Parenting Tips In Marathi | पालकत्व आणि मुलांशी पालकांचे नाते कसे असावे ??

Parenting Tips In Marathi |

आजकाल मुलांना कसे घडवावे हा प्रत्येक पालकांसमोर असणारा एक मोठा प्रश्नच आहे. मुलांशी पालकांचे नाते कसे असावे आणि मुलांचा मानसिक आणि सामाजिक विकास कसा करावा या प्रश्नांच्या शोधात प्रत्येक पालक असतो. नवनवीन तंत्रज्ञान आणि सोयीस्कर झालेल्या आजकालच्या नवनवीन गोष्टींनी मुलं जगाशी अगदी सहजरित्या connect होतात, या गोष्टीचे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटे सुद्धा आहेत.

आजकाल पालक आपल्या मुलांपासून दूर जात आहेत. पालक आपल्या मुलांना आणि मुळी आपल्या पालकांना समजून घेत नाहीत. आपली मूल जस आईवडील सांगतील तसेच वागवीत असा पालकांचा हट्ट असतो. त्यामुळं मूल आपल्या पालकांपासून दूर आणि मित्रांच्या जवळ जात आहेत. मुलांना आपल्या पालकांपेक्षा मित्र जास्त जवळची वाटायला लागतात.

आपल्या मुलांच्या आयुष्यात काय problems चालू आहेत हे पालकांपेक्षा त्यांच्या मित्रांना माहित असतात. याचे कारण असे आहे कि पालक हे आपल्या मुलांचे मित्र बनत नाहीत. आपल्या मुलांचे आयुष्य, चरित्र आणि भविष्य घडवणे हे पालकांच्या हातात असते. चला तर मग या ब्लॉग Parenting Tips In Marathi मध्ये पाहुयात हे आपण कसे करू शकतो.

Parenting Tips In Marathi |

  • आपल्या मुलांचे मित्र बना.
  • पालकांनी आपल्या अपेक्षा कमी कराव्यात.
  • इतरांसमोर आपल्या मुलांचा अपमान करू नये.
  • आपल्या मुलांसोबत वेळ घालवा.
  • कुठलेही कार्य आनंदाने करायला शिकवा.
  • इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा आपसातील प्रेम महत्वाचे आहे हे मुलांना शिकवा.
  • प्रत्येक गोष्ट आधी तुम्ही करा म्हणजे आपली मुल आपलं अनुकरण करतील.
  • मुलांच्या समस्या शांतपणे ऐकून घेत जा.
  • आपली चूक असेल तर ती मान्य करत चला.
  • मुलांना जर त्यांची चूक झाली तर शांतपणे समजून सांगा.
  • वाईट गोष्टींचे त्यांच्यावर काय परिणाम होतील याची त्यांना समज द्या.
  • मुलांना शिस्त लावा

आपल्या मुलांचे मित्र बना.

  • प्रत्येक पालकांचा आपल्या मुलांवर पूर्ण हक्क असतो पण दरवेळेस ते मुलांना दाखवणे गरजेचे नसते. त्यांना त्यांच्या पद्धतीने जगू द्या.
  • समजा मुलांनी काही चूक केली तर प्रत्येकवेळेस त्यांच्यावर ओरडणे हाच एक पर्याय नसतो तर शांत पणे यांच्या जवळ बसून त्यांना समजावून सांगणेही गरजेचे असते.
  • मुलांचे जर कोणाशी भांडण झाले किंवा त्याने काही चुकीचे केले तर ते आपल्या पालकांना सांगत नाहीत ते आपलं मन आपल्या मित्रांशी मोकळं करत असतात, कारण त्यांना माहित असत कि आपण याबद्दल आपल्या पालकांशी बोललं तर ते आपल्यावर रागवणारच,ते आपल्याला समजून घेणार नाही. मग ते खूप घाबरलेले असतात.
  • अश्यावेळेस पालकांनी त्यांची हि मनःस्थिती समजून घ्यायला हवी, प्रत्येकवेळी ओरडणे गरजेचे नाही, निदान आपल्या मुलांना आपली परिस्थिती आपल्या पालकांशी share करायला हवी एवढी मोकळीक तर हवीच. अश्या वेळेस पालकांनी आपल्या मुलांचे मित्र बनवून त्यांना समजून घ्यायला हवे .

पालकांनी आपल्या अपेक्षा कमी कराव्यात.

  • आजकालच्या स्पर्धेच्या युगात पालक आपल्या मुलांकडून खूपच जास्त अपेक्षा ठेवतात.
  • आपल्या मुलाने परीक्षेत जास्त गुण मिळवलेच पाहिजे किंवा त्याने प्रत्येक खेळात सर्वोत्तम असायलाच हवे असे एक ना अनेक अपेक्षा पालक आपल्या मुलांकडून ठेवत असतात.
  • त्यामुळे मुलं खूप जास्त दबावाखाली येतात, काहींना ना दबाव सहन होत नाही. ते यातून पळ काढण्याचा प्रयत्न करतात, तर काही बंडखोर होतात.
  • मुलांवर आपल्या अपेक्षणाचा डोंगर उभा करणे चुकीचे आहे त्यामुळे मुलांचा मानसिक विकास होत नाही आणि ते खचून जातात.
  • आपल्या मुलाने सर्वांपेक्षा उत्तम असायला हवे या सारख्या पालकांच्या अपेक्षांमुळे मुलांवर मानसिक तणाव येतो, या मानसिक दबावामुळे मुलांचा हवा तसा विकास होत नाही.
  • त्यामुळे पालकांनी खूप जास्त अपेक्षा करू नये. प्रत्येक मुलामध्ये काहींना काही चांगले गुण असतातच प्रत्येकाला वेगवेगळ्या विषयामध्ये आवड असते त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे वागू द्या.

इतरांसमोर आपल्या मुलांचा अपमान करू नये.

  • पालकांनी आपल्या मुलांचा अपमान होईल असे काही बोलू नये. कुणाचाही जर कोणी अपमान केला तर आपल्याला किती वाईट वाटते आणि आणखी काहीही करण्याची आपली इच्छा होत नाही.
  • तसेच मुलांचेही असतेच त्यांचा जर आपलं कायमच अपमान करत असू तर त्यांनाही वाईट वाटणारच ना.
  • सतत आपण त्यांना तुला कळत नाही का ? तू वेडा आहेस का ? किंवा असेच काहींना काही इतरांसमोर बोलत राहिलो तर त्यांचा स्वतःवरचा विश्वास ते गमवायला लागतात. त्यांना वाईट वाटायला लागते.
  • मुलांना इतर लोकांसमोर जायला भीती वाटायला लागते आणि आपण कुठेतरी कमी आहोत अशी भावना त्यांच्यात निर्माण होत जाते.
  • तू मला खूप त्रास देतो, तुला हे जमणार नाही अश्या नकारात्मक भाषेत आपण मुलांशी बोलल्याने त्यांच्यावर मानसिक परिणाम होत असतो. अपमानाच्या भावनेने त्यांचा self confidence कमी होतो.
  • पालकांनी मुलांना प्रेरणा द्यायला हवी तर पालकच आपल्या मुलांना demotivate करत असतात.

आणखी वाचा : आपल्या वेळेचे नियोजन कसे कराल ? Powerful 10 tips

आणखी वाचा : यशस्वी लोकांच्या 12 चांगल्या सवयी

Parenting Tips In Marathi |

इतरांसमोर आपल्या मुलांचे दोष सांगत बसू नका.

  • प्रत्येकाला आपली स्तुती आवडते आणि आपली स्तुती करणाराही आवडतोच. आणि पालक नेमके इथेच चुकतात कि घरी आलेल्या आपल्या पाहुण्यांसमोर आपल्या मुलांचे दोष सांगत बसतात.
  • घरात पाहुणे आलेले असताना मूळ नेहमी त्यांच्याशी चांगले वागण्याचा प्रयत्न करत असतात आणि स्वतःच impression दाखवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु पालक आधीच त्याची निंदा करून तो कसा वाईट आहे हे दाखवून त्याचा अपेक्षा भंग करतात.
  • जर तुम्हाला मुलांविषयी समस्या आहेत तर ते तुम्ही मुलांना सांगा इतरांना सांगून त्या दूर होणार तर नाहीच पण आपण आपल्या मुलांचेही मन दुखावत असतो.
  • आपल्या मुलांविषयी नेहमी चांगलेच बोला आणि चांगले बोलणे जमत नसेल तर निदान त्यांच्या विषयी इतरांशी वाईट बोलणे टाळा.

आपल्या मुलांसोबत वेळ घालवा.

  • पालकांनी आपल्या मुलांबरोबर वेळ घालवायला हवा. मुलांशी communication करायला पाहिजे. यामुळे मुले आपल्या दिवसभरात काय केलं, आपला आनंद आले up and down पालकांशी share करतात.
  • मुलांबरोबर वेळ घालवल्यामुळे त्यांच्याशी आपले नाते अधिक घट्ट होते.

कुठलेही कार्य आनंदाने करायला शिकवा.

  • कुठलीही गोष्ट जी आपण आनंदाने करतो ती नेहमी यशस्वी होत असते. त्यामुळे आपल्या मुलांना नेहमी प्रत्येक गोष्ट हि आनंदाने करायला शिकवा.
  • त्यासाठी आपणही त्यांच्याबरोबर एखादी गोष्ट केली तर त्यानाही ती गोष्ट करताना आनंदच होईल आणि त्यांना आनंदाने इतर गोष्टी करण्याची सवयही लागेल.

इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा आपसातील प्रेम महत्वाचे आहे हे मुलांना शिकवा.

  • एकमेकांबरोबर वेळ घालवताना आपल्या मुलांना आपापसातील प्रेम दाखवा.
  • आपण त्यांच्यावर खूप प्रेम करतो आणि आपल्यासाठी इतर कुठल्यासाठी गोष्टीपेक्षा आपापसातील प्रेम महत्वाचे आहे हे त्यांना दाखवणे गरजेचे आहे.

प्रत्येक गोष्ट आधी तुम्ही करा म्हणजे आपली मुल आपलं अनुकरण करतील.

  • आपण घरात एकमेकांशी कसे वागतो, कसे बोलतो याचाच आपली मुले आपले अनुकरण करत असतात.
  • आपण चान्गले कार्य केले कि आपली मुलेही चांगलीच कार्य करणार.
Parenting Tips In Marathi |

मुलांच्या समस्या शांतपणे ऐकून घेत जा.

  • आपल्या मुलांशी बोलून, त्यांच्याशी गप्पा मारत, त्यांच्या दिवसभराच्या routine विचारत जा.
  • आपली मुले आपल्याशी मन मोकळं करतात कि नाही याची तपासणी करत जा.
  • त्यांना काही समस्या आहेत कि नाही याची तपासणी करत चला. त्यांच्या समस्या शांतपणे ऐकून घ्या. त्यांच्या समस्यांवर समाधान शोधायला मदत करा.
  • आपली मुले जर आपल्याशी आपल्या समस्या share करत असतील तर तुम्ही एक चांगले पालक आहात.

आपली चूक असेल तर ती मान्य करत चला.

  • आपल्याकडून जर काही चूक होत असेल तर त्याच्याबद्दल माफी मागा.
  • आपल्या मुलांसमोर आपल्या चुकांची माफी मागा म्हणजे त्यांना हि या गोष्टीची जाणीव राहील कि माफी मागनेही खूप गरजेचे आहे आणि त्याच बरोबर आपली चूकही मान्य करणे किती महत्वाचे आहे.

मुलांना जर त्यांची चूक झाली तर शांतपणे समजून सांगा.

  • आपल्या मुलांकडून जर काही चूक झाली तर त्यांच्यावर ओरडणे चुकीचे आहे. आधी शांतपणे त्यांच्याशी बोलून त्याबद्दल विचारून घ्या.
  • त्यांनी ती चूक का केली त्यामागचे कारण समजून घेत जा. जर त्यांनी केलेली चूक खरंच चुकीचीच असेल तर त्यांना त्या बद्दल समाज द्या.
  • आपल्या मुलांना आपलेपणाची भावना द्या म्हणजे जर त्यांनी काही चूक केली ती त्यांच्या जर लक्षात अली तर ते सर्वात आधी तुम्हाला येऊन सांगतील.
Parenting Tips In Marathi |

वाईट गोष्टींचे त्यांच्यावर काय परिणाम होतील याची त्यांना समज द्या.

  • जर मुलांनी काही चुकीचे केले असेल तर त्यांना शांतपणे समजून सांगा.
  • चुकिचझया किंवा वाईट गोष्टींचे त्यांच्यावर काय वाईट परिणाम होतील या बद्दल ची त्यांना जाणीव करून देत चला.
  • त्यामुळे यानंतर त्यांनी तिचा चूक पुन्हा करू नये याची खबरदारी घेत चला.

मुलांना शिस्त लावा

  • आपल्या मुलांना शिष्टीचे महत्व पटवून देत जा . लहान वयातच मुलांना शिष्ट लागली तर मोठेपणी त्यांना जास्त त्रास होणार नाही.
  • शिष्ट लावताना सारखं त्यांच्यावर ओरडून किंवा सारखं सारखं एकच गोष्ट सांगून त्यांना irritate करू नका त्यामुळे मुलं हत्ती होतात आणि त्यांना चांगली श्तीस्ट लागत नाही.
  • आपली मुले आपलं ऐकतील आणि प्रेमाने सांगितलेली कामे करतील याची खबरदारी घ्या.
  • आपल्या मुलांवर आपले खूप प्रेम आहे याची त्यांना सतत जाणीव करून देत जा.