासून हा किल्ला 90 किलोमीटर अंतरावर आहे.
कासा किंवा पद्मदुर्ग (Kasa / Padmdurg Fort)
- रायगड जिल्ह्यातील हा किल्ला जंजिरा किल्ल्यावरून दिसतो पूर्वी जंजिरा किल्ल्यावरून पद्मदुर्गापर्यंत येण्यासाठी रस्ता होता परंतु काही दिवसांपूर्वी तो संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला समुद्राची पातळी वाढल्यामुळे हा रस्ता पाण्याखाली आहे त्यामुळे आता या दुर्गा पर्यंत येण्यासाठी बोटीनचा वापर करावा लागतो.
- सिद्धी मलिक अंबर याने बांधलेल्या पाच ऐतिहासिक समुद्रातील किल्ल्यांपैकी हा एक किल्ला रायगड या जिल्ह्यांमध्ये आहे.
राजकोट किंवा चौल चा किल्ला ( Rajkot / Choul Fort)
- 1667 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला होता महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यात असणाऱ्या मालवण या गावात हा किल्ला आहे.
कोरलाई किल्ला (Korlai Fort)
- सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी कोरलाई नावाची टेकडी आणि समुद्र किनारपट्टीच्या आसपासचा प्रदेश यांवर कब्जा केला आणि कोरलाई किल्ल्याची पायाभरणी केली.
- रायगड शहरापासून 103 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे.
- अलिबाग पासून हा किल्ला 22 किलोमीटर अंतरावर आहे त्याचबरोबर काशीद बीच पासून 12 किलोमीटर आणि रेवदंडा पासून पाच किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे.
वीरगड किंवा घोसाळगड ( Veergad / Ghosalgad Fort)
- रायगड जिल्ह्यातील रोहा या ठिकाणी हा किल्ला आहे रोह्यापासून आठ किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे.
- वीरगढ हा गिरीदुर्ग असून त्याची उंची 260 मीटर आहे.
- पुणे शहरापासून हा किल्ला 134 किलोमीटर अंतरावर आहे आणि रायगड पासून हा किल्ला 70 किलोमीटर अंतरावर आहे.
आणखी वाचा : महाबळेश्वर मधील 10 सुंदर पर्यटन स्थळे
Forts From Raigad In Marathi |
महेंद्र गड किंवा चांभारगड ( Mahendragad / Chanbhargad Fort )
- आजूबाजूच्या परिसराची निगराणी करण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती.
- या किल्ल्याची उंची 1200 फिट आहे.
- पुणे शहरापासून हा किल्ला 136 किलोमीटर अंतरावर आहे आणि तसेच रायगड पासून हा किल्ला 28 किलोमीटर अंतरावर आहे.
चंद्रगड (Chandragad Fort)
- रायगड जिल्ह्यामध्ये असणारा हा किल्ला मुंबई पासून 182 किलोमीटर अंतरावर आहे आणि पुणे शहरापासून 161 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे.
- रायकर शहरापासून हा किल्ला 68 किलोमीटर अंतरावर आहे.
फत्तेदुर्ग (Fattedurg Fort)
- रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली या ठिकाणी हा गड आहे. दापोली पासून पंधरा किलोमीटर अंतरावर हा गड आहे
- पुणे शहरापासून 205 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे तसेच मुंबईपासून 242 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे.
आणखी वाचा : दिल्ली मधील 15 पर्यटन स्थळे
कोकण दिवा गड (Kokan Diva Fort)
- कोकण दिवा किल्ला हा पुण्यापासून 70 किलोमीटर अंतरावर आहे आणि पुणे आणि रायगड यांच्या बॉण्ड्री लाईनवर आहे.
सागरगड ( Sagargad Fort)
- रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात हा किल्ला आहे.
- हा किल्ला पुण्यापासून 130 किलोमीटर अंतरावर आहे आणि रायगड शहरापासून 98 किलोमीटर अंतरावर आहे.
माणिकगड ( Manikgad Fort)
- रायगड पासून 60 किलोमीटर अंतरावर हा माणिकगड आहे.
- पुणे शहरापासून 110 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे.
मेघडंबरी गड (Meghandabari Fort)
- पुणे शहरापासून 132 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.
विकतगड किल्ला ( Vikatgad Fort)
- रायगड जिल्ह्यातील कर्जत या ठिकाणी विकत गड हा किल्ला आहे. हा किल्ला कर्जत पासून 19 किलोमीटर अंतरावर आहे.
कर्नाळा किल्ला (Karnala Fort)
- पनवेल पासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर करणारा हा किल्ला आहे जो रायगड जिल्ह्यात आहे.
आणखी वाचा : अहमदनगर मधील 25 पर्यटन स्थळे